अध्याय सोळावा
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऋषी म्हणे नंदा भगवती या नामेंकरून ॥ नंदापासून होईल जाण ॥ तिचें स्तवन पूजन ध्यानें ॥ तो वश्य करील जाण तिन्हीं लोक ॥१॥
उत्तम कनककांती ऐसी ॥ कांचन वस्त्र झळकें कांचेसी ॥ देवी शोभते सुवर्णप्रभा तैसी ॥ उत्तम कनकभूषणेंसी भूषित ॥२॥
कमळ अंकुश पास अस्त्र ॥ तेणेंसी अलंकृत चतुर्भुज ॥ इंदिरा कमला लक्ष्मी सहज ॥ बैसें कनकाब्जे आसनीं ॥३॥
ते रक्तदंतिका नामें करून ॥ देवी म्यां बोलिला तुजलागून ॥ स्वरूप तियेचें मी सांगेन ॥ ऐक भयनाशन होय जेणें ॥४॥
रक्तवर्ण वस्त्र आरक्त ॥ अंगी आरक्त भूषणें भूषित ॥ आरक्त नेत्र रक्तायुधें शोभती हात ॥ केशही आरक्त अतिभयंकर ॥५॥
आरक्त नखें अति तीक्ष्ण ॥ दांतदाढाही रक्तवर्ण ॥ पतिव्रता अनुसरे भर्त्यालागून ॥ त्यासी भक्तजना देवी भजे ॥६॥
पृथ्वी ऐसी विस्तीर्ण ॥ मरूसरिखे जिचें स्तन ॥ अत्यंत स्थूल लंबायमान ॥ आकृतीप्रमाणें मनोहर ॥७॥
देदीप्यमान अति कठोर ॥ सर्व आनंदाचाचि समुद्र ॥ भक्तालागीं पाजवी सत्वर ॥ सर्व काम दुभणार ऐसे स्तन ॥८॥
खङ्गपात्र मुसळ जाण ॥ नांगराचें करी धारण ॥ रक्त चांमुडाविख्यात जाण संपूर्ण ॥ योगाची स्वामिण देवी परमेश्वरी ॥९॥
जिनें व्यापिले सकळ लोक ॥ जग सर्वही स्थावरजंगमात्मक ॥ हिचा जो भक्तियुक्त पूजक ॥ चराचर व्यापक होतसे तो ॥१०॥
जो करील नित्य अध्ययन ॥ रक्तदंतिकेचें स्तवन ॥ करी सेवा संपूर्ण देवी त्याची ॥ पतीचें जाण पतिव्रता जेवी ॥११॥
शाकंभरी नीलवर्ण ॥ नीलोत्पला ऐसें जियेचे नयन ॥ नाभी सखोल त्रिवळी जाण ॥ उदर शोभायमान जियेचें ॥१२॥
अतिकठोर उंच दोन्हीं ॥ वर्तुळ मोठें घन स्तनी ॥ बैसलीं हातीं कमळबाण घेउनी ॥ कमळासनी सुशोभित ॥१३॥
पुष्पपल्लवमूळ आदिकरून ॥ फलादिशाका संग्रहून ॥ अनंत रसयुक्त संपूर्ण ॥ क्षुधातृषा मरणजरानाशक ॥१४॥
देदीप्यमान धनुष्यही ॥ धारण करूनि परमेश्वरी पाही ॥ शाकंभरी शतनेत्रींही ॥ म्हणती दुर्गाही तिजलागुन ॥१५॥
शाकंभरीसी स्तविती ध्याती ॥ जपिती पूजिती नमन करिती ॥ अक्षयीं त्या भोगप्राप्ती ॥ अन्नपानादि संपत्ती लौकर ॥१६॥
भीमादेवी ते नीलवर्ण ॥ दांतादाढा अतिभीषण ॥ विशाल नयन देदीप्यमान ॥ वर्तुळ पीनस्तनी ते ॥१७॥
प्रचंड हास्य डमरू करीं ॥ नरकपाळाचें पात्र करीं ॥ एकवीरा काळरात्री ॥ कामनादात्री बोलिली भक्ता ॥१८॥
तेजोराशी देदीप्यमान ॥ भ्रामरी ते विचित्र वर्ण ॥ करी चित्रविचित्र भ्रमण ॥ महामारी जाण म्हणती तिसी ॥१९॥
या प्रकारें मूर्ती देवीच्या मंगळ ॥ तुज राजा सांगितल्या सकळ ॥ जगन्माता चंडिकेच्या केवळ ॥ कामधेनु प्रबळ सर्व त्या ॥२०॥
हे जे कां अतिरहस्य ॥ राजा न सांगावें तुवां कवणास ॥ या दिव्य मूर्तीचा कथासौरस । देती मनास अभीष्टफळ ॥२१॥
तेचि कथा इथंभूत ॥ भागोरी ऋषीसी अत्यद्भुत ॥ ऋषी मार्कंडेयसमस्त ॥ समाप्तपर्यंत सांगितली ॥२२॥
कथा झाली संपूर्ण ॥ कोंदाटली जगन्माता आपण ॥ नित्यानंद श्रोत्या करी विनवण ॥ अबद्धसुबद्ध वर्णन म्यां केलें ॥२३॥
संतश्रोते सज्ञान तुम्ही ॥ अव्युत्पन्न अज्ञान असतांही मी ॥ मजपासून बोलविलें स्वामी ॥ हें सामर्थ्य म्हणे मी तुमचेची ॥२४॥
वेडेवांकुडे माझें बोलणें ॥ म्हणूनि तुम्हां मी येतसे शरण ॥ मज अनाथा कराल सज्ञान ॥ ज्ञानसंपन्न तुम्ही सकळ ॥२५॥
ऐसी वक्त्याची विनंती ॥ ऐकूनि संतोषलें संतश्रोती ॥ म्हणती तुला देवीच बोलविती ॥ मुखीं वस्ती करूनियां ॥२६॥
तूं तरी केवळ मूर्ख ॥ हें आम्हांसी असे ठाऊकें ॥ परी देवीचाचि प्रसाद देख ॥ आम्ही सकळिक मानितों ॥२७॥
नको आम्हां करूं विनवण ॥ देवी असे तुला प्रसन्न ॥ ऐसें ऐकूनि संतवचन ॥ नित्यानंदतीर्थ येती ॥२८॥
पदपुष्पें वेंचूनि बुद्धीच्या हातीं ॥ ओव्याबद्ध माळाबुक्ती ॥ अध्यायीं ग्रंथिते एकोणविस ॥२९॥
धूपदीपनैवेद्य संपूर्ण ॥ पूजा सर्वही शब्दचि करून ॥ अंबे केलें तुज अर्पण ॥ मी अपराधी जाण जगन्माते ॥३०॥
नसतांचि सक्ती नसतां ज्ञान ॥ कथा केली तुझी म्यां वर्णन ॥ क्षमा करी नेणता म्हणून ॥ अंबे तान्हें बाळ मी तुझें ॥३१॥
आपली आपण कथा ॥ तूंचि होऊनियां वक्ता ॥ नित्यानंदा करूनि निमित्ता ॥ केलें ग्रंथा समाप्त तुवांची ॥३२॥
ग्रंथासी देईं वरदान ॥ जो करील याचें श्रवणपठण ॥ त्यासी चतुर्विध पुरुषार्थ देऊन ॥ कुळपरंपरा जाण नांदवी ॥३३॥
हा श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराणसंमत ॥ येथूनि झाला समाप्त ॥ जगदंबाप्रीत्यर्थ असो हा ॥३४॥
मन्मथनाथ संवत्सरीं जाण ॥ शके सस्त्राशेंसत्तावन्न ॥ पवित्र त्यांतही उत्तरायण ॥ हरिदिन पौष वद्य ॥३५॥
गुरुवारी सप्तऋषी क्षेत्रीं ॥ ग्रंथ समाप्त दिवा दोप्रहरीं ॥ झाला हनुमत्संन्निधीं भीतरीं ॥ नागेशार्पण करी नित्यानंद ॥३६॥
इतिश्रीदेवीविजय ग्रंथ षोडशोध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥
॥ श्रीदेवीविजय षोडशोध्याय समाप्त ॥
॥ इति श्रीदेवीविजय समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP