समारोपानंतर दंपती प्रवास करतील आणि गावाची सीमा व नदी यांचे उल्लंघन करण्याची वेळ येईल तेव्हा दोघांनी अथवा एकाने समिध इत्यादिकाला स्पर्श करावा. न केल्यास अग्निनाश होतो. खुद्द यजमानालाच प्रवास करण्याचा असेल तर कृत्य
"अभयं वोभयं येस्तु०" या मंत्राने अग्नीचे उपस्थान करून प्रवासाला निघावे. प्रवासाहून परत आल्यावर
"गृहा या बिभीतोपवः स्वस्त्येवोस्मासु च प्रज्यध्वं या च वो गोपतीरिषत"
या मंत्राने स्वगृह अवलोकन करून
"गृहानहं सुमनसः प्रपद्ये वीरघ्नो वीरवतः सुवीरान । इरां वहन्तो धृतमुक्षमाणास्तेष्वहं सुमनाः संविशामि ॥"
हा मंत्र म्हणून गृहामध्ये प्रवेश करावा. नंतर
"शिवं शग्मं शंयोः शंयोः"
हा मंत्र तीन वेळा म्हणून पाठीमागे पहावे. नंतर नित्यहोम केल्यावर
"अभयं बोभयं येस्तु०"
या मंत्राने अग्नीचे उपस्थान करावे. ज्येष्ठ पुत्राचे शिर दोन हातांनी घेऊन
"अङ्गदङ्गात्संभवसि०"
हा मंत्र म्हणून तीन वेळा टाळू हुंगावी. याप्रमाणे इतर पुत्र व अविवाहित कन्या यांचीही टाळू मंत्रांवाचून हुंगावी. प्रवासाहून आलेल्या माणसाला खात्रीने माहीत असे असले तथापि अप्रिय त्या दिवशी सांगू नये.
पति प्रवासात असताना पत्नीने स्मार्तहोम स्वतः करीत जावे व दर्शपूर्णमास, स्थालीपाक व पिंडपितृयज्ञ ब्राह्मणाकडून करवावे. अग्निनाशाचे प्रायश्चित्त वगैरे पत्नी रजस्वला असताही ऋत्विजाने करावे. पुनःसंधान मात्र पति प्रवासात असता होत नाही. तसेच नैमित्तिक इष्टि, गृहदाहेष्टि व जातेष्टि याही होत नाहीत; आणि प्रायश्चित्तेष्टीची पूर्णाहुति होत नाही.