मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|पुरवणी अभंग| ८३११ ते ८३२० पुरवणी अभंग ८२९१ ते ८३०० ८३०१ ते ८३१० ८३११ ते ८३२० ८३२१ ते ८३३० ८३३१ ते ८३४० ८३४१ ते ८३५० ८३५१ ते ८३६० ८३६१ ते ८३७० ८३७१ ते ८३८० ८३८१ ते ८३९० ८३९१ ते ८४०० ८४०१ ते ८४१० ८४११ ते ८४२० ८४२१ ते ८४३० ८४३१ ते ८४४१ अभंग - ८३११ ते ८३२० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत अभंग - ८३११ ते ८३२० Translation - भाषांतर ॥८३११॥काय उपचार करुं पांडुरंगा । ऐसें मज सांगा निवडुनी ॥१॥कोण तो पदार्थ उणा तुह्मापाशीं । बोलाया वाचेसी मौन पडे ॥२॥शंकर शेषाद्री करिती स्मरण । तेथें माझें गाणें पुरों शके ॥३॥इंद्र सुरवर वाहाती सुमनें । तेथें म्यां वाहणें काय एक ॥४॥परी आवडीनें जोडूनी अंजुळ । बुका वाहूं माळ तुळसीची ॥५॥उणें पुरें तुम्ही करुन घ्यावें सांग । जिवालागीं मग सुख तेव्हां ॥६॥तुका ह्मणे माझी ऐकावी प्रार्थना । तुह्मी नारायणा सेवकाची ॥७॥॥८३१२॥नमस्कार तया माझा । नाहीं भाव ज्यापें दुजा ॥१॥संदेहाचे नांवें शून्य । वाढतां हा मार्ग पूर्ण ॥२॥सोंवळी ते झाली । शुद्ध वासना चांगली ॥३॥तुका ह्मणे पाय चित्तीं । ध्यातों सदा त्यांचे प्रीति ॥४॥॥८३१३॥पुराणीं बैसावया नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्र ॥१॥राजद्वारीं वेंची द्रव्याचिया राशी । नासरी द्विजासी देवूं न शके ॥२॥विषयाच्या गोष्टी सांगतां उल्हासे । नाम घेतां त्रास मनीं कैसा ॥३॥हातें मोर्या शोधी करी कष्ट नाना । देवाच्या पूजना कंटाळतो ॥४॥तुका ह्मणे धिग् ऐशीं त्यांचीं जिणीं । श्वान शूकराहुनी हीन लोकीं ॥५॥॥८३१४॥प्रपंचाची बेडी । तुजवीण कोण तोडी ॥१॥ऐसा दुजा नाहीं कोणी । मज काढी भयांतुनी ॥२॥संसाराचें ओझें । बहु पीडा करी मज ॥३॥येणें बहु केला बाधु । बुडवुनी भवसिंधु ॥४॥तुझें नाम दीनानाथा । आह्मां संसाराची व्यथा ॥५॥तुका ह्मणे बळ प्रोढीए । आम्हां भयांतुनी काढी ॥६॥॥८३१५॥पापी तो नाठवी आपुली करणी । देवासी निंदोनी बोलतसें ॥१॥करितां भिईना दोषांचे पर्वत । दुर्बुद्धि अभक्त दुराचारी ॥२॥खळवादी नेणे आपुल्या उचिता । बोल त्या अनंता लावितसे ॥३॥तुका म्हणे त्याच्या तोंडा लागो कांटी । नाहीं जगजेठी आठविला ॥४॥॥८३१६॥मानो न मानो तुज माझें हें करणें । काय झालें उणें करितां स्नान ॥१॥संतांचा मारग चालतों झाडणी । हो कां लाभ हाणी कांहीं तरी ॥२॥न तारिसी तरी हेंचि कोड मज । भक्ति गोड काज आणीक नाहीं ॥३॥करीन सेवा कथा नाचेन अंगणीं । प्रेमसुख धणी पुरलें तें ॥४॥महाद्वारीं सुखें वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥५॥तुका ह्मणे नाहीं मुक्तिसवें चाड । हेंचि जन्म गोड घेतां मज ॥६॥॥८३१७॥भिंवरेचे तिरीं मन माझें जाय । तेथें माझी माय पांडुरंग ॥१॥पांडुरंग माय पाहे जन्म जोडी । मनासी आवडी लागलीसे ॥२॥भेटीलागीं माझा झाला आहे हेत । पाहीन अनंत डोळे भरी ॥३॥डोळियासी तेव्हां वाटे समाधान । देखेन निधान पांडुरंगा ॥४॥तुका ह्मणे देई संगती शेजार । सर्व माझा भार वागवणें ॥५॥॥८३१८॥मोक्ष कैंचा नाम घेतां । अवघा श्रमचि मागुतस ॥कैंचा देव कैंची चिंता । काय दुश्चिता होउनी ॥१॥ऐसें संगती तरी कोणी । चित्त न घालावें भल्यांनीं ॥भजनी विक्षेप घडे क्षणीं । पापा दुणी होतसे ॥२॥बधीर तया ठायीं बापा । व्हावें दुष्ट शब्द आरोपा ॥तेव्हां चुकती जन्मखेपा । संसार सोपा तेणेंचि ॥३॥जया चित्ताची वासना । तेचि अंतीं मति ये जाणा ॥ स्वगतीच्या ऊण खूणा । यावांचून न कळती ॥४॥धरुनियां बळेंसी धीर । चित्त करुनियां एकाग्र ॥तुका ह्मणे पैल पार । नाम एक पाववी ॥५॥॥८३१९॥नामें तारिला वाल्मीक । जीवन्मुक्त झाला शुक ॥धुरु उपमन्युबाळक । नामें निष्कळंक तारिले ॥१॥नामें तारिला अजामेळ । नष्ट दुष्ट गणिका चांडाळ ॥गज नक्र मदें आंधळे । नेले कृपाळें वैकुंठा ॥२॥नामें तारिल्या सिंधुशिळा । नामें रक्षिलें गोलांगुळा ॥जळीं नेलिया पाताळा । नाम माळा सोडीना ॥३॥नामें तारिल्या गोपाळ गाई । शिळा मुक्त झाल्या पायीं ॥भीष्म शरपंजर घायीं । सामास राखिला ॥४॥नामें तारिली द्रौपदी । नाम तारक हें अनादि ॥तुका ह्मणे अक्षयपदीं । नाम सिद्धी पाववी ॥५॥॥८३२०॥नाम स्मरे प्रल्हाद । नाम जपे नारद ॥नामनिष्ठ रुक्मांगद । शेष गरुड हे दोन्ही ॥१॥नामें तरला बिभीषण । नाम स्मरतसे अर्जुन ॥उद्धवासी नारायण । आत्मज्ञान प्रबोधी ॥२॥परिक्षिती दिवसां साता । पांडवांसी स्मरण करितां ॥नाना संकटें पडतां । होय रक्षिता महादोषी ॥३॥याचि देहीं यया डोळां । नाम भेटवी गोपाळा ॥नाम सर्व साधनकळा । नाहीं आगळा याहुनी ॥४॥नाम शस्त्र हें निर्वाणीं । सर्व साधनकळा ।नाहीं आगळा याहुनी ॥४॥नाम शस्त्र हें निर्वाणीं । नाम नौका हेचि निदानीं ॥तुका ह्मणे चक्रपाणी । जीवदानी तारक ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP