-
क्रि.वि. काळजीनें ठेवलेलें . ( क्रि० करणें ; ठेवणें ; राखणें ; असणें ). तुझा पैका मजकडे जतन आहे .
-
स्त्री. निगा ; जपणूक ; तत्परता ; काळजीपूर्वक रक्षण ; संरक्षण ; संगोपन . हें आतांजतन करी नाम । - तुगा १६४८ . जतन करीगे याचें स्वाधिन केला न कापितां नाळ । [ सं . यत्न ] जतनेस , नाईस , ठेवणें , घालणें , असणें - कोणाच्या स्वाधीन काळजीनें उपचार होण्यासाठीं संरक्षण होण्यासाठीं ठेवणें . जतनाविणें - सक्रि . काळजी घेणें ; रक्षण करणें ; शुश्रूषा करणें ; सुरक्षित राखणें . जतने - क्रिवि . ( कु . ) संभाळून , जपून , सावधगिरीनें . बुळबुळीत झाड आहे , जतने चढ . जतने , ऊन - क्रिवि . ( कु . ) काळजीपूर्वक ; सावधगिरीनें ; निगा राखून . [ जतन ]
-
ना. जपणूक , जोपासना , निगराणी , निगा , पालनपोषण , प्रतिपाळ , संगोपन , संरक्षण .
-
जतन तेथे पतन
Site Search
Input language: