|
पु. चपराकेचा जो मोठा प्रहार तो . रपदिशी आवाज होऊन मारलेला , गपका ; गुद्दा . कुरुपतिस दिला भीमें उग्र गदेचा असा रपाटा कीं । - मोगदा ३ . २२ . एखाद्या वस्तूचा आकार सामान्य आकारापेक्षां एकदम मोठा दिसल्यास योजतात . केवढी थोरली रपाटा भाकर हो ! वेग , चलाखी , भयंकर जोर जींत आहे अशी क्रिया . झपाटा पहा . रपाटणें , रपटणें - क्रि . दपटणें ; रगडणें . एखादी गोष्ट , एखादें काम तडकाफडकी , घाईघाईनें आणि आचरटपणानें करणें ; त्वरेनें करुन टाकणें . उदा० हांकत रहाणें , ढकलणें , हात उगारणें , बलात्कार करणें इ० . रगडणें पहा . [ रप ] रपाटखान - वि . सामान्य प्रमाणापेक्षां , नेहमींच्या अगर योग्य आकारापेक्षां भयंकर वाढ झाली असतां योजावयाचा शब्द ; गबदुलखान [ रप , रपाटा ] रपाटून - क्रिवि . सपाटून . रगडून पहा . [ रपाटणें ] रपाट्या - वि . रगड्या पहा . [ रपाटणें ]
|