नवोन्मेष - नवी उमेद

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


वृध्दत्व ते येणार, येवू दे, तयां सुस्वागतम् ।
जे टळेना, साथ त्याची टाळणे, कैसें शुभम् ?
दिवस होते ते `जवानी', क्षितिज संपेना पुढे ।
विक्रमानें, दिपवि जनता, पद जिथें माझा पडे ।
बहरली स्वप्ने फुलांची, विश्व मोदें बागडे ।
ना मनीं शंका कधी ही, आत्मविश्वासां तडे ।
संपले दिन त्यां मनाचे, साउलीला शोधितो ।
त्राण ना त्याच्या शरीरीं, `माउलीला' भाकितो ।
भेट होतं, मंदिरी ती ओळखीची जाणुनी ।
प्रकृतीच्या कालजीची, चौकशी करणे जिणीं ।
ज्या प्रभावी, अक्षरांचा ओघ, हृदयांसी भिडे ।
तीच जिंव्हा, जाहली जड, शब्द नुमटे बापुडे ।
भार वाहे दशमुखांचा, लावुनीया चाकरी ।
तोच हा, वटवृक्ष झाला जीर्ण कोणी सावरी ?
काव्य - शास्त्र, विनोद वा, वाणी गुणी ज्यां लाभंली ।
बुध्दिवैभव नष्ट झाले, भ्रंश - विस्मृति जाहली ।
कोटिनामाचे पवाडे, वा करा तीर्थाटन ।
चित्त, एकाग्री असूद्या, घालवोनीया व्रण ।
कासया चिंता ? कुणांची ? सोडुनी दे यात्रिका ।
संथ पाऊल, चाल पुढती, निर्बंध होई `अनामिका' ॥
======

समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP