अध्याय ८३ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगणेशाय नमः ।
परमामृताब्धिसंभवसोमा । भवभ्रमत्रितापतमोहरधामा । सोमपषट्पदकल्पद्रुमा । गोविश्रामा गोविन्दा ॥१॥
तव कृपारसपीयूषपानें । दशमस्कंधींची शुकवाग्रत्नें । भाषाघडणी हरिवरदानें । केलीं भूषणें श्रोतयां ॥२॥
कंठीं अथवा श्रवणपुटीं । मुमुक्षु मिरविती जे जे दृष्टी । ते नर शोभती वैकुण्ठीं । निर्जर मुकुटीं त्या नमिती ॥३॥
तो हा कृपामृताचा पाट । ब्रह्मगिरीपासूनि नीट । भाषाप्रवाह घडघडाट । दयार्नवघटीं सांठवला ॥४॥
सुखृतोदयीं श्रोते सुमति । सदैव सदैव सुस्नात होती । दुर्दैवभ्रमहिमें कांपती । घुंगट न काढती मोहाचा ॥५॥
असो तयांची किमर्थ कथा । द्व्यशीतितम अध्याय संपतां । गोपी आणि गोपीनाथा । संवाद मिथा तो कथिला ॥६॥
यावरीं त्र्यशीतितमाध्यायीं । कृष्णवनिता एके ठायीं । द्रौपदीसहित बैसोनि पाहीं । कथिती विवाहीं हरिप्राप्ति ॥७॥
तिये कथेच्या श्रवणाप्रति । सावध होइजे सभाग्यश्रोतीं । श्रीशुकवदनें कुरुभूपति । शापदुर्गति निस्तरला ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP