श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
ज्या संगतीनेच विराग झाला । मनोदरीचा जडभास गेला । साक्षात् ईश्वर मज भेटविला । विसर कसा मी गुरुपादुकाला ॥
सद्योगपंथे घरी आणियेले । अंगेच माते परब्रह्म केले । प्रचंड तो बोधरवि उदेला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
चराचरी व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची । परंपदी संगम पूर्ण झाला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
जो सर्वदा गुप्त जगात वागे । प्रसन्न भक्ता निजबोध सांगे । सद्भक्तिभावाकरिता भूकेला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
अनंत माझे अपराध कोटि । नाणी मनी घालूनि सर्व पोटी । प्रबोध करिता श्रम फार झाला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
काही मला सेवनही न झाले । तथापि तेणे मज उध्दरीले । आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
माझा अहंभाव असे शरीरी । तथापि तो सद्गुरु अंगिकारी । नाही मनी अल्प विकार ज्याला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
आता कसा हा उपकार फेडू । हा देह ओवाळूनी दूर सोडू । म्या एकभावे प्रणिपात केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
ज्या वानिता वानिता वेदवाणी । म्हणे नेतिनेंति ती लाजे दुरुनि । नव्हे अंत:पार ज्याच्या रुपाला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
जो साधुचा अंकित जीव झाला । त्याचा असे भार निरंजनाला । नारायणाचा भ्रम दूर केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥
मंत्रपुष्पांजलि
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्य: संति देवा: ॥
ॐ राजाधिराजाय प्रमेह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मे कामानू कामकायाय महयं । कामेश्वरी वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्य स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात् सार्वभौम: ।
सार्वायुष आंतादापरार्धात् । पृथ्विव्यै समुद्रापर्यन्ताया एकराळिती । तदप्येषश्र्लोकोऽ भिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्
गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 07, 2019
TOP