Dictionaries | References

अति पतिव्रता, मुसळ देवता

   
Script: Devanagari
See also:  अति पवित्रता मुसळ देवता

अति पतिव्रता, मुसळ देवता     

एक स्त्री फार पतिव्रता होती. ती एके दिवशीं तांदूळ कांडीत असतां तिचा पति बाहेरुन आला, व त्यानें पिण्यास पाणी मागितलें. तेव्हां त्या स्त्रीनें तांदूळ कांडण्याचें सोडून, ती पतीस पाणी द्यावयास गेली. त्यावेळीं तिचा हात मुसळासुद्धां वर गेला होता तो तेथेंच असतां तिनें तें मुसळ सोडून दिलें. पण तें खालीं न पडतां तें तसेंच अधांतरीं राहिलें. यावेळीं तेथें एक शेजारीण होती तिनें तें पाहून आपणहि तसेंच करण्याचें ठरविलें. दुसर्‍या दिवशीं तिनें तांदूळ कांडावयास घेऊन पतीस बाहेर जाऊन तांदूळ कांडीत असतां मध्येंच येऊन पाणी मागावयास सांगितलें. त्याप्रमाणें ती तांदूळ कांडीत असतां थोड्या वेळानें तिच्या नवर्‍यानें येऊन पाणी प्यावयास मागितलें. तेव्हां तिनेंहि मुसळाचा हात वर नेऊन तें तसेंच सोडून दिलें. पण तें अधांत्री न राहतां तिच्याच डोक्यांत पडलें. याप्रमाणें तिच्या पतिव्रत्याची कसोटी मुसळ देवतेनें घेतली. तेव्हां स्वतःची किंमत न ओळखतां दुसर्‍याशीं स्पर्धा करण्यांत आपलीच फजीती होण्याचा संभव असतो.
अति पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP