पु. - द्वेष ; वैर ; मत्सर ; शत्रुत्व . कळी करि सुनिर्मळी परम उग्र दावा नळी । - केका २१ . आमरण पांडवासी माजा निर्विग्न चालिला दावा । - मोगदा ९ . १५ .
- भांडणतंटा ; कज्जा .
- ( एखाद्या वस्तूवरील ) मालकी ; न्याय्य अधिकार , हक्क . हे घर म्यां तुला दिले , याजवर माझा दावा राहिला नाही .
- ( कायदा ) न्याय मिळविण्याकरितां , हक्क प्रस्थापित करण्याकरितां दिवाणी कोर्टात चालविलेला खटला , कज्जा , फिर्याद ; ( इं . ) प्लेंट .
- दुसर्याच्या विरोधामुळे ( एखाद्या पदार्थावर ) स्वत्त्व प्रतिपादन करण्याचा व्यापार . तो अलीकडे या गांवावर दावा सांगतो .
- मागणी . राजे आपले इमान राखून ऐवज अदा करितील तरी व्याजाचा दावा करणार नाही . - पया ४०० .
- हल्ला ; बळकट झाले म्हणजे ... दावे दरवडे करावे . - मराआ २२ .
- सापाचा डंख . सर्प बारा वर्षे दावा राखितो . [ अर . दआवा ; गु . दावो ] ( वाप्र . )
पु. ( सोनारी .) मासोळीचा ठसा . ( इं . डाय )
०उगवणे, घेणे ( एखाद्याने केलेल्या अपकारांचा ) सूड उगविणे ; ( एखाद्याने ) केलेल्या अपकारांचे उट्टे काढणे .
०गाणे, सांगणे (एखाद्यावर) सूड उगविण्याबद्दल धमकी देणे .
०तोडणे कज्जा मिटविणे ; ( हक्कासंबंधी भांडणाचा ) निकाल लावणे .
०धरणे द्वेष करणे ; मत्सरबुद्धि बाळगणे ; डाव , दांत धरणे .
०रद्द - फिर्याद गुदरणे .
करणे - फिर्याद गुदरणे .
०साधणे - यशस्वी रीतीने सूड उगवून घेणे .
- फिर्याद जिंकणे . म्हणे तुकयाने साधिला दावा । न्याय सांगावा कवणासी ।
उभा दावा कट्टे वैर ; हाडवैर . सामाशब्द -
०दरफडा पु. आरडाओरड करुन धमकावणे ; दपटशा देणे ; खडसावणे ; चरफडाट ; दंडेलीचे , उर्मटपणाचे बोलणे . ( क्रि० करणे ; मांडणे ; कर्माची षष्ठी योजतांना गाणे ह्या धातूचा प्रयोग ). [ दावा + दरफडणे ]
०द्वेष पु. मत्सर ; वैर ; ( सामा . ) मत्सर ; द्वेषबुद्धि . ( क्रि० होणे ; करणे ) [ दावा + द्वेष ]
०हेवा पु. मत्सर व द्वेष . ( प्र . ) हेवादावा . [ दावा + हेवा ]
दावेकरी, ०खोर, ०दार वि . - मत्सर , द्वेष ,
शत्रुत्व करणारा ; वैरी . चहूं पादशहाचे आपण दावेदार . - सभासद ४५ .
पति नव्हे हा दावेकरी । पूर्वील जन्मांतर साधिले ।
- ( एखाद्याजवळ आपल्या
) हक्काची मागणी करणारा ; हक्क सांगणारा ; हक्कदार .
- धनको .
- पूर्वीच्या काळी फिर्यादीने गावपंचायती पुढे फिर्याद केली व पंचायतीने जर
त्याचे भांडण मिटविले नाही व त्या फिर्यादीस सरकारांत अपील करण्याची ताकद
नसली तर तो शेजारच्या गांवी जाऊन राही व तेथून स्वतःच्या गांवांत लुटालूट
करीत असे , तशा प्रकारचा ( मनुष्य ). [ फा . दआवा - दार ]
दावेदादी वि . द्वेष , मत्सर करणारा ; वैरी . [ दावेदार ]
दावेदुश्मन , दावेदुस्मान पु . शत्रु ; वैरी ; मत्सर , दावा करणारा .