Dictionaries | References

उभा

   
Script: Devanagari

उभा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   loosely or carelessly around the middle. The two phrases also denote respectively two modes of putting on the धोतर amongst males.

उभा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Erect. Lying along, not across. Standing up. Whole.
उभा करणें   Stop; suspend; realize or make good.

उभा

 वि.  खडा , ताठ , न वाकलेला ;
 वि.  जागृत , तीव्र , पक्का , सतत ( दावा );
 वि.  चालू , सूरू असलेला ( धंदा );
 वि.  अखिल , संपूर्ण , सर्व ( उभ्या भारतात );
 वि.  न कापलेले ( शेत , पीक );
 वि.  उत्सुख , तयार ;
 वि.  कृतिशून्य , स्तब्ध .

उभा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  क्षितिजाला समांतर नसलेला   Ex. एक उभी व एक आडवी रेष ओढ.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
खडा
Wordnet:
asmথিয়
bdगोथों
benখাড়া
gujઊભું
hinखड़ा
kanಲಂಬವಾದ
kasسیٚود
kokउबें
malലംബമായ
mniꯑꯌꯨꯡꯕ
oriଆନୁଲମ୍ବିକ
panਖੜਾ
sanलम्बरेख
telనిలువుగావున్న
urdکھڑا , قائم , استوار
 adjective  न बसलेला   Ex. उभा असेलेल्या माणसाला खुर्ची दे बसायला
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdआथिंनि बोलोयाव गसंग्रा
benদণ্ডায়মান
gujપદસ્થ
hinपदस्थ
kanನಿಂತ
kasاۄعہدٕدار
kokउबो
malകാലിൽ നിൽക്കുന്ന
oriପଦସ୍ଥ
panਪਦਸਥ
sanपदस्थ
tamநிற்கிற
telపదస్థయైన
urdپیروںپرکھڑا
   See : सरळ, सगळा

उभा

 वि.  
   ताठ ; वर ; खडा ; आडवा नसलेला ; न वांकलेला ; न बसलेला . उभा राहून किती वेळ बोलशील ? ये , इथें झोपाळ्यावर बैस .
   सरळ दिशेंत असलेला ; लांबीच्या अनुषंगानें सरळ रेषेंत असणारा ( रस्ता ). याच्या उलट आडवा ( रस्ता ).
   चालू ; सुरु असलेला ( धंदा वगैरे ). माझें घर बांधण्याचें काम उभें आहे .
   न कापलेलें ; शेतांत उभें असलेलें ( पीक वगैरे ). शेतांतील उभें पीक शत्रूनें कापून नेलें . .
   तयार ; उत्सुक ; पुढें आलेला ; सिद्ध . त्याचें घर विकत घेण्यास कोणी उभा रहात नाहीं .
   सतत ; अढळ ; जागृत ; पक्का ; तीव्र ( द्वेष , दावा वगैरे ). त्या दोघांमध्यें उभा दावा आहे . .
   संपूर्ण ; सर्व ; अथपासून इतिपर्यंत ( संवत्सर , साल , वर्ष वगैरे ). उभ्या वर्षांत धंद्यामध्यें कांहीं फायदा झाला नाहीं . .
   सारखा ; चालू असलेला ; खळ न पडणारा ; फार वेळ टिकणारा ; अविरत ( पाऊस , वारा वगैरे ). उभ्या पावसांत शेतलावणीचें काम चालू होतें .
   सरळ धारा पडत आहेत असा ( पाऊस ).
   ० थेट समोरुन येणारा ; तोंडावर येणारा ; विरुद्ध दिशेकडून येणारा ( वारा वगैरे ). वारा उभा असल्यामुळें गलबताची गति खुंटली , मंद झाली .
   गति नसलेला ; थांबलेला ; स्थिर . [ सं . ऊर्ध्व ; प्रा . उब्भ ; सिं . उभो ; बं . उबु ]
०करणें   क्रि .
   थांबविणें ; गति बंद करणें ; स्तब्ध करणें ; गाडी उभी कर . .
   बंद करणें ; तात्पुरता थांबविणें ; कांहीं काळ थोपविणें ( धंदा , काम वगैरे ). मंदीमुळें सध्यां धंदा उभा केला आहे .
   रचणें ; उभारणें ; तयार करणें . पोलिसांनीं खोटा खटला उभा केला .
   ( बायकी ) धुतांना लांब वस्त्र एका पदरापासून दुसर्‍या पदरापर्यंत सारखें करुन घेणें .
   उत्पन्न करणें , आणणें . शिवाजीमहाराजांच्या नेत्रांतून देखील अश्रू उभे केले . - इंप १०६ .
   आडवी पडलेली वस्तु लंबरेषेंत ठेवणें . समई आडवी पडली आहे ती उभी कर पाहूं !
०होणें   थांबणें ; तात्पुरता बंद होणें ; विश्रांति घेणें .
०धरणें   निर्बंधात ठेवणें ; कडक शिस्तींत वागविणें ; जांचणूक करणें ; त्रास देणें ( धनकोनें रिणकोस , मुलानें आईस वगैरे ). केव्हांपासून यानें मला अगदीं उभें धरिलें आहे , जरा घे तरी ! .
०जाळणें   अत्यंत हाल करणें ; अतिशय त्रास देणें ; छळणें .
०ठाकणें   उत्पन्न होणें ; समोर येणें . संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला । - दा १२ . ९ . २४ .
०नाहणें   सर्वांग भरुन येणें , पाझरणें , निथळणें ( घाम , रक्त वगैरेनीं ).
०राहणें   
   मिळणें ; प्राप्त होणें ; संपादन करणें . व्यापारांत घातलेलें माझें भांडवल अद्यापि सारें उभें राहिलें नाहीं . .
   घडणें ; जवळ येणें ; निकट येणें ( एखादी गोष्ट किंवा कृत्य ); प्राप्त होणें ; आवश्यक होणें .
   साहाय्य करण्यास पुढें येणें , तयार होणें , सिद्ध होणें . बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे ॥ - दा १९ . ४ . ११ .
   एखाद्या संकटांतून वर येणें ; नशीब काढणें .
   पोटांत गोळा उभा राहणें ; संकट येणें , उपस्थित होणें .
   आड येणें ; अडचण , प्रतिबंध होणें ; पुढें येणें . त्यावेळीं एक गोष्ट उभी राहिली , तेणेंकरुन माझा बेत जागच्याजागींच राहिला . माझ्या मुलीचें लग्न उभें राहिलें आहे , तुम्हाला द्यावयाला मजजवळ पैसे नाहींत .
   उत्पन्न होणें ; मिळणें ; प्राप्त होणें ( किंमत वगैरे ). या मालाचे रुपये पांच हजार उभे राहिले कीं , माझे वडील भाग्योदय मानतील . - विवि . १० . ५ . १९७ .
   अनुकूल होणें . उभे राहिलें भाग्य बिभीषणाचें । - राक १ . ७१ .
०इंद्र   - पुन्हां सुरुवात करणें ; नव्यानें आरंभ करणें ( काम , धंदा वगैरेस ).
करणें   - पुन्हां सुरुवात करणें ; नव्यानें आरंभ करणें ( काम , धंदा वगैरेस ).
०छेद  पु. ( गणित , स्थापत्य , चित्रकला ) एखादी वस्तु उभी ( ओळंब्यांत ) वरपासून खालपर्यंत कापली असतां दिसणारें दृश्य .
०तांब्या  पु. राजापुराकडील उभंट आकाराचा पितळेचा किंवा तांब्याचा लोटा .
०दांडा  पु. 
   उभा , सरळ खांब .
   ( ल . ) सरळ व्यवहार ; सरळ वर्तन ; युक्तीचें , कुशलतेचें वर्तन . [ उभा + दंड ]
०दावा  पु. हाडवैर ; अक्षय , कायमचें वैर . म्ह० जावा जावा , उभा दावा . ( उभे ) दोन प्रहर पु . उभीदुपार पहा . आपल्या झोपड्यांवर उभ्या दोन प्रहरीं चांगलें ऊन पडतें . - पाव्ह २७ .
०दोरा  पु. धांवदोरा ; कच्ची शिवण ; टीप याच्या उलट .
०नासणें   सर्व नाश होणें ; तात्काळ नासणें . जे शब्दीं वदोनि उभा । संसारनासी ॥ - दा १ . २ . ९ .
०पाहारा  पु. 
   खडा पाहारा ; अत्यंत काळजीपूर्वक , डोळ्यांत तेल घालून केलेली राखण .
   सारखें उभें रहाणें , बसावयास फुरसत न मिळणें ; एकसारखे कष्ट ; विश्रांतीचा अभाव . दिवसभर्‍याच्या उभ्या पाहार्‍यांत अंग भरुन येऊन रात्रीं मेलं केव्हां एकदां आडवी होईन असं होऊन गेलं . - नाट्यछटा ( फाटक ) २ .
   ( ल . ) एकसारखी केलेली चाकरी , सेवा ; एखाद्या आजार्‍याची एकसारखी केलेली सारखी शुश्रूषा .
०पाऊस  पु. मोठा , सरळ धारांनीं पडणारा पाऊस ; न खळणारा पाऊस .
०बाजार  पु. 
   या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व बाजार ; सगळी बाजारपेठ . तूं दिलेल्या रंगाची लोंकर उभ्या बाजारांत मिळत नाहीं . .
   भरबाजार ; बाजाराचा मध्य भाग ; चव्हाटा . उभ्या बाजारांत कथा । हें तों नावडे पंढरीनाथा ॥
०मा्र्ग  पु. 
   राजरस्ता ; सार्वजनिक रस्ता ; रहदारीचा रस्ता ; मोठा रस्ता ; हमरस्ता .
   या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व , सगळा रस्ता .
   सरळ रस्ता ; आडवा नसलेला , वांकडातिकडा नसलेला रस्ता .
   ( ल . ) सरळ , प्रामाणिकपणाचें वर्तन ; शहाजोग व्यवहार . उभ्यामार्गानें जाणें , येणें - न . सरळ मार्गानें , न थांबतां , वांकडेंतिकडें न जातां जाणें .
०माल  पु. तयार झालेलें , पण न कापलेलें शेतांतील पीक . उभ्या मालाची पाहाणी स्त्री . शेतांतील पिकाचा अंदाज . म्ह० उभ्यानें यावें ओणव्यानें जावें = वेळ प्रसंग पाहून वर्तन करावें , नम्रतेनें वागावें .

उभा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
उभा   (in comp. for उभ above).

Related Words

उभा   standing   उभा लगाम   उभा खडपा   अडवा उभा   उभा दावा   उभा शिवार   उभा असणे   उभा ठाकणें   उभा नासणें   उभा राहणें   शिवाणीं उभा न करणें   कीर्तनीं संत, उभा भगवंत   खुंटासारखा उभा असणें   खुंटासारखा उभा खुंटणें   खुंटासारखा उभा राहणें   पोटांत धोंडा उभा राहणें   अंगावर कांटा उभा राहाणें   खुंट उभा राहणें   खुंट उभा होणें   खुंटास उभा राहणें   खुंटास उभा होणें   दत्त म्हणून उभा   शिवाणीं उभा न राहूं देणें   कोठें जाशी भोगा (दैवा), तर तुजपुढें उभा   vertical   कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा   उभा असणें   उभा असलेला   उभा करणे   उभा करणें   उभा खोखो   उभा जाळणें   उभा दारा   उभा धरणें   उभा नाहणें   उभा पहारा   उभा पाऊस   उभा पाहरा   उभा बाजार   उभा मार्ग   उभा रस्ता   उभा राहणे   उभा सोट   उभा होणें   उबो आशिल्लो   उबो आसप   ઊભા રહેવું   ਖੜਾ ਹੋਣਾ   ଠିଆ ହେବା   ಎದ್ದು ನಿಲ್ಲು   നിൽക്കുന്ന   उबें   खड़ा होना   गोथों   लम्बरेख   کھڑاہونا   నిలువుగావున్న   వేరుగావుండు   থিয়   খাড়া   ଆନୁଲମ୍ବିକ   ಲಂಬವಾದ   ലംബമായ   उभा इंद्र करणें   उभा इंद्र नागवा   उशापायतीं उभा राहणें   (एखाद्याच्या) तारेस उभा राहणें   अंगावर कांटा उभा राहणें   घोडा उभा करणें   वार्‍यास उभा न करणें   वार्‍यास उभा न राहाणें   शिंवाणीं उभा न करणें   सख्ख्या जावा, उभा दावा   समोर उभा राहिलेला   संकटामोर उभा राहणें   जावा जावा, उभा दावा   दर्भ घेऊन उभा असणें   जवळ उभा करणें   तारेस उभा करणें   युगे अठावीस विटेवरी उभा   पोटांत गोळा उभा राहणें   प्रश्न उभा करणे   सावलीस उभा न राहणें   उभा रेट नी मुसळ भट   वार्‍यास उभा राहूं न देणें   शिंवाणीं उभा न राहूं देणें   जावा जावा आणि उभा दावा   भटाचा उभा दांडा अडवा दांडा   मशिदींतील दिवा, उभा केला दावा   నిలుచున్నటువంటి   দাঁড়ানো   ਖੜਾ   खड़ा   ઊભું   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल   দাঁড়িয়ে থাকা   പ്രവർത്തിക്കുക   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP