|
पु. ( ल .) ( बायकी ) पति ; नवरा . ' एकादां चेष्टेनें का होइना , खुद्द दादाला विचारलें दिखील .' - गांढवांचा गोंधळ ( प्रफुल्लता १२ . ७ . २४ ) - सना . स्वत ; - वि . १ स्वतःचा ; मालकीचा ; खासगी ; जातीचा ; आत्मीय ; खासगत . २ ( जोर व दुजोरा देण्यासाठीं ) खास स्वतःचा ' घर खुद माझें .' ३ ( ल .) विशेषत ; राजाचा . क्रिवि .) स्वतः , जातीचें . ( फा . खुद ) सामाशब्द - अख ( यख्ति ) यार - पु . स्वेच्छा . ' हें सल्ला हानें झालें किंवा खुद्दख्तियारानें ?' - रा ५ . ५१ . ( फा . खुद + इख्तियारी ) ०असामी पु. १ स्वतःच्या नांवानें , हिंमतीनें पुढे येणारा मनुष्य २ स्वकर्तृत्व ; स्वोर्जितत्व . ०खर्च पु. खास राजाचा अथवा दुसर्या एखाद्याचा खासगी खर्च . याच्या उलट सरंजामी खर्च किंवा डौल . ( लष्करी खर्च , राज्याचा खर्च , सरकारी खर्च इ० ) ०खातें न. ( जमाखर्च ) लिहिणारांचें स्वतःचें स्वतंत्र खातें . ०खासा विक्रिवि . ( मी , तुं , तो , इ० ) स्वतः , जातीनें . ( फा . खुद + खासा ) ०खुद क्रिवि . स्वतःच ; आपण होऊन . ०गर्ज - वि . अप्पलगोट्या ; स्वार्थी . ०गर्जी स्त्री. स्वार्थ ; अप्पलपोटेपणा . ' खुदगर्जीवर नजर देऊन .' - ख . ७ . ३५७० . ०जातीनें क्रिवि . स्वतःच ०निसबत वि. १ स्वतःसंबंधी . २ स्वतःवर अवलंबित ; स्वांकित ; ( खुदनिसबत याचा अर्थ आणखीहि खुद या उपसर्गाप्रमाणें करतात ). म्ह० काम सरकारनिसबत दावा खुदनिसबत - काम सरकारचें पण त्यांतील दोष मात्र स्वतःचें ०निसबतीचें न. ( कायदा ) ( आजचें ) प्रिव्हि कौन्सिल . मंत्रिमंडळ न. ( कायदा ) ( आजचें ) प्रिव्हि कौन्सिल . ०पसंती दी - स्त्री . १ स्वतःची मान्यता . २ ( ल .) अहंमन्यता ; गर्व . ' बाईचा प्रकार खुदपसंतीचा आहे .' - मदबा१ . १८८ . ०सनद स्त्री. स्वत ; राजाकडुन किंवा मुख्य अधिकार्या कहन मिळालेली सनद .
|