मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|अभंग| १६ ते १९ अभंग १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते १९ अभंग - १६ ते १९ महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी अभंग - १६ ते १९ Translation - भाषांतर अभंग १६ वास्थूळ हे जाणावें सूक्ष्मही मानावें । कारण ते पहावें आपल्या डोळां ॥१॥महाकारण तेथे मसुराप्रमाण । ओळखावी खूण गुरुपुत्रा ॥२॥ओळखील गुण त्यासी मोक्षप्राप्ती । नाही अधोगती कदाकळीं ॥३॥त्रिंबकनंदन बोले प्रारब्धाचा ठेवा । गुरु सखा व्हावा रामदास ॥४॥अभंग १७ वा त्रिकुट साधिले गोल्हाट भेदिले । श्रीहात देखिलें ज्ञानयोगें ॥१॥औटपीठामाजीं दिधलेंसे ठाणे । भ्रमर गुंफे रहाणें झालें सहज ॥२॥ब्रह्मरंध्राठायी मन झाले लीन । केलें अमृतपान सत्रावींचे ॥३॥जीव शिव दोनी केले एकाकार । बोले ज्ञानेश्वर तोचि योगी ॥४॥अभंग १८ वाषट्चक्रावरी त्रिकुटा अंतरी । त्रिवेणी सुंदरी गंगा वाहे ॥१॥तेथे स्नान संत करिताती नित्य । रज तम द्वैत संहारुनी ॥२॥त्रिवेणी शेजारी अनुहत गर्जे । ध्वनी ते विराजे सोहं शब्द ॥३॥ते स्थळ टाकोनी वरी जाय तुका । पांडुरंग सखा देखावया ॥४॥अभंग १९ वानावांचे माझारी औटपीठ शेजारीं । शून्याचे वोवरीं सुनिळ प्रभा ॥१॥जीवदशा माया अंगुष्ठप्रमाण । त्यावरी अज्ञान प्रवृत्तीही ॥२॥चैतन्याची मूस त्यामाजीं वोतिली । अव्यक्त पैकीं केली वरती तेथें ॥३॥ज्ञानदेव म्हणे यावर ते जाण । नाही नाहीं आण निवृत्तीची ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP