सुख असता दुःख मज देता मी कुळवंताची कांता
रूप लावण्य दुसरी पाहाता ॥
तुम्ही का हो तिच्या गृहि राहाता ॥ध्रु०॥
रूप स्वरूप तुझे पाहुनिया ॥
मन धाले आले धावुनिया
आज माझे मन मोहुनिया ॥
कसे जाता दिप मालउनिया
चातुर सगर पाहुनिया ॥
भ्रातिची गुढी खोलोनिया
स्वप्नांत मूर्ति पाहुनिया ॥
मन रिझले तुम्हास पाहाता ॥१॥
तसबिर लेहुनिया ठेवते ॥
मन माझे प्रसिद्ध होते
धाउनिया तुम्हाकडे येते ॥
फंदीच्या रूपाला चाहाते
द्रिष्ट होईल पलंगी नेते ॥
मसी भोग बसुन एकांते
मसि ध्यास लागला तुमचा ॥
सोडून आता कुठ जाता ॥२॥
म्या आशावंत स्वामिची ॥
पूर्वावी अस्ता मनिंची
उभयता जोड प्रितिची ॥
शोभन धुळि पायाची
आलि घटका वेळ ऋताचा ॥
घ्या साधुन घडि लाखाची
लोभ नाही तुजवर सत्ता ॥
दिस गेले पाहाता पाहाता ॥३॥
झड पडोनि गळा आज पडले ॥
तुम्ही लाल मि लालडी जडले
लई दिवसा सजन सापडले ॥
छातिवर गेंद थरथरले ॥
आज मजकडे येणे घडले ॥
कसी सोडू तुम्हास भिडले
भाउसगन गुणीजन गाती ॥
आज भजा तुम्ही सिद्धनाथा ॥४॥