|
स्त्री. रागाची - क्षोभाची स्थिति ; क्षुब्धता ; हमरी - तुमरीवर येण्याची अवस्था ; ( क्रि०येणें ). मी सुरळीत बोलत असतां तूं अणीबाणीवर येतोस हें काय ? कार्य सिध्द होण्याची जवळ आलेली स्थिति ; ऐनप्रसंग ; सोक्षमोक्षाची वेळ . आमची पंचाईत अणीबाणीस आली . निकडीचा , कठीण प्रसंग - समय . त्याची अणीबाणी म्यां संभाळली . [ अणी + बाणी . किंवा बाणी द्वि . ]. ०चा , चा भांडण , चा लढाई , चा वाद - कडाक्याचा , निकराचा , जोराचा कज्जा वगैरे . कज्जा , चा भांडण , चा लढाई , चा वाद - कडाक्याचा , निकराचा , जोराचा कज्जा वगैरे . ०चें - नाजूक काम ; ऐनवेळेचें , अगदीं संपविलेंच पाहिजे असें काम . काम - नाजूक काम ; ऐनवेळेचें , अगदीं संपविलेंच पाहिजे असें काम . ०स नासणें - ऐनवेळीं बिघडणें - बिघाड होणें . येऊन नासणें - ऐनवेळीं बिघडणें - बिघाड होणें .
|