हरिचरणसरोर्जी चित्सुधासारपानें
क्रमर परमयोगी गुंजती नामगानें
हरति सकळ दुःखा हीं सरवाचीं निधानें
वद वद वद जिव्हे वासदेवाभिधानें ॥१॥
हरिपण हरिनामें धातुमूर्तीसि आलें
हरिमय हरिनामें विश्व संतांसि झालें
भवभय हरिनामें साधकांचें पळालें
वद वद वद जिव्हे रामनामें रसाळें ॥२॥
हरितनु हरिनामें लेखिली सर्वभक्तीं
सहज - सुखनिधानीं देखिली ही विरक्तीं
शुक सनक मुखीं जीं गाइलीं जीत - मुक्ती
वद वद वद जिव्हे टाकुनी लोकिकोक्ती ॥३॥
निगमहि हरिनामें गर्जती वर्णवर्णीं
पतित तरति नामें आश्रमी आणि वर्णी
हरिपदिं हरिनामीं जेविं मुद्रा सुवर्णी
जगिं कवण असा जो नाममाहात्म्य वर्णी ॥४॥
आकाश - अंत न कळोनिहि अंतरिक्षीं
आकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षी
नामप्रतापहि यथामनि याच रीती
सीमा न पावति तथापि मुनींद्र गाती ॥५॥
उडति मानसहंस जया नभीं
शलभ त्याचि नभीं उडतां न भी
अजित - नाम - महत्त्व ऋषि श्रुती
वदति तेंचि वदेन यथामती ॥६॥
श्रुति - निगम - पुराणें - आगम - क्षीरसिंधु
मथुनि अमृतरुप ग्रंथ हा दीनबंधु
प्रकट करिल आतां वामनात्मा मुरारी
श्रवण - पठनमात्रें जो सभ स्तांसि तारी ॥७॥
हा ग्रंथ याचिकरितां अमृताभिधानी
नामें प्रसिद्ध हरिनामसुधा म्हणोनी
जें नाम गोड महिमा अति गोड त्याचा
जो वर्णितां अमृतरुप परादि वाचा ॥८॥
मोक्ष श्रुती वदति ज्यास गुणप्रसादें
तो पावतो सगुण नामसुधानुवादें
कोण्त्द्या मिसें करुनियो हरिनाम वाचे
नेत्र प्रकाशति तयावरि माधवाचे ॥९॥
नारायणा म्हणुनि एक सतासि वाहे
नारायणारव्य नर अन्य तयासि पाहे
नारायणा म्हणति लोंकिकही प्रवाहीं
नारायणाऽक्षि विषय क्षण होति तेही ॥१०॥
आधींच साक्षि सकळांसिहि पाहताहे
जो नाम घे करुण होउनि त्यास पाहे
तो धन्य कीं क्षणहि ज्यावरि विष्णुदृष्टी
थेंबीं तळें भरतसे करुणांबुवृष्टी ॥११॥
कर्मानुरुप फळदायक साक्षि दृष्टी
सर्वावरी तसिच तत्करुणांबुवृष्टी
आहे परंतु जनपातक आड जेथें
क्षेत्रें सुधेकरुनि त्या भिजवी न तेथें ॥१२॥
छाये सही सूर्य जसा प्रकाशी
जाणे तसा साक्षिहि पापराशी
वृष्टीसही तोचि करी तथापी
क्षेत्रासि आछादिति लोक पापी ॥१३॥
नकळताहि पडे हा विष्णुनामाग्नि जेथें
दुरिततृणगृहाचें भस्म होणार तेथें
मग समकरुणेची आयती कृष्णदृष्टी
भिजविल करितेजे सर्वसृष्टयर्थ वृष्टी ॥१४॥
जसें हेममुर्तीमधें हातपायीं
दिसे एक सोनेंचि तें सर्वठायीं
असा विश्वरुपें स्वयें शेषशायी
स्वनामें जना होतसे सौरव्यदायी ॥१५॥
घटादीक नारायणाचींच नामें
तर्हीं तींअविद्यामयें दुःखधामें
म्हणोनी पुराणप्रसिद्धें विचित्रें
जगत्यावनें विष्णुनामें पवित्रें ॥१६॥
महाभारतीं ये रिती धर्मराजा -
प्रति श्रीपती देखतां भीष्म आजा
वदे कीं ऋषी वर्णिती जे पुराणीं
धरावी तया विष्णुनामीं शिराणी ॥१७॥
श्लोकार्थ तो कीं तुज भूमिपाळा
सांगेन ते मी हरिनाममाळा
जेथें प्रसिद्धें गुणकर्मरुपें
नामें पवित्रें महिमाप्रतापें ॥१८॥
श्रुतिस्मृतीलागिं महापुराणीं
व्यासादिकांच्या वदताति वाणी
नामें हरीचीं तुजतींच राया
सांगेन सर्वासहि उद्धराया ॥१९॥
महात्मयाचीं तुज नामधेयें
सांगेन विख्यात मुनीद्रेगेयें
म्हणोनि भीष्मोदित पद्य जेथें
माहात्म्य शब्दें गहनार्थ तेथें ॥२०॥
महात्मा हरी जो अशेयात्मभावें
घटादीक तेव्हां तयाचींच नावें
तर्हीं तारकें तीं जगाला न होती
जगत्पावनें जीं ऋषी वेद गाती ॥२१॥
म्हणोनि विख्यात मुकुंदनावें
जीं वणिर्ती वेद मुनीद्र भावें
सांगेन तींमी तुज भूमिपाळा
प्रसिद्ध जे माधव - नाम - माळा ॥२२॥
थाकारणें जीं हरिनामधेयें
वेदीं पुराणीं मुनिवर्यगेयें
ज्या त्या मिसें उद्धरिती जनाला
जाळूनियां पाप - महा - वनाला ॥२३॥
भाषांतरी कल्पित नाम जेथें
श्रद्धानुरुपेंचि फळेल तेथें
प्रताप नैसर्गिक त्यास नाहीं
प्रसिद्ध नामीं फळ नेणतांही ॥२४॥
हें सर्व आपण चराचर देववर्य
श्रीकांत कारण सुवर्ण समस्त कार्य
नामीं स्वयें प्रगटतो भलत्याचि ठायीं
या भूषणीं कनक केवळ शेषशायी ॥२५॥
जगत् कार्य तो कारण श्रीमुरारी
स्वयें तोचि सर्वी वसे निविकारी
स्वरुपें स्फुरद्रूप सर्वत्र आहे
मुखीं नाम ज्याचें तयालागिं पाहे ॥२६॥
अलंकार तो मागतां हेम आला
नव्हे हेम हें बोलवेना तयाला
असीं रामकृष्णादि पुत्रादि नामें
तर्हीं सर्वही माधवाचींच धामें ॥२७॥
मागे अलंकार सुवर्ण त्याला
दे केविं सोनार सराफ बोला
उच्चारिने लौकिक शब्द वाणी
ज्याची तया दुर्लभ चक्रपाणी ॥२८॥
न सोनें अलंकाररुपास साहे
मृषा त्या सुवर्णात जो भासताहे
असे हेग मिथ्या अलंकाररुपी
सुवर्णी अलंकार नाहीं तथापी ॥२९॥
अलंकारनामें नये हेम हाता
अलंकार येतो स्वयें हेम येतां
समस्तांसही साधनी विष्णुनामें
न विष्णूस ही बाधती दुःख धामें ॥३०॥
या कारणें हरि म्हणाल जयासि जेवें
सर्वात्मते करुनि सिद्ध मुकुंद तेथें
बोलावितां निज - शिसूसिच त्याचि नावें
विख्यात अन्य नर ओ म्हणतो स्वभावें ॥३१॥
पृथ्वीछंद - सुवर्ण म्हणतां जसें कनककुंडलीं तें दिसे
मुकुंद म्हणतां तसा जनसुतादिकी तो असे
सतादि - सकळात्मने - करुनि वर्ततो जो हरी
अशेष जनपानकें करुनि तो स्वभावें हरी ॥३२॥
अजितनाम वदो भलत्या मिसें
करि कृतार्थ अमोध - सुधारसें
करुनि शाकहि भक्षिल औषधी
न करिते गुण हें न घडे कधीं ॥३३॥
न कळतां पद अग्निवरी पडे
न करि दाह असें न कधीं घडे
अजितनाम वदो भलत्या मिसें
सकळ पातक भस्म करीतसे ॥३४॥
श्रीविष्णुधर्मी मुनि वेचिरीरी
औरव्यापिती कीं जरि दुष्टचित्तीं
तो आठवीनां हरिपाप नाशी
नेणोनिही अग्नि तृणादि - राशी ॥३५॥
हरी आठवीला जरी दुष्टचित्तीं
हरी पापमूळा कुमार्गप्रवृत्ती
कळोनी जरी आठवीजे मुरारी
हरी पातकें तो असीं याप्रकारीं ॥३६॥
न ठावा हरी आणि ठावीं न नावें
अशाच्या मुरवा नाम आलें स्वभावें
अनिच्छेकरुनी मुरवा नाम आलें
हरी मानितो कीं मला आठवीलें ॥३७॥
नसे द्वैत सर्वासही स्वात्मभावें
हरी आठवे आठवाच्या स्वभावे
तयाचेचि वाचेसही नाम जेव्हां
नरें त्या हरी आठवीलाच तेव्हा ॥३८॥
जर्हीं स्वात्मभाव स्फुरे सर्वभूतीं
स्फुरे तो अहंकार रुपीच चित्तीं
अहंशब्द जेथे स्फुरे नाम तेथें
स्मृति श्रीहरीची असे सिद्ध जेथें ॥३९॥
असाही हरी आठवीतील पापी
हरी तो हरी सर्व पापें तथापि
असा आठवीनो अनिच्छेकरुनी
तर्हीं नोकरी शुद्ध पापें हरु नी ॥४०॥
म्हणोनेच कीं अग्नि दृष्टांत येथें
न जाणोनिही घालितां भस्म तेथें
न जाणोनिही नाम याचेसी आलें
स्वभावें तर्हीं पाप त्याचें जळालें ॥४१॥
न जाणे शिशू अग्निची शक्ति कांहीं
जळो तूळ इच्छा असी त्यासि नाहीं
तर्ही घालितां अग्नि कार्यासराशीं
जळे ये रिती नामही पाप नाशी ॥४२॥
शिशुकरें अनळें कडवाजळे
सहज अंगणिं दीसनसे वल्हे
परि घरांतिल बीजहि आडळे
नजळती कणगींतिल जोंधळे ॥४३॥
विषयभोग - सुखात्मक - कामना
सहज वेष्टुनियां असते मना
मन कुकर्म तिच्याच बळें करी
सकळपानकमूळ अशा परी ॥४४॥
हुडकुनी असी कुत्सित कामना
निजवरी हरिनामहुताशना
जरि अमंगळ चित्तहि घालिनी
सकळ पातक बीजहि जाळिती ॥४५॥
न करुं पातक निश्वय हा घडे
मन तथापिहि पापपथीं पडे
जरि धरी हरिनाम कवित्व हें
अशुभही शुभ होइल चित्त हें ॥४६॥
जन न इत्सुनि श्रुद्धि असी जरी
न कळतां हरि आठवितां तरी
जळति पापकुळें अनळे जसीं
न कळतांहि तृणें जळती तसीं ॥४७॥
येथें म्हणालु जळती जरि सर्व पापें
मूळें न कां जळति नाममहाप्रतापें
नेणोनि नाम म्हणतां दुरिनासि जैसें
जाळी न कां सकळ पानकमूळ तैसें ॥४८॥
धातूवरी अनळ नेणत बाळ घाली
तो अग्नि धातुमळ तो अनिशीघ्र जाळी
ताम्रादि भस्महि तया अनळेंचि जेव्हां
कर्ना अभिज्ञ बहु जाळिल धातु तेव्हां ॥४९॥
पृथ्वी०- न जाणनहि ये मुरवा हरि तथापि पापें हरी
स्मरोनि महिमा स्मरे वदनिं तींचि नामें जरी
प्रवृनिविषयीं जरी असनि त्यां जनाचीं मनें
विरक्त करितो हरी स्वगुण - नाम - संकीर्त्तनें ॥५०॥
श्रीभद्भागवनीं अजामिळकथा व्यासें नृपातें शुकें
नामाचा अमित प्रताप वदतां हें वर्णिलें कौंतुके
तेथें निर्णय विष्णुदूत वदनी तो वामनाच्या मुरवें
तेथें नामसुधेंत वर्णिल हरी श्रोत्यांस जेथें सुरवें ॥५१॥
अध्याय तीन इतिहास महापुराणी
टीका तदर्थ - वचना क्षितिलोक वाणी
अध्याय एथ तितुकेच करी मुरारी
तीहींसही चरण सुंदर चार चारी ॥५२॥
अध्याय तो प्रथम नामसुधेंत तेथें
त्याही मधें चरण हा पहिलाचि एथें
संपूर्ण अर्पुनि मुकुंदपदारविंदीं
सर्वात्सने करुनि वामन त्यास बंदी ॥५३॥