मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५७ वा| आरंभ अध्याय ५७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४२ अध्याय ५७ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः । परमपावना पुसणपुरुषा । श्रीगोविंदा जगदधीशा । परिसावया कृतादेशा । श्रोतृमानसा वसवावें ॥१॥सत्यभमा परणिल्यावरी । सत्तावन्नाव्यामाझारी । काय करिता जाला हरि । हे नृपा अवसरी पुसावया ॥२॥तें जाणोनि नृपान्तर । वसिष्ठाचा प्रणप्तार । निरूपील तो इत्यर्थसार । श्रोते चतुर अपिसोत ॥३॥सत्यभामेचें पाणिग्रहण । जालें देखोनि शतधन्वान । सत्राजिताचा घेईल पाण । मग त्या कृष्ण मारील ॥४॥तेथ न लभतां स्यमंतकमणि । विकल्प मानील मुसलपाणि । अक्रूरें अर्पितां सभास्थानीं । बुझावणी तें होईल ॥५॥ये अध्यायीं इतुके कथा । परिसावयाची नृपातें आस्था । जाणोनि बादरायणि वक्ता । निरूपी तत्त्वता तें ऐका ॥६॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP