|
अ.क्रि. १ सुंदर , चांगले , सुरेख दिसणें , कांतिमान , तेजयुक्त , तेजस्वी , सौंदर्ययुक्त असणें . शोभित कानीं जडिता निराळ्या । - सारुह ६ . २४ . २ साजणें , योग्य , शोभायमान दिसणें ; ठीक होणें ; युक्त दिसणें . हें लहान मुलांनांच शोभून जातें . - नीतिशास्त्र ७७ . शोभेल तें करावें पचेल तें खावें . [ सं . शुभ् ] शोभन - न . १ विभूषण ; सुंदर , तेजस्वी , क्रांतिमान दिसणें , असणें , करणें . २ मंगलकार्य ; उत्सव ; समारंभ ; सिद्धि न पवेची गे शोभन । वायां गेलें वरमायपण । - एरुस्व १२ . ६ . ३ ( सांके ) गर्भधान , फळशोभन ; मैथुन . शोभनासि नेल्या वस्त्रें पेटया । - निगा १८२ . ४ ( सांके शुभ शब्द ) इम्धन ; शुभकार्यासाठी , होमासाठी वगैरे वापरावयाचे सरपण , जळण . - पु . सत्तावीस योगांतील पांचवा योग . पत्रिका - स्त्री . लग्न चिठठी . राजा शोभनपत्रिकेसी । अति उत्छायें पाठवी । - वेस्वीव ६ . ११ . शोभनिक - वि . शोभा देणारें . मुखामुख शोभनिक । श्लेष्मागमनें शिणलें नाक । - एरुस्व ७ . २६ . शोभनीय - व सुंदर . शोभमान - वि . सुंदर ; चकचकीत ; तेजस्वी ; तेजःपुज ; कांतिमान ; दीप्तिमान . शोभवणा - वि . सुंदर ; देखणा ; दिखाऊ . शोभविणे - सक्रि . सुशोभित करणें ; सजविणें ; शृंगारणें ; सौंदर्ययुक्त करणें शोभा - स्त्री . १ सौंदर्य ; सौष्ठव ; दर्शनीयत्व ; देखणेपणा . २ तेज ; कांति ; तजेला ; प्रभा ; रूप . संपत्ति जातांच दारिद्रयाची शोभा दिसूं लागली ३ सौंदर्यवर्धक वस्तु , अलंकार , भूषण , पदार्थ . शोभा करणें - क्रि . भूषविणें ; ( उप . ) व्याजोक्तीने , फजीती करणें ; अपमान , अवहेलना करणें ; चिंतोपंत वगैरे तीन असामींस शोभा करून किल्लावर टाकणार . -- ख ५१३० . शोभा होणें - फजीती करणें . तुमची नकोका शोभा व्हायला ? - भा २५ . शोभाथिणें - अक्रि . शोभणें ; सुंदर दिसणें म्हणोनि ते शोभाथिले । - रास ४ . ५४ . शोभादायक - वि . भूषविणारा ; शोभा देणारा . परि विद्येसम एकहि शोभादायक नसे अलंकार . - विद्याप्रज्ञंसा . शोभायमान - धावि . ( प्र . ) शोभमान ; शोभणारा ; सुंदर ; सुशोमित . [ सं . शोभमान ] शोभित - धावि . सुशोभित ; भूषित ; सजलेला ; थाटलेला . शोभिवंत - वि . शोभायुक्त ; सुंदर ; देखणा ; सुरेख ; तेजस्वी .
|