अध्याय ६४ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीमद्गोविंदात्मने नमः ॥
जयजय मार्तंडमंडलवर्ती । समष्टिकरणीं तव प्रवृत्ति । विवर्त प्रकटूनि निजात्मद्युती । रोचकभ्रान्ति त्रिजगभा ॥१॥
नमो तया श्रीगोमंता । प्रणतपाळा गोपीनाथा । स्रष्टा गोप्ता उपसंहर्ता । नसे तुजपरता परिपूर्ण ॥२॥
तुझीं वंदूनि चरणकमलें । उषाहरण वाखाणिलें । नृगोद्धरण उपाइलें । तें वदविलें पाहिजे ॥३॥
तव पदपंकजस्मरणादरें । प्रज्ञा प्रमेयाङ्कुरीं मोहरे । जेंवि नौकेचिया आधारें । जड निस्तरे जलधिही ॥४॥
अगाध श्रीमद्भागवत । भाषावाख्यानीं प्रस्तुत । दशमामाजी श्रीकृष्णचरित । अध्याय कथिले त्रिषष्टि ॥५॥
चतुःषष्टितम याउपरि । वाखाणिजेल भाषाकुसरी । तो ऐकिजे पवित्र श्रोत्रीं । कैवल्यपात्रीं विपश्चित्तीं ॥६॥
चौसष्टाच्या अध्यायीं कथा । अज्ञात दोष नृगाच्या माथा । तेणें पावला अधःपाता । सरठरूपें अंधकूपीं ॥७॥
तया पापापासूनि हरि । नृगरायाचा उद्धार करी । उन्मत्त नृपांतें ब्रह्मस्वहारीं । दोषोत्तरीं शिक्षापी ॥८॥
आणि यादव जे स्वबाहुगुप्त । ऐश्वर्यभोगादिमदोद्धत । प्रसंगें यांतेंही शिक्षित । विप्रां विनीत होत्साता ॥९॥
ब्राह्मणाची अवज्ञा कोणीं । सहसा न कीजे मामकीं जनीं । भाविब्रह्मशापें करूनी । कुलक्षय जाणूनि शिक्षितसे ॥१०॥
ये अध्यायीं इतुकी कथा । स्वस्थचित्तें परिसिजे श्रोतां । परीक्षितीतें श्रीशुक वक्ता । झाला बोलता तें ऐका ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP