Dictionaries | References
अं

अंगचा

   
Script: Devanagari

अंगचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. अं0 वक्ता Eloquent through native talent. अं0 शाहणा Clever or capable by nature. अंगची गोष्ट One's personal affair or concern: also a matter of one's own invention or devising. v सांग. अंगची बुद्धि Native sense or understanding.

अंगचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of the body. Not derived or fabricated. Natural, as in अंगचा शहाणा Clever or capable by nature.

अंगचा     

वि.  उपजत . जन्मजात . स्वाभाविक .

अंगचा     

वि.  १ शरीराचा ; बांहेरचा नव्हे ; स्वाभाविक . २ स्वतःचें ; जन्मजात ; जातींचें ; उसनें न घेतलेलें ; अंगभूत . ३ स्वतःच्या डोक्यांतील , कर्तबगारीचा , करणीचा , शोधाचा दुसर्‍याचें शिकविलेला नव्हे असा . ४ स्वतःच्या योजनेचा ; कल्पनेचा . ( ल .) थोतांडाचा ; कवटाळपणाचा ; बनावट ; खोड्याळ . ५ व्यक्तिविशेषाचा ; खासगत ; पडद्याचा ; एकांतीचा . वरील अर्थींत कमीजास्त फरक होऊन पुढील कांहीं शब्द झालेले अर्थात कमीजास्त फरक होऊन पुढील कांहीं शब्द झालेले आहेत .
०कल्पक   विं . स्वभावत ; नवीन गोष्ट शोधून काढणारा ; जात्याच शोधक , तीव्र बुद्धीचा .
०कसबी वि.  स्वतःच निरनिराळ्या वस्तू मेहनतीनें व स्वतःच्या चतुराईनें नीट करणारा ; नेहमी लागणार्‍या वस्तू तयार करणारा .
०कारागीरा   कारिगर गाणारा चितारी , इ० - वि जन्मतःच कुशल - कलावान् - गवई - चितारी इ० .
०खांब  पु. इमला ज्या सामानाचा ( लांकुड , दगड इ० चा केला असेल ) त्याच सामानाचा तयार केलेला खांब .
०जोड  पु. मुख्य इमारतीपासून अथवा वस्तूपासून झालेली . वाढ ; जास्तीं वाढविण्यासाठीं घातलेली . भर .
०झरा  पु. पावसाळ्यांतच केवळ उप्तन्न होणारा नव्हे तर सतत पाणी वाहणारा जमिनींतील जिंवत झरा . ' या विहिरीतल अंगचे झरेच पुष्कळ आहेत , पावसाळी एकदोन असतील '
०धणी   स्वत ; चा मालक ; कोनाचा चाकर नव्हे तो .
०मळ  पु. स्वतःच्या शरीराची घाण ; एखाद्यास अगदी निरुपयोगी असलेली वस्तू . जसें :- तो अंगचा मळ द्यावयाचा नाही . ( कंजुष माणसाबद्दल योजतात .)
०लिहिणार वि.  लेखक वगैरे न ठेवतां स्वतःचें लेखन स्वतः करणारा . ' मोरोपंत अंगाचा लिहिणार होता .'
०वक्ता वि.  उपजत वक्ता .
०शहाणा वि.  स्वभावसिद्ध शहाणा ; चतुर .
०ची  स्त्री. स्वतःच्या अंगचें नैसर्गिक तेज , चातुर्यं हुशारी .
कळा  स्त्री. स्वतःच्या अंगचें नैसर्गिक तेज , चातुर्यं हुशारी .
०ची   स्त्री वयक्तिक किंवा स्वतःचें काम , धंदा ; स्वतः काढलेली कल्पना . ( क्रि०सांगणें )
गोष्ट   स्त्री वयक्तिक किंवा स्वतःचें काम , धंदा ; स्वतः काढलेली कल्पना . ( क्रि०सांगणें )
०ची   स्त्री उपजत शहाणपण .
बुद्धी   स्त्री उपजत शहाणपण .
०चें   न खडकंत , डॊंगरांत कोरून काढलेलें देऊळ .
देऊळ   न खडकंत , डॊंगरांत कोरून काढलेलें देऊळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP