Dictionaries | References

काय

   { kāyḥ }
Script: Devanagari

काय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; Ex. मी काय काय त्याचे गुण सांगूं or the particularity and several consideration of parts and items. Ex. त्यानें काय काय तुला सांगितलें or काय काय पदार्थ दिल्हे.
kāya m S The body. The popular form is काया.

काय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pron   What? Whatever?
 m  The body.
 f  The body. Freshness of appearance.
कायावाचामनेंकरून   In act, speech, and thought.
काया (झांकणें-उघडी टाकणें)   Implies any part of the body which decency demands to be clothed.
काया पालटणें   To recover freshness and healthiness of look.

काय     

ना.  अंग , आकार , कुडी , तन , तनु , देह , वपु , शरीर .

काय     

सना . १ कशाचा ? कसला ? कोणता ?' आनृण्य न जोडावें तरि आम्हीं अर्थ जोडिला काय ' - मोभीष्म १२ . ६० . ' प्रताद मग काय तो जरी निवारिना लाबवा । ' - केका ६६ . २ जें ; जें काय . ' तो काय देईल तें घेऊन ये .' ३ किती मोठा ; केवढा ; ' हा काय हो मुर्ख । ' दुःखामर्येंचि सरलें , सुख काय सांगें । - वामन स्फुटलोक ६९ . ( नवनीत पृ १४१ .) ४ ( गो .) मुळींच ; कांहीं सुंद्धां . ' पांचा नळांत जेव्हा काय दिसें नाचि भेदलव तीस ; मोवन ४ . ७१ . ' लोभ केलिया कायही नुरे ' - नरहरी गंगाधररत्‍नमाला ३४ . ( नवनीत पृ . ४२० ). ५ तुच्छतादर्शक .' हा काय रत्‍नभोक्ता मारू अनुताप पावुनी हाका । ' - मोअ आदि ३२ . १७ . ' जिउबा बोले गर्जून मोगल काय आणिल जिन्नस । ' - विवि ८ . ४ . ८० . ६ एखाद्या समुच्च यांतील निरनिराळ्या वस्तु , किंवा निरनिराळे प्रकार दाखविणारें सर्वनाम , ' सजगुरा काय , जोंधळा काय , गहुं काय , जो जिन्नस पाहिजे तो आहे .' ७ द्विरुक्ति ( काय काय ); संख्याविस्तार भेद याबद्दल आश्चर्य दाखविण्यासाठीं एखाद्या पदार्थ्यांचा विशेषपणा किंवा भिन्नपणा दाखविण्यासाठीं .' मी काय काय त्याचे गुण सांगू ? ' त्यानें काय काय तुला सांगितलें किंवा कायकाय पदार्थ तुला दिले . म्ह० १ ( गो .) काय दीस सुनेचे कायं = काम्हींच न सुचणें .
क्रि.वि.  प्रश्नार्थक किंवा आश्चर्य उप्तन्न करणारें अव्यय . ' त्वां त्याला मारलेंस काय ?' ' आज पाऊस काय ?'
( गो .) पणा ( भाववाचक ) या अर्थाचा प्रत्यय . ' किरपीन काय =' कॄपणपणा .
०एक   कांहीं ; कितीं ; कोणी ; कित्येक . ' काययेक उपजतां मरती ' - तुगा ७२५ .
०क   कांहीं एक ; कोणतें ; ' दिनानाथ द्वारकाधीश साह्य जरी तरी कायक न करीं - राला ११ .
०गे   तरी - क्रिवि . ( बायकी ) एक वाक्‌प्रकार . ( आश्चर्यदर्शक ).
बाई   तरी - क्रिवि . ( बायकी ) एक वाक्‌प्रकार . ( आश्चर्यदर्शक ).
०की   कोण जाणें ; ठाऊक नाहीं अशा अर्थाचें उत्तर . ' माझा बैल इकडून गेला काय ? उत्तर ; = काय कीं .'
०जाणें   कोण जाणतो ? कोणाल ; ठाऊक ? कोण सांगेल ? ( अशिष्ट लोकांत हा प्रयोग रुढ आहे .)
०जाळणें   ( निरुपयोगी कुचकामाच्या वस्तुस अनुलक्षुन एक वाक्यप्रचार ) काय उपयोग ? काय जाळावें ( जळे ) नेऊनि ' - दावि २१० . ' जैसें विगत विधवेचें स्वरुप । यौवन काय जाळावें । ' ' काय जळळें दिवसभर अभद्र बोळणें ?
०तो   ( तिरस्कारदर्शक ) कःपदार्थ ; यःकश्चित .
०माय   ( कु .) कांहीं ( काय द्वि ; कांहीं बाही )
०म्हणुन   कशाकरितां
०लें   हालें - ना . काशाला ? कशाकरितां ? फां म्हणुन ?
०शी   सी सें - कितीशी ? कशाची ? काय होय ? कशाचें ? कशाला ? क्षुद्रतादर्शक ; का ; पदार्थ , ' दयानिधि तुम्हां पुढें जनकथा अशा कायशा ' । - केका २६ . ' इतरांची शक्ति कायशी । ' - दावि ४०५ . ' ब्रह्माविद्येंची गोष्टी । त्यांसी कायसी । ' - विपु १ . ५७ . ' तया सास्यता कायसो काय आतां ' - रामा ६० . ' समर्थाघरीं कायसें उणे ' - दावि २१ .
०सया   कशाला ? कशाचें ? ' सांगा कवण तें ब्रह्मा । कायसया नाम कर्म । ' - ज्ञा . ८ . २ .
०सा वि.  १ ( अनिश्चितार्थी ) एखादी गोष्ट निश्चित न आठवतां तिची साधारण आठवण असतां योजतात . ' त्यानें कायसा निरोप सांगितला होता पण मी विसरलों .' २ कशासारखा . ३ कशाचा . ' जनीं मुर्ख हो बोल कायसा आतां - दावि १७८ . ४ कशांसाठीं ? कशा करितां ? काय फायद्याचा ? काय उपयोग ?' तेथें कायसा या ग्रंथाचा उद्यम । ' - विपु ७ . १५४ .
०साच वि.  कसाचसा ; कसासाच ; बरोबर वर्णन करतां येत नाहीं असा , अशासारखा ; चमत्कारिक ; आश्चर्य उप्तन्न करणारा . साठीं -( व .) कशासाठीं .
०स्तें  न. कांहींसे . ' असेंच कायसं तुम्हीं म्हणाला होता खरें ! ' अस्तंभा ६६ .
०सेसें   क्रिवि . कांहीं तरी एक . मुलांसाठी बाईसाहेबानीही कायसेंसें केलें आहे .' - कोरकि २६ .
०सेना   नी - नें - कशानें ; कोणत्या कारणानें . ' कायसेनी पाहुणेरु क्षीरसागरा । ' - ज्ञा . १० . ११ . ' तें तूं म्हणसी कायसेन । ऐक सांगेन उद्धवा । ' - एभा २९ . ८३६ .
०होय   काय पर्वा आहे ? काय उपयोग आहे ? ' आंधळ्याला बगीच्या काय होय .' - नि ५१० .

काय     

काय करूं, कसें करूं
हा अष्‍टाक्षरी मंत्र ज्‍या मनुष्‍यास कोणतेहि काम सुचत नाही तो मनुष्‍य या प्रमाणें म्‍हणत असतो. ज्‍यांचे मन व्यग्र झालेले असते व ज्‍यास नीट विचार करतां येत नाही त्‍याची नेहमी गोंधळल्‍यासारखी स्‍थिति होते. कसे करूं० पहा.
काय दिस सुनेचे, काय दिस मायचे
(गो.) [काय=काही] काही दिवस सुनेचे, काही दिवस सासूचे. चार दिवस सुनेचे चार दिवस सासूचे, पहा. Every dog has his own day.

काय     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
काय  mfn. 1.mf()n. (fr.3., [Pāṇ. 4-2, 25] ), relating or devoted to the god (प्रजा-पति, [RV. x, 121] ), [VS.] ; [TS.] ; [ŚBr.]
&c.
काय  m. m. one of the eight modes of marriage (= प्राजापत्य See विवाह), [Mn. iii, 38] ; [Yājñ. i, 60]
काय  n. n. part of the hand sacred to प्रजा-पति, the root of the little finger, [Mn. ii, 58 and 59.]
काय  m. 2.m. (√ चि, [Pāṇ. 3-3, 41] ), the body, KātyŚr.; [Mn.] &c.
the trunk of a tree, [R.]
the body of a lute (the whole except the wires), [L.]
assemblage, collection, multitude, [SaddhP.]
principal, capital, [Nār.] ; [Bṛh.]
a house, habitation, [L.]
a butt, mark, [L.]
any object to be attained, [L.]
natural temperament, [L.]

काय     

कायः [kāyḥ] यम् [yam]   यम् [चीयतेऽस्मिन् अस्थ्यादिकमिति काय; चि-घञ् आदेः ककारः [P.III.3.41.] Sk.]
The body; विभाति कायः करुणापराणां परोपकारैर्न तु चन्दनेन [Bh.2.71;] कायेन मनसा बुद्ध्या [Bg.5.11;] so कायेन, वाचा, मनसा &c.
The trunk of a tree.
The body of a lute (the whole lute except the wires).
A multitude, assemblage, collection.
Principal, capital.
Home, residence, habitation.
A butt, a mark.
Natural temperament.
-यम्   (with or without तीर्थ) The part of the hand just below the fingers, especially the little finger, or the last two fingers (this part being considered sacred to Prajāpati is called प्रजापतितीर्थ; cf. [Ms.2.58-59] ).
-यः   One of the eight forms of marriage, generally known as प्राजापत्य q. v.; स कायः पावयेत्तज्जः [Y.1.6;] [Ms.3.38.] -Comp.
-अग्निः   the digestive faculty. मनः कायाग्निमाहन्ति [Maitri. Up.7.11.]
-क्लेशः   bodily suffering or pain; कायक्ले- शभयात्त्येजत् [Bg.18.8.]
-उत्सर्गः   a kind of religious austerity in Jainas.
-चिकित्सा   the third of the eight departments of medical science, treatment of diseases affecting the whole body.
-दण्डः   a complete command over one's body; वाग्दण्डोऽथ मनोदण्डः कायदण्डस्तथैव च । यस्यैते निहिता बुद्धौ त्रिदण्डीति स उच्यते ॥ [Ms.12.1.]
-मानम्   measurement of the body.
बन्धनम् girdle.
the union of semen virile and blood.
-वलनम्   an armour.
स्थः the Supreme Being.
the writer-caste (born from a क्षत्रिय father and a शूद्र mother). कायस्थेनोदरस्थेन मातु- र्मांसं न भक्षितम् । दयावृत्तिर्न चैवात्र दन्ताभावो हि कारणम् ॥ Subhāṣ.
a man of that caste; कायस्थ इति लध्वी मात्रा [Mu.1;] [Y.1.336;] [Mk.9.]
(स्था) a woman of that caste.
the Myrobalan tree (Mar. हिरडा). (-स्थी) the wife of a कायस्थ.
-स्थित a.  a. corporeal, bodily.

काय     

Shabda-Sagara | Sanskrit  English
काय  mn.  (-यः-यं) The body.
 n.  (-यं)
1. Part of the hand sacred to the creator; the root of the little finger.
2. Clarified butter or any ob- lation to BRAHMA.
 m.  (-यः)
1. One of the eight modes of marriage, the same as प्राजापत्य.
2. Assemblage, collection.
3. A butt or mark, an object to be hit or attained.
4. Natural temperament of any thing or being.
5. A house, a habitation.
6. Principal, capital.
E. a name of BRAHMA, and अण् deriv. affix, is added to क, and अय is substituted for the short vowel; proceeding from or relating to BRAHMA, &c.
ROOTS:
अण् अय

Related Words

काय बोंब मारली!   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   कसा काय   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   काय होय?   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   काय येक नोहे?   कसें करूं, काय करूं   काय केली विटंबण। मोतीं नासिकावाचून।।   काय जळे   काय जाळावें   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   खै गेल्‍लो? खैं ना! कितें हाडलें? काय ना!   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   काय गृहस्‍थाश्रमीं देव नसे, मग वना कां धांवताती पिसे   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   काय ढोरापुढे घालुनि मिष्‍टान्न।   उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें   काय   अज्ञानी ते पशूवत, भिन्न काय ते आकृतीत   काय-चिकित्सा   कावळां मोत्‍या (सोन्या) पोवळ्यांचा चारा काय उपयोगी   करायला गेली काय, वरती झाले पाय   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   कुबेराचा माल कुबेराला, काय व्हावा मनुष्‍याला   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !   कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   गाढवास गुळाची चव काय?   गुंतला मनुष्‍य कुंथून काय (काम) करी   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   काय गळतें, तर तोंड गळतें   somatic cell   कायचिकित्सा   therapy   हातांत काय तागडू मिळाला   सूप फडफडतां भिईल काय?   बधिरास गाण्याची काय चव   हिसाब काय आहे   हातास काय केंस आले?   होणार चुकतें काय?   दलालास दिवाळें काय   बधिरास काय गायनाची चव   मला काय त्याचें!   सांगण्याचेम प्रयोजन काय?   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?   अंगावेगळा घाय तुला लागें, मला काय?   आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा   आधारावांचुनि। काय सांगशील काहाणी।।   आधींच रडे, तो घोडें काय चढे   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   आपली देवता लंगडी पडली, तिथे काय इलाज   आयली वाय, गेलि काय, ताजें गोडवें तुका काय?   आला भागासी तो काय करी वेवसाव   आळशी जिवंत असून काय, जन्मवरी मृत्युप्राय   अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   अपकारांस उपाय काय अपकार विसरुन जाय   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   गांडीवर पाणी घाल, तर म्‍हणे खालीं काय लांबतें?   गांवात गाढवाची काय खोट?   गाजरभर अलीकडे काय आणि मुळाभर पलीकडे काय?   गाढवांस गुळाची चव काय   गुराख्याला गुरें चुकली म्‍हणून धन्याला चुकतील काय   खावें काय पुरुषानें? उत्तर दम   कशांत काय आणि फाटक्‍यांत पाय   कशांत काय, फाटक्यांत पाय   कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे   कशी काय खबरबात, ताटभर दहीभात   काय असे रंगावर, केवळ गुणग्रहण कर   काय करशी देवा, तर अडला तयारपाय ठेवीन   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   काय केल्‍यार काय आस, न्याय केल्‍यार अर्द आस   काय कोशिका   काय गेलें तळतीचें, काय गेलें वळतीचें   काय जाणे   काय जाणें?   काय तो!   काय पण थाट, अन्‌ पाण्याला फुटका माठ   काय प्रभो माया तुझी, काय तुझा खेळ, चिचुंद्रीच्या डोक्‍याला चमेलीचे तेल   काय बा वेचें   काय बोलावें भाटाला, बडबड्या उंटाला   काय माय   काय म्‍हणून   काय म्हणून   काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्‍याचा काळा नच जाय।   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP