शब्दालंकार - छेकानुप्रास
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या -
जेव्हां व्यंजनयुग्में जवळजवळ असति दोन ये न दुजें ॥
मध्यें अक्षर तेव्हां छेकानुप्रास बोलती कविजे ॥१॥
जो महिमहीपतीवर धरितो कल्याणकर करांनीं कीं ॥
राजन्यजन्य विजयी विराजतो तो गुणोदयें लोकीं ॥२॥
गद्य - जेव्हां दोनदोन व्यंजनें जवळजवळ दोनदां येतात, आणि त्यांचेमध्यें दुसरें अक्षर येत नाहीं, तेव्हां हा अलंकार होतो. जसें, दुसर्या आर्येत म्ह्. क्र्, ज्न्, ही व्यंजनें जवळजवळ येऊन मध्यें दुसरें अक्षर आलें नाहीं.
गद्य - साहित्यदर्पणकारांनीं या अलंकारालाच असें लक्षण दिलें आहे.
आर्या - व्यंजनसंघाचें जरि साम्य दिसे एकवार बहुविध तें ॥
तरि त्या अलंकृतीला छेकानुप्रास ह्मणति जे ज्ञाते ॥३॥
गद्य - यांत बहुविध ह्नणजे दोन प्रकारचें. स्वरुपानें व क्रमानें. त्यांनींच अनुप्रास याचें लक्षण असें दिले आहे.
आर्या - शब्दांचें साम्य जरी असतां स्वरविषमही अनुप्रास ॥
गद्य - फक्त स्वराचें सादृश्य अलंकारांत गणलें जात नाहीं. कारण त्यांत वैचित्र्य नसतें.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP