अध्याय ८५ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
N/Aश्रीगणेशाय नमः ।
अगाधैश्वर्यप्रकाशका । नमो गोविन्दा निष्कलंका । लाहतां तुझिया पदजलपंका । निरसे शंका द्वैताची ॥१॥
अध्याय चौर्यायशी पर्यंत । वाखाणिले इत्थंभूत । पंचायशाव्यामाजि अर्थ । तो संकेत अवधारा ॥२॥
मुनीश्वराचे आज्ञेवरून । सादर वसुदेवें आपण । संपादूनि यज्ञविधान । स्वसुत भगवान ओळखिले ॥३॥
पंचायशाव्यामाजि कथा । प्रार्थूनि वसुदेवें उभयसुतां । ज्ञानोपदेश जाला पुसता । तिहीं तत्वता प्रबोधिला ॥४॥
देवकीवसुदेवांप्रति जाण । वास्तवबोधें प्रबोधून । दिधले मृत पुत्र आणून । अध्याय इतुकेन समग्र हा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP