शिणलें भागलें माउलीच जाणे । सुखदुःख नेणे बाळ कांहीं ॥१॥
क्षुधाकाळीं अन्न आवडे ज्या वेळे । तृष्णा लागे जळ देऊं जाणे ॥२॥
दुःख निवारुनी सुख द्यावें परी । वर्ते घराचारीं चित्त तेथें ॥३॥
लेंकरासी होतां कांहीं जडभारी । नलगे संसारीं धड कांहीं ॥४॥
तुका म्हणे सर्व विषयीं संपन्न । बाळकाची खूण मातेपाशीं ॥५॥