|
स्त्री. १ विडा ; तांबूल . विडि करूनि समर्पि महासती । - नरहरि , दानव्रत १७ . राव होता सुखसदनीं । विडिया देतसे मोहिनी । - कथा २ . ९ . ९३ . धरा शांतता खाउंद्या विडी । - होला ८३ . २ तंबाखू घालून केलेली पानाची सुरळी ; विडीचे प्रकार :- फर्मास , तोकडी , लवंगी , बीचबंद . ३ लग्नसमारंभांत वधूवरांस तोडण्याकरितां देण्यांत येणारी पानाची सुरळी , लवंग , खोबर्याची काचळी इ० . ४ वसवी ; शेंबी ; मांडळ ; वलय ; कडें ; लोखंडाची वाटोळी चापट कडी ( ही मुसळ , काठी , दिवटी यांच्या शेवटीं , नांगराचा फाळ बसविण्याकरितां , चाकांच्या तुंब्याभोंवतीं व तुंब्याच्या आंतील भागास , रहाटाचा आंस फिंरण्याकरितां , जात्याच्या मायणींत , हत्याराच्या मुठीस वगैरे बसवावी लागते ). विद्युल्लतेची विडि । विन्हिज्वाळांची घडी । - ज्ञा ६ . १२४ . [ सं . वीटिका ; विटि ]
|