|
न. तांदूळ इ० सडण्याकरितां , गोल व लांब लांकूड घेऊन त्याच्या टोंकाला वसवी किंवा मांडळ बसवून केलेलें साधन ; कांडणी . गदा ह्या नांवाचें युद्धोपयोगी हत्यार ; सोटा . उसाच्या चरकांतील नवरा किंवा नवरी . [ सं . मुसल , मुस = तोडणें ; कांडणें ]. ( वाप्र . ) ०नेसणें, पांघरणें, डोक्याला बांधणें ( ल ) निर्लज्जपणानें वागणें ; सभ्यतेला सोडून वागणें ; आपली अब्रू सोडून निर्लज्जपणाचे आचार करुं लागणें . मुसळाचें धनुष्य करणें मुसळाचें धनू करणें - अशक्य गोष्ट शक्य करणें . मुसळानें टिर्या बडविणें - हुरळणें ; अतिशय हर्ष होणें ; आनंद होणें . थोड्याशा यशानें मुसळानें टिर्या बडवून घेऊं नका . मुसळा अंकुर फुटणें, मुसळास अंकुर फुटणें शक्य कोटींतील पण अत्यन्त असंभवनीय अशी कांहीं एक गोष्ट घडून येणें . असाध्य आजार इ० मधून बरें होऊन पूर्वीप्रमाणें व्यवहार करुं लागणें . मुसळास मुसळाशीं गांठ पडत नाहीं , मुसळा मुसळांची गांठ बांधतां येत नाहीं - दोन सारख्या हेकट आणि दांडग्या माणसांत सलोखा किंवा एकी घडवितां येत नाहीं . सगळेंच मुसळ केरांत - अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणें ; महत्त्वाचीच गोष्ट विसरणें . सामाशब्द - ०कंद पु. एक कंद विशेष ; एक प्रकारचा कांदा . ( ल . ) धटिंगण ; दांडगा . ठोंब्या ; मूर्ख ; बैलोबा . ०कांड स्त्री. मुसळानें तांदूळ सडण्याची क्रिया . ०कांड कांडा ड्या मुसळसड्या - वि . मुसळानें कांडलेला , सडलेला ( तांदूळ ) निमसडा ; कमी सडीचा . [ मुसळ + कांडणें , सडणें ] ०झुझ्या - वि . मुसळानें कांडतांना न मोडणारा ; कण्या न होणारा ( मुसळाबरोबर झुंजणारा असा चांगला , न मोडका ). याच्या विरुद्ध पिठूळ . झोंब्या - वि . मुसळानें कांडतांना न मोडणारा ; कण्या न होणारा ( मुसळाबरोबर झुंजणारा असा चांगला , न मोडका ). याच्या विरुद्ध पिठूळ . ०देवता स्त्री. ( ल . ) धीट , आडदांड स्त्री . ०धार धार पाऊस स्त्री . पु . फार जोराचा पाऊस ; मुसळासारख्या मोट्या धारा असलेला पाऊस . ०वादा पु. हगवण किवा आमांश यांची जोराची सांथ . ०सळ सळई - स्त्री . मुसळ करण्याला योग्य असें लांकूड . ०स्नान न. संकल्प , पुरुषसूक्त इ० मंत्र न म्हणतां केलेलें स्नान . नुसतें आंग धुणें ; आंग न चोळतां अंगावर फक्त पाणी ओतून केलेली आंघोळ . मुसळा - पु . ( ओतकाम ) रुंद बुडाचा एक - दीड फूट लांबीचा सुळकेदार दगड . याच्या बुडाला एक भोंक असतें ; त्यांत बांबूचा दांडा घालुन भांडें वर उपसून काढण्याकडे याचा उपयोग करतात . मुसळी - स्त्री . ( लोखंडी काम ) गोल नळ्या करण्याकरतां उपयोगांत येणारी पोलादी पहार . ( राजा . ) लहान मुसळ . मुसळेश्वर - पु . ( ल . ) धटिंगण , दांडगा , गलेलड्ड व आडदांड मनुष्य .
|