|
स्त्री. न . स्त्री . १ ( काव्य ) ठेव अर्थ १ पहा . गुप्तधन . राहाणें ठेवणीं सांपडती । - दा ९ . ८ . २१ . २ निक्षेप . ठेव अर्थ २ पहा . टेपर ठेवणें पहा . दुसर्यावर ठपका ठेवणें . स.क्रि. १ राखणें ; स्थापणें ; मांडणें ; लावणें ; बाजूस काढणें . २ एका बाजूस टाकणें ; बिर्हाड मांडणें ; ( काम ) करणें . निराळें काढणें ; शिल्लक राखणें ; एखादें कार्य कांहीं काळ न करतां तसेंच राखणें . ३ राखणें ; वांचविणें ; राखून ठेवणें ; रक्षण करणें . ४ जागेवर कायम राखणें , होणें , स्थापन करणें , नियुक्त करणें ( काम , हुद्दा यावर ). ५ चाकरीस , नोकरीस , सेवेस राहवून घेणें किंवा बाळगणें ( चाकर , सैन्य ). ६ कायम राखणें ; जसेंच्या तसें जपून ठेवणें , राखणें ; जोपासना करणें ; अबाधित मानणें . यानें त्याची प्रतिष्ठा ठेविली . ७ घेऊन न जाणें ; जेथल्या तेथें पडूं देणें पेंढार्यांनीं कांहीं एक भांडें घरांत ठेविलें नाहीं . ८ रांड बाळगणें . ९ एखादी वस्तु संरक्षणासाठीं दुसर्याचे स्वाधीन करून त्याजकडे राखणें . [ सं . स्थापन ; प्रा . ठावण ] ( जेव्हां हें क्रियापद दुसर्या क्रियापदांच्या ऊन प्रत्ययांत धातु साधितांशीं योजतात , तेव्हां त्याचा अर्थ एखादी गोष्ट करणें , कोणत्याहि क्रियापदाच्या विषयाचें ठेवणें , किंवा तीच स्थिति राखणें , अथवा त्या क्रियेनें झालेली आविष्कृति असा होतो . जसें - हें पत्र लिहून ठेव ; हें कापड घडी करून ठेव ; ती गाय बांधून ठेव ; शेतें पेरून ठेव ; पिठांत पाणी घालून ठेव इ० ; ठेवणें हें क्रियापद आणि टाकणें हें क्रियापद यांमध्यें अर्थाच्या दृष्टीनें साधर्म्य व विषमताहि आहे . दोन्हीही क्रियापदें एखाद्या कृत्याची पूर्णता किंवा एखाद्या विषयाची पूर्णता दर्शवतात ; परंतु ठेवणें हें क्रियापद क्रियेमध्यें काळजी व लक्ष्य - विशेषत : राखून ठेवण्यांतील - कौशल्य दर्शवितें . तर टाकणें हें क्रियापद एखादी वस्तु दूर , लांब किंवा कायमची सोडून देणें , तिचा त्याग करणें , हात धुवून मोकळें होणें , किंवा दुर्लक्ष्य , हयगय इ० अर्थ दर्शवितें . जसें - त्याची पोथी त्यास देऊन टाक ; रुपये देऊन फडशा करून टाक ; तें झाड उपटून टाक इ० . यांत कसें तरी कार्य पूर्ण करण्याचा बोध होतो उलट ठेवणें क्रियापदाच्या स्पष्टीकरणार्थ वर दिलेलीं हें पत्र लिहून ठेव इ० उदाहरणें पहा . ) न. ठेव अर्थ १ , २ पहा . कीं हें आदिशक्तीचें ठेवणें । - दा १ . ७ . ३० .
|