Dictionaries | References

ओढा

   
Script: Devanagari

ओढा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . ओढा ओढणें g. of o. To hold or maintain love for. ओद्यांत ओढा वारणें To do another necessary work in doing one.

ओढा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  pulling, string, force. The inclination (of the mind), yearning in affection and tenderness. ओढा ओढणें hold love for.

ओढा

 ना.  झरा , नाला , पर्‍ह्या ;
 ना.  आकर्षण , कल , प्रवृत्ती ;
 ना.  लेप .

ओढा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र   Ex. गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.
 noun  पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह   Ex. वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.
   see : कल, लेप

ओढा

  पु. ओढ मधील १ , २ , ९ , ११ , १२ हे अर्थ पहा . २ ( दोर , गज ) बळकटस्थिर करणें . ३ दुसर्‍य़ा ठिकाणीं लावलेल्या भाताच्या रोपांतून वाळलेल्या पात्या ओढून काढणें ; लावणी केल्यानंतर नवी पात फुटुं लागते तेव्हां जुनी सुकलेली पात काढून टाकितात , हा जो व्यापार तो . ४ घरगुती कामें ; कामाचा रगाडा , ढीग . ( क्रि०ओढणें ). ' सारा दिवस घरांतला ओढा ओढला पाहिजे .' ५ खांबतुळई यांना बळकटीसाठीं जें एक जोड लाकुड जोडतात ते . ६ ( फोड वगैरेचें ) आकर्षण ; त्यावर देण्याचा औषढीचा लेप . ( क्रि० घालणें ; लावणें ; शेकणें ; धरणें ). ' तुमचे पायाचे सुजेवर चांगला ओढा घाला .' ( सं . उपधा ( वर ठेवणें )- ओढा . भाअ १८३४ ). ७ नारळ , सुपार्‍या वगैरे एका ठिकाणी जमा करणें . ८ पर्‍हा ; नाला ; हरळा ; विशेषतः पावसाचा बरड जमिनींतील वाहणारा लहानसा प्रवाह व त्यांचें कोरडें पात्र . ' ओढु ' - पाटण शिलालेख शके ११२८ . ' ओढा वदे तो तरी काय ऐका । ' ९ खोगीराच्या तंगाची अथवा पठाडीची दोरी . १० रहाटाला बैल अगर रेडा जोडण्याकरितां बांधलेल्या जोखडास मागें जो बांबू दोरांनीं बांधून वेसनेकडास जोडलेला असतो तो . ( सं . अवकंर्षक - अउअढअ - ओढारा . ग्रंथमाला )
  पु. राशींतून जेवढा कवेंत मावेंल तेवढा गट्ठा ओढून घेण्याचा कुलकर्ण्याचा हक्क . ( ओढणें .)

ओढा

   ओढा तरून जाणें आल्यास (असल्यास) समुद्रपार पाडणारे भोपळे असावे
   करावयाचे काम लहान असले तरी जवळ मोठ्या कामाची तयारी असावी
   अल्प काम असले तरी साधनें भरपूर असावी. तु०-कोल्ह्याच्या शिकारीस वाघाच्या शिकारीची तयारी असावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP