गोष्ट सव्विसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट सव्विसावी

जो मनुष्य दुसर्‍यासाठी त्याग करतो, त्याच्याच जगण्याला अर्थ असतो.

एकदा मी एका व्रताच्या पालनासाठी एका गावातील गरीब ब्राह्मणाच्या घरी राहात असता, एके दिवशी पहाटे तो ब्राह्मण व त्याची बायको यांच्यात चाललेला संवाद माझ्या कानी पडू लागला -

ब्राह्मण म्हणाला, 'आज संक्रांतीनिमित्त मी दान घेण्यासाठी बाहेरगावी जात आहे. तूही आज एखाद्या गरीब ब्राह्मणाला घरी जेवायला बोलावून त्याला काहीतरी दान दे.'

ब्राह्मणी भडकून म्हणाली, लग्न झाल्यापासून मला चांगले दागदागिने व उंची वस्त्रे तर सोडाच, पण सुग्रास अन्नही कधी खायला मिळालं नाही आणि त्या ब्राह्मणाला काय खायला घालू, तुमचं कपाळ ?'

ब्राह्मण शांतपणे म्हणाला, 'कांते, अगं धन हे इच्छेनुसार का प्राप्त होत असतं ? नाही ना ! तेव्हा आपल्याला जे मिळेल, त्यात समाधान मानावे आणि कुवतीप्रमाणे दान करावे. एखाद्या धनिकाने भरपूर धनाचे दान केले आणि एखाद्या गरीबाने जरी एका कवडीचे दान केले, तरी दोघांच्या पदरात पुण्य सारखेच पडते. शास्त्र तर असं सांगतं -

दाता लघुरपि सेव्यो भवति न कृपणो महानपि समृद्ध्या ।

कूपोऽन्तः स्वादुजलः प्रीत्यै लोकस्य न समुद्रः ॥

( दाता हा जरी क्षुल्लक असला तरी तो सेवेला पात्र होतो आणि कृपण हा जरी कितीही श्रीमंत असला, तरी तो सेवेला पात्र होत नाही. [अथांग जलसंपत्ती असलेला] सागर नव्हे, तर गोड्या पाण्याची छोटी विहीरच लोकांच्या प्रेमाला पात्र होते.)

'कांते, संपत्ती ही सावलीसारखी बेभरंवशाची असते. ती कधी असते, तर कधी नाहीशी होते. पण दानापासून मिळणारे पुण्य चिरकाल साथ देते. मात्र ते दान सारासार विचाराने करायला हवे. म्हटलेच आहे -

सत्पात्रं महती श्रद्धा देशे काले यथोचिते ।

यद्दीयते विवेकज्ञैस्तदनन्ताय कल्पते ।

(योग्य स्थळ व काळ विचारात घेऊन, सत्पात्र व्यक्तीला विवेकी माणसे जे दान मोठ्या श्रद्धेने करतात, त्याचे फळ - म्हणजे पुण्य - अनंत काळपर्यंत टिकते.)

तो ब्राह्मण पुढं म्हणाला, 'कांते, केवळ धनाचीच नव्हे, तर कुठल्याही गोष्टीची हाव, जीवन जगता येण्यापुरत्या मर्यादेत हवी. तिचा अतिरेक झाला, की त्या कोल्ह्याच्या मस्तकातून जसे धनुष्याचे टोक शेंडीसारखे बाहेर आले, तशी प्राण्याची गत होते.'

'ती गोष्ट काय आहे?' अशी विचारणा त्या ब्राह्मणीने केली असता ब्राह्मण म्हणाला, 'त्याचं असं झालं-

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP