अध्याय ८६ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीगणेशाय नमः ।
तव पदपंकजफुल्लारलक्ष्मी । प्रकटे ज्याचिया हृदयसद्मीं । तो नर धनदा न गणी हेमीं । आगमीं निगमीं वाक्पतीतें ॥१॥
तीं पदें स्वर्चित माझिये ध्यानीं । रंगोनि प्रकट दिसती नयनीं । दृश्यविषयाभिलाषग्लानी । वेधें खंडूनि सांडियली ॥२॥
पदाब्जवेधें वेधलें मन । होऊनि ठेलें प्रत्यक्प्रवण । दृश्य मिथ्या विषयभान । असाच जाणोन उपरमलें ॥३॥
मग अक्षय अच्युताचा । गुणगणमहिमा कथनीं वाचा । योजिली तिणें भगवताचा । दशमस्कंध उपलवितां ॥४॥
देवकीच्या मृतपुत्रांतें । आणूनि दिधलें हरि अनंतें । हरिवरदें तें व्याख्यान पुरतें । वाखाणिलें यथामति ॥५॥
यावरी षडशीतितमाध्यायीं । परीक्षिति संतुष्ट होऊनि हृदयीं । सुभद्राहरणाची नवायी । परिसावया प्रश्न करी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP