Dictionaries | References

आढ्याला पाय, पिढ्याला (कुडाला) डोकें

   
Script: Devanagari

आढ्याला पाय, पिढ्याला (कुडाला) डोकें

   (पिढे = पाट. कूड = काटक्यांची भिंत. आढे = घराची पाठाळू
   छपराखालील सर्वात वरचे आडवे लाकूड.) पिढें हे बसण्याकरतां असतां तेथे डोके ठेवून आढ्याकडे पाय करणारा मनुष्य विपरीत कृति करीत असतो. तेव्हां योग्य गोष्ट न करतां जो मनुष्य त्याच्या उलट कृति करीत असतो त्याबद्दल ही म्हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP