|
न. १ सामुग्री ; साधनें ; उपकरणें ( एखाद्या वस्तूच्या , कार्याच्या उत्पादन - निर्मिति - उभारणी इ० ला लागणारीं ). उदा० लग्नाचें - मुंजीचें साहित्य . - मोकर्ण २० . ३९ . २ सहवास ; संगत ; स्नेह . साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती एक । - दा ८ . २ . ३९ . ३ संबध ; ऐक्य ; संघ . ४ साहाय्य ; मदत . संसप्तक मथुन जय हि साहित्य करावें - सिंब ५१ . ४ ( सांकेतिक ) तेल ( विशेष प्रसंगीं , प्रभातसमयीं इ० ). ५ अलंकारशास्त्र ; अलंकार . ज्ञा १ . ६ . ६ काव्य , नाटय , कथा , लालित्य यांचा समावेश असलेली वाङ्मयशाखा . साहित्याचिया खेडकुलिया । - शिशु २६ . - एभा १ . १०१ . ७ ( व्यापक ) वाङ्मय ; सारस्वत . [ सं . ] ०पत्र न. मदतीची शिफारस करणारें पत्र , दाखला . नव्या अमंलदाराच्या मदतीसाठीं अशीं पत्र देत . - भाअ १८२२ . मारवाडी भीमसिंग आणखी बहुत छोटे मोठे सरदार यांस साहित्य पत्रें दिलीं . - भाब १४ . ०शास्त्र न. काव्य , नाटय इ० तील अलंकारलक्षणें , गुण , दोष , पध्दति , वगैरे विवेचिणारें शास्त्र ; अलंकारशास्त्र ; भाषासौंदर्यशास्त्र . ०संमेलन न. साहित्यिक चर्चा , ठराव इ० साठीं भरणारा साहित्यिंकांचा मेळावा ; वाङ्मयसभा ; वाङ्मयपरिषद् . ०सहित्य न. साहित्य समुच्चयार्थी . [ साहित्यद्वि . ]
|