मध्ययुगीन भारतातील भक्ति आंदोलनाने परमार्थाच्या क्षेत्रात वर्ण, जाती, स्त्री - शूद्र भाव, उच्च - नीच भाव व्यर्थ असल्याचे प्रत्यक्ष कृति - उक्तितून सिद्ध केले. याचे प्रात्यक्षिक म्हणजे संत चोखामेळा आणि संत रोहिदास. सजन कसाई सारखा परधर्मी आणि व्यवसायाने खाटीक असलेला हा या भागवतधर्मात येऊन उद्धरून जातो, ही घटना अभूतपूर्व म्हटली पाहिजे. राजकीय दृष्ट्या हा काळ धामधुमीचा विषन्नावस्थेचा होता. परकीय आक्रमणे, त्यातून होणारी जनतेची ससेहीलपड, अन्याय, जुलुम, सक्तीचे धर्मांतर यामुळे जनता पिटून गेली होती. इ. स. १३२५ पासून सन १५१६ पर्यंत दिल्लीत एकूण सोळा वेळा सुलतानांची अदलाबदल सत्ता स्पर्धेतून घडून आली. त्यांच्या बरोबर येणार्या सूफीचे धार्मिक आक्रमण त्याहीपेक्षा भयावह होते. हजारो उपेक्षित धर्मातरि होत होते. राजसंस्थेशी सामान्य जनतेच्या आश - आकांक्षेचा संबंधच राहिला नव्हता. कोण सम्राट राजा आला नि गेला काय त्याचे जनतेला सोयर सुतकच राहिले नव्हते. कारण, त्याचा बाली कोण नव्हता ? त्याचे वाली होते, अशाही विकट परिस्थितीत धीर देणारे, नमःशांती ढळू न देणारे संत - सत्पुरुष. रोहिदास हे समत्वदृष्टीचे, मानवताधर्म सांगणारे संत त्यातलेच एक. ‘ जडजीव उद्धराया आले । भूवटी धरूनि अवतार ॥ कंठमणी श्रीहरिचे । हीन कुळीं रोहिदास चांभार ॥ ’ असे संतचरित्रकार दासगणू म्हणतात, ते सर्वार्थाने खरे आहे. रामानंदांचा काळ सर्वसाधारणपणे इ. स. १२९९ ते १४१० असा मानला जातो. यावरून याकाळात केव्हातरी संत रोहिदास होकत गेले. एवढाच निष्कर्ष त्यांच्या काळासंबंधी काढता येतो. कबीर रोहिदासांचा गौरव करतात, ‘ संतनमे रविदास संत है, सुपच ऋषी सो मानिया ॥ हिंदु तुस्क दीन बने है, कछु नहीं पहिचानिया ॥ ’ यावरून कबीरांना ते वडील, परंतु समकालीन असावेत. संत कबीरांचा काळ इ. स. १३५८ ते १४४८ असा आहे.
त्यांचा जन्म चर्मकार समाजात झाला. आपल्या पदावलीत ते म्हणतात, ‘ ऐसी मेरी जाति विख्यात चमार । हृदय राम गोविंद गुन सार ॥ ’ काशी जवळील ‘ मांडूर ’ हे त्यांचे जन्मस्थान. संतसंग आणि त्यांची जिज्ञासू व चौकस बुद्धी यातून त्यांचे शिक्षण झाले. त्यांचा विवाह झाला होता. ‘ लोना ’ हे त्यांच्या पत्नीचे नाव. उत्तर प्रदेशातील चर्मकार समाज लोनाला देवी मानून पूजितात. प्रपंचात राहूनही ते विरक्त वृत्तीचे होते. रोहिदासांना भारताच्या प्रांता - प्रांतांत सर्व वर्णाचे अनुयायी मिळाले, एवढा त्यांचा प्रभाव होता. उतर - दक्षिणेत त्यांची स्मृतिस्थाने आहेत. यांचा ‘ रविदास ’, ‘ रईदास ’ असाही उल्लेख होतो. कबीर, धना नाट, पीया यांचे समकाली होते. त्यांचा एकूण दिनक्रम अत्यंत शुचिर्भूत, नैष्ठिक असे. गंगास्नान, गंगापूजन, ध्यान, प्रभुस्मरण, पूजन कधी चुकले नाही. त्यांचा योगाभ्यास चांगला होता. अंतकाळी ते पद्मासन घालून ॐ काराचे उच्चारण करीत त्यांनी देह त्याग केला.
रोहिदास यांचे गुरु ‘ रामानंद ’ होत. रामानंद ही विभूती मध्ययुगीन परमार्थसाधनेत फार प्रभाव झाली अशी होती. ‘ भक्ति द्राविड उपजी, लाये परमानंद । परगट कियी कबीरने सप्तदीय नवखंड ’ असे त्यांच्या संदर्भात म्हतले जाते. सेना महाराज ( मराठी संत ) कबीर, रोहिदास हे गुरुबंधूच. रोहिदासोत्तर काळातली असेल तर तिने मनी - मानसी रोहिदासांना गुरु केल असावे. मात्र तिने आपल्या पदावलीत ‘ रैदास ’ यांचा उल्लेख वारंवार केला आहे. कदाचित हा ‘ रेदास ’ दुसराच कोणी असावा, असेही म्हटले जाते. चितोडगडच्या राणा कुंभाची पत्नी ‘ झाली ’ ही त्यांची शिष्या होती.
एकेश्वरवाद, योगमार्ग, भक्तिमार्ग हा या कालखंडाचा विशेष होता. रोहिदास एकेश्वरवादी आणि योगी व थोर भक्त होते. त्यांचा कार्यकांडाला विरोध होता. योगी बनून समाजापासून विन्मुख होण्यापेक्षा भक्त बनून समाजात मिसळून जावे, अशी त्यांची भूमिका होती, ‘ वर्णाश्रम अभिमान तजि पदरज बंदहि जासुका । संदेह ग्रंथि खंडन निपुन, वानि विमल रेदासकी ’ असे त्यांच्या संदर्भात म्हतले जाते. त्यांची केलेली रचना गुजराथ, राजस्थान इत्यादी ठिकाणी प्रपत झालेल्या हस्तलिखितांवरून संकलित केली गेली आहे. त्यांची सुमारे १०० पदे उपलब्ध होतात. सात - आठ साख्याही मिळतात. अलाहाबादच्या वेलवेडियर प्रेसने ‘ संतबान्त ’ पुस्तकातलेत रोहिदासांची पदावली प्रसिद्ध केली आहे. ( आ. ६, १९४८ उपलब्ध ) त्यात त्यांची ८७ पदे येतात. काही पदे शिखांच्या ग्रंथ साहेबात केली आहेत.
त्यांची वाणी भक्तिभावाने भारावून गेलेली आहे. विरह व्यथेने कधी कधी ती मधुररूपही धारण करताना दिसते. ‘ प्रिति सुधारत आव । तेज स्वरूपी सकल, सिरोमनि, सकल निरंजन राव । पिऊ संग प्रेत बहूं नहि पायो, करनी कवन । बिसारी ॥ चक को ध्यान दधिसुत सी हेत है, यो तुम ते मैं न्यारी । भवसागर मों हि एक टक जोवत तलफत रजनी जाई ॥ ’ त्यांनी आपल्या पदांत निर्गुण तत्त्वाचे निरुपण अत्यंत सुबोध भाषेत केले आहे. ‘ जंस हटि कहिये तस हटि नाहीं, है अस जस कछु तैसा ’ अशा रीतीने परमात्मास्वरूप वाणीला वर्णिला येण्याजोगे नाही, असे ते सांगतात. ‘ उदय अस्त दोड नहीं । असे अद्वैंत ते निरपित्रात. परमात्मा एकरस, सर्व व्याप्ती आहे, अशी त्यांची आध्यात्मिक धारण पदावलीत सर्वत्र व्यक्त होते. त्यांचे सारेजीवन निर्गुण निराकार परमतत्त्वाच्या भक्तीने न्हाऊन निघाले होते. ते आपली अद्वैतानुभूती पारंपारिक पण प्रासादिक शैलीत वर्णन करतात. ‘ अब कैसे छूटे रामरटन लगी । प्रभुजी तुमचंद्रन हम पानी । झाकी अंग अंग बास समानी ॥१॥ प्रभुजी तुम धन हम बन मोरा । जैसे चित्तवन चंद चकोरा ॥२॥ प्रभुजी तुम दीपक हम बाती । जाकि ज्योति बरें दिन राती ॥३॥ प्रभुजी तुम मोती हम धागा । जैसे सोनहि मिलन सुहागा ॥४॥ प्रभुजी तुम स्वामी हम दासा । ऐसी भगति करें रेंदासा ॥५॥
त्यांच्या जीवनात घडलेल्या काही अद्भूत कथा संत चरित्र कथांना अनुसरून ‘ रोहिदास रामायणांत आल्या आहेत. या कथा कल्पित असल्यातरी लोकमानसातील त्यांचे प्रतिबिंब आणि त्यांना लोकसंख्येविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करणार्या आहेत. त्यांनी मंदिर बांधून ब्राह्मण पुजारी ठेवला म्हणून बादशहाकडे तक्रार जाते. त्याला बोलावले जाते. पण त्यांच्या अलौकिक तेजाने बादशहात परिवर्तन होते. रोहिदासाने दिलेली सुपारीची भेट साक्षात गंगा प्रकट होऊन स्वीकारते. धूर्त पंडित काष्टाचे शाळिग्राम गंगेत तरलेले दाखवतात, पण रोहिदासांचा खरा शाळिग्रामही पाण्यात तरंगतो, अशा अनेक चमत्कार कथा त्यांच्या लोकानुवर्ती, समंजस, अजानशत्रू, शांत अशा व्यक्तित्वाच्या निदर्शक ठरतात.