|
अ.क्रि. १ मागें घेणें ; ओढून धरणें ; घासघीस करणें ; हट्ट धरणें ; हेका धरणें ; २ ( भात शिजतांना ) आकसून जाणें . ३ पेटक्यामुळें ( अवयव ) आखडणें ; आकुंचित होणें . ४ एखाद्याचा भाग असणें ; एखाद्याच्या खाली येणें , मोजणें ; समाविष्ट असणें . ' हा प्रांत पुण्याखालीं ओढतो .' ५ मन इ० मोहित होणें , एखाद्याकडे वळणें , जाणें ; कल ओंढा , असुणें . ' बुडत्याचें पाय खोल पाण्यकआडे ओढतात .' ( वाप्र .) ओढता घेणें - १ अडवून घेणें ; घासाघोस करणें ; ताणून धरणें . २ एखाद्या गोष्टीपासून मागें घेणें , सरणें . ओढता ( अथवा ) ओढून धरणे - १ अडचणी आणि अडथळे दाखवैणें , आणणें , २ ( एखाद्या सौदा किंवा व्यवहार जुळविण्यांत ) अपल्याच मुळच्या अटीला चिकटून राहणें . ओढून पाहणें - आपल्याच अटी खर्या , पुर्या करण्याबद्दल प्रयत्न करणें ; घासाघीस घालणें , ओढून बोलणें - लांब हेल काढून बोलणें . ओढून येणें - १ ( गळवामध्यें पू ) जमणें ; मुख धरणें ; तोंड पडणें . २ अकस्मात येणें ; ओढवणें ( एखादी आपत्ति ). जीव ओढणे - १ गुक , तहान , श्रम इत्यादिकांमुळे उत्साहहीन होणें . २ प्रेमानें एकाद्याकडे मनाचा ओढा असणें . देवी , गोवर ओढणें - देवी वगैरे वाळणें . मृत्यु - मरण - काळ० - शेवटी नाइलाज होऊन मृत्युच्या जवळ जाणे ; कपाळी असलेलें प्राप्त होणें . क्रि. नेसणे ; वेढणे ; पांघरणे , ' नित्य ओढिती धौत वस्त्रें। ' - मुसभा १४ . ६७ . ( सं . वहू ) ( वाप्र .) एखाद्याच्या विषयीं प्रीति बाळगणें . ओढ्यांत ओढा घारणें - एक गोष्ट करीत असतां दुसरी जरूरीची करणें . उ.क्रि. १ खेचणें ; सरकविणें ; लोटणें ; जवळ घेणें , करणें ; आपल्याकडे आणणें ; ताणणें , ' परि ओढुनि ने त्यासि देव ओढकसा । ' - मोभीष्म ४ . ४४ . ' तूं पाणी ओढ , मी आंघूळ करतों .' २ ( शेत जमिनींतील डीखळे फोडून साफ करण्यासाठीं दाताळें किंवा गुठेकं वगैरे जमिनीवर ) फिरविणें . ३ रेघा , ओळी काढणें ; आंखणें . ' कार्य रेघा ओढल्यास ! सरळ ओढ .' ४ ओढ बसणें ( फोड , उष्णता , रोग वगैरेपासून डोळे इ० ). ५ ( दुखणें , आजार , दारिद्रय यांमुळे शरीर ) क्षीण होणें . ६ ( गुडगुडी , विडी इ० चा ) धूर काढणें ; अंमल करणें . ७ ( थान ) पिणें ; चोखणें . ( गाय , म्हैस इ०चें ) दुध काढण्याकरितां आंचळ ओढणे ; धार काढणें . ८ ( तपकीर ) हुंगणें ; सुंगणें . ९ ( भाषेचीअर्थकरितां ) ओढाताण करणें ; वाटेल तो अर्थ बसविणें . १० लावणे ; बंद करणें ( दार , खिडकी इ० ). ( सं . वह् - वोढ - ओढ ) ( वाप्र .) ओढून आणणें - १ गर्वानें किंवा रागानें ताठून बसणें . २ कां कूं करीत मागें राहणें . ओढुन काढणें - बाहेर खेचणें मोठ्या युक्तीनें बाहेर काढणें ; जबरीनें जवळ आणणें , घेणें ओढून घेणें -( एखादें संकट अथवा अडचण ) स्वतःवर बळेच आणणें . ' भरतानें रामसारखाच वनवास आपल्यावर ओढुन घेतला .' २ आपल्या बाजूचें करणें .' हींच मुलें आपल्याकडे ओढुन घ्यावयाची आहेत .' - इंप ४२ . ३ ( गंजिफा ) घेणी घेणारानें राजाबरोबर जें पान टाकलें असेल त्यावरील बंद दुसर्याजवळ असल्यास त्यानें राजाबरोबरचें पान मारून ओढून घेणें . हा ओढून येण्याचा हक्क देणी घेणार्याच्या उजव्या हातच्या मनुष्यास असतो . ओढून बळकट करणें - ( दोरीची सैल व मोकळी गांठ घट्ट व न सुटेल अशी आंवळणें ). फाजील शहाणापणानें स्वतःला फसविणें ; उद्देश बाजूला सारणें ; हट्टानें किंवा पड न खाल्यामुळें ( अटि , करार , परिस्थिति ) अधिक बिकाट करुन घेणें . ओढून विकणें - १ जास्त किंवा अवाच्यासवा किंमतीस विकणें . २ ( ल ) स्वतःची योग्यता फार मोठी मानणें ; अभिमानानें आत्मप्रतिष्ठा चढविणें . कर्ज ओढणें - कर्जावर कर्ज काढणें . चाबूक ० - एखाद्याला चाबुक० - एखाद्याला चाबूक लगावणें . जमीन ० - शेतजमीन लागवडीस आणणें . जीभ ० - कांहीं विकृतीनें जीभ कोरडी होणें . बाकी ० - १ हिशेबाची शिल्लकबाकी पुढील सालच्या कीर्दी वर नेणें . २ देणें न देतां कांहीं काळ राखणें . वरून ओढून टाकणें - ताणणें -( जसें - शस्त्रावरुन ओढणें , विद्येवरुन ओढणें ) थोडेंसे , वखरचें ज्ञान असणें . श्वास ० - श्वास घेणें . ओढून टाकणें - रागानें , दांडगाईनें ओढून ढकलणें किंवा झुगारून देणें ( मनुष्य , वस्तु इ० ).
|