मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|नवोन्मेष| साधक नवोन्मेष साधक नवी उमेद नवोन्मेष - साधक गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा साधक Translation - भाषांतर विठूराया विठूराया, आता थकलीरे काया ।मिळेल कां अवसान, मुखीं तुझे नाम गाया ?नाहीं पंढरीला आलो, वाळवंटीं विसावलो ।नामयाच्या पायरीला, हात लावोनी वाकलो ।शतयोजने चालून, मुखीं घोष, तुझे नाम ।नाहीं नाचलो दिंडींत, मागे पुढतीं होऊन ।परी सांगतो विठ्ठला, द्वेष पोटीं ना ठेविला ।कामक्रोधाचा उमाळा, दूर दूर रे सारिला ।वित्त मिळविण्यां कधीं, नाहीं बाळगिली हाव ।मन शुध्द ठेवोनियां, जोपासिला प्रेमभाव ।पंढरीच्या विठूराया, ऐशां निर्मळ साधकां ।ठाव आहे तुझ्यापाशीं, देशी काय एक मौका ।जगीं, व्यवहार सदा, बंधु-भावाचा म्या केला ।जगीं, मानव हा देव, तीच जाती, नाती मला । N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP