आरती सद्गुरुची । सुखकल्पतरुची । सच्चिदानंदनामें ॥
आता अतर्क्य रुपी ॥धृ०॥
देह हा सात वीती । ते मी ऐसी प्रतीती । नसोनि विश्वकर्ता ॥
दावी करुणामूर्ती ॥१॥
देहात्म बुध्दि खोटी । नासोनियां कोटि कोटि ।
ब्रह्मांड रचना हे दावीं माझिये पोटीं ॥२॥
संन्यासरुप देवें । धरिलें वासुदेवें । गुरुत्वे उध्दरीलें ॥
तया देवाधिदेवें ॥३॥
ज्या मनें आठवितों । मन तेंही तोची होतो ।
मी करुं काय आतां । माझें मीपणही तो ॥४॥
वामनें बुध्दिदेही । देहाएवढी तेही । स्वानंदसिंधु केली ॥
जेथे दैव नुर काहीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP