|
उ.क्रि. १ हास्य , स्मित करणें . २ ( ल . ) एखाद्यास नावे ठेवणे , खोडया काढणें , उपहास करणें . ३ ( ल . ) फुटणें ; उलणें ( करंजी , गुरवळी लाडू इ० ). [ सं . ह्सन ] ( खापरानें ) हसणें - ( चुलीवर ठेवलेल्या ) वर जमलेल्या मशीनें पेट घेणें . हसता नाही पोसता नाही - अत्यंत पोरका , गरीब , सुखदुःख देणारा कोणी आप्तेष्ट नसलेला हसायला आहेत पोसायला नाही - फक्त थटटा , फजीति करणारे लोक असतात , पोटाला कोणी घालीत नाहीत . हसत हसत - हसतां हसतां दांत पाडणें - न . रागवतां चरफडतां एखाद्याची फजीती , पराभव , नाश करणे . हसत्या बरोबर हसणें , रडत्या बरोबर रडणें - वारा येईल तशी पाठ देणें . हसून गोड ( साजरे ) करणें - १ दुसर्याचा राग , विषाद , शेवटी गोडगोड शब्द बोलून घालविणे . २ गोड बोलून फसविणे . हंसतील त्यांचें दात दिसतील - लोकांनी नावें ठेवल्यास त्याची पर्वा न करणें . आपण हंसे लोकांना शेंबूड माझ्या नाकाला - दुसर्याला ज्या दोषाबद्दल हंसावयाचे तोच दुर्गुण आपणापाशी असणें हंसत गौरी , पार्वती , लक्ष्मी - स्त्री . हसतमुख , आनंदी स्त्री . ०चहाड वि. हंसत हंसत चहाडया करणारा . ०मुख न. आनंदी , हंसरा चेहरा . - वि . उल्लसित , आनंदीवृत्तीचा . ०शिंदूळ वि. १ नखरेबाज . चटकचांदणी ( परंतु प्रत्यक्ष व्यभिचारी नाही अशी स्त्री ). २ मोठमोठयानें हंसण्याची खोड असलेला ( पुरुष ). ३ हंसवून फसविणारा , भ्रष्टविणारा , भुरळ घालणारा ; गोड बोलून केसांनें गळा कापणारा . हंसता - वि . १ हंसणारा . २ ( ल . ) हौशी ; रंगेल ; आनंदी ; खेळकर . म्ह ० हसती बायको रडता पुरुष कामाची नाहीत . हसती - स्त्रे . हास्यविनोद . हसतीदंती भेटओळख , हस्तीदंती ओळख - स्त्री . न बोलतांना नुसते परस्पराकडे पाहून हंसून झालेली मेट ; केवळ परस्पर स्मित करण्याइतकी ओळख . ह्सरा , हंसरा - वि . १ नेहमी किंवा पुष्कळ हंसणारा . २ खेळकर , आनंदी ( मूल इ० ). हंसाबाजी - स्त्री . १ हास्यविनोद ; थटटा . २ मस्करी ; टिंगल , उपहास . [ हिं . ] हसित - न . ( न्याय ) मुख , नेत्र व गाल हे ज्यामध्ये किंचित विकसित होऊन काहींसे दांतहि दिसतील असें हंसणें . हंसिताचे प्रकारः - अतिहसित , अपहसित , उपहसित , विहसित , स्मित . - मराठी रंगभूमी ३३२ . हसूं , स , हंसू , सें - न . १ हंसणें , हास्य . २ विटंबना , उपहास , फजिती . चौघामध्यें माझें हंसे झाले . ३ हसण्याचा विषय , हास्यास्पद वस्तु .
|