ज्ञात्वाऽज्ञात्वा च कर्माणि जनोऽयमनुतिष्ठति । विदुषः कर्मसिद्धिः स्यात्तथा नाविदुषो भवेत् ॥६॥

विदुष म्हणिजे कोविदजन । कर्में अनुष्ठिती जाणोन । कर्मफळसिद्धि संपूर्ण । लाहती विघ्न न बधितां ॥५७॥
तैसें नेणोनि देखोवेखीं । कर्में अनुष्ठितांही मूर्खीं । सिद्धि न पवोनि होती दुःखी । विषयाभिलाखी अविचारें ॥५८॥

तत्र तावत्क्रियायोगो भवतां किं विचारितः । अथवा लौकिकस्तन्मे पृच्छतः साधु भण्यताम् ॥७॥

तेथें तुम्हीं हा क्रियायोग । विचारिला तो कोण मार्ग । शास्त्रदृष्टि कीं प्रसंग । लोकाचारप्रवृत्ति ॥५९॥
पूर्वीं जैसे केले प्रश्न । तैसें तैसें उपपादून । सर्व रहस्य मजलागून । कीजे कथन भो ताता ॥६०॥
नित्य किंवा नैमित्तिक । किंवा शांतिक पौष्टिक । पारमार्थिक कीं लौकिक । इहामुष्मिक किंवा हें ॥६१॥
ऐसें ऐकोनि नंद बोले । वृद्धाचारवोघें आलें । तें तें अवश्य पाजिजे केलें । प्राप्त झालें कुळकर्म ॥६२॥

नन्द उवाच - पर्जन्यो भगवानिंद्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः । तेऽभिवर्षंति भूतानां प्रीणनं जीवनं पयः ॥८॥

कृष्णा तुवां केला प्रश्न । येथ प्रधानदेवता कोण । तरी हा मुख्य इंद्र भगवान । नामें पर्जन्य बोलिले ॥६३॥
मेघ तयाच्या आत्ममूर्ति । ते सर्वत्र अभिवर्ष्टी । भूतमात्राची जीविकावृत्ति । प्राणवृत्ति तत्तोयें ॥६४॥
भूतमात्राचें जीवन । प्राणतर्पण आप्ययन । हृष्टिपुष्टींचें कारण । पय संपूर्ण वर्षती ॥६५॥

तं तात वयमन्ये च वार्मुचां पतिमीश्वरम् । द्रव्यैस्तद्रेतसा सिद्धैर्यजंते क्रतुभिर्नराः ॥९॥

आतां कोण यजमान म्हणसी । तरी आम्ही सर्व व्रजनिवासी । आणखीही देशोदेशीं । त्यां सर्वांसि यजनीय ॥६६॥
समस्त मेघ ज्याच्या मूर्ति । तो ईश्वर वारिदपति । त्या इंद्रातें आम्हीं समस्तीं । द्रव्यीं उचितीं यजावें ॥६७॥
म्हणसी द्रव्यें येथ कोण । इंद्रें रेत अभिषेचन । करूनि वाढविली जीं पूर्ण । सिद्धें नूतन तीं द्रव्यें ॥६८॥
ते ते यथालब्धोपहार । नाना द्रव्यांचे संभार । मेळवूनि यजिती नर । जलदेश्वर फळलोभें ॥६९॥
म्हणसी काय इंद्राहातीं । तरी हे मेघ ज्याच्या मूर्ति । रेत वृष्टीस्तव वोपिती । सस्यसंपत्ति पयलोभें ॥७०॥

तच्छेषेणोपजीवंति त्रिवर्गफलहेतवे । पुंसां पुरुषकाराणां पर्जन्यः फलभावनः ॥१०॥

यज्ञद्वारा त्याचें त्यास । अर्पितां उरे जें जें शेष । तेणें जीविकार सावकाश । त्रिवर्ग पुरुष साधिती ॥७१॥
यज्य यजन हाचि धर्म । अर्थ समस्त द्रव्या नाम । काम म्हणिजे योगक्षेम । जेणें सुगम त्रिवर्ग हा ॥७२॥
जरी तूं कृष्णा म्हणसी ऐसें । कृषिगोरक्षणादि आयासें । त्रिवर्ग संपादिजे तो पुरुषें । इंद्र अनायासें तो कैं दे ॥७३॥
तरी ऐकें गा जनार्दना । करितां कृष्यादि अनेक यत्नां । पर्जन्याविण काळ भावना । नव्हेचि कोणा आपैती ॥७४॥
तस्मात् फलदाता पर्जन्य । त्याचें सर्वीं करूनि यजन । स्वेच्छा त्रिवर्ग संपादून । समाधान पावधिजे ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP