बा. भ. बोरकरांचे संपूर्ण नाव - बाळकृष्ण भगवंत बोरकर. त्यांचा जन्म १९१० साली तर देहावसान १९८४ साली झाले.
ते रविकिरण मंडळानंतरच्या पिढीतील प्रसिद्ध कवी होत.
त्यांचे प्रमुख कविता संग्रह - चित्रवीणा, दूधसागर, कांचनसंध्या, अनुरागिणी, चैत्रपुनव इत्यादी.
त्यांचे प्रमुख ललित गद्य - भावीण, मावळता चंद्र, घुमटावरचे पारवे, संपातीचे पंख इत्यादी.
त्यांना भारत सरकारचा ’पद्मश्री’ तसेच महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार मिलाले आहेत.
बोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक
पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून येतो.