|
पु. ( व .) आहुति - आहुत ( अप .) १ बलि ; २ ( ल .) अतिशय कष्टमय स्थिति ; आसन्न मृत्युची अवस्था . औत घेणें - अति श्रम होणें ; त्रास होणें ; मरणोन्मुख होणें - स्थितीस येणें . ' बाळंतपणानें औत घेतली .' न. १ आऊत ; शेतकी वगैरे धंद्याचें साधन . जसें - मळ्यांच्या कामाची औतें - नांगर , कुळव , पाभर , दंताळें , मैंद , पेटारी , फावडें , पिकाव , पहार , करवडी , कोपळें , खुरपें व विळा , कयता वगैरे कापणीची साधनें ; शेतीसाठी औत वापरण्याची चाल वेदकालापासूनची आहे . सामान्यतः नांगर , कुळव , पाभर इ० जीं बैलांनी फिरवावयाची साधनें त्यास और म्हणतात . ' जे कर्ता जीव विंदाणीं । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणीं आउती दाहे । ' - ज्ञा १८ . ४५४ . ' नागरीं कवळी मग आउतें वोढीं । ' - उषा १५९७ . २ एका नांगरानें नांगरली जाईल इतकी जमीन . सुमारें ८०बिघे . - विल्सन कोश . ३ ( व .) शेतकामाच्या बैलांची एक जोडी . ' आमच्या घरीं चार औतें आहेत .' ४ - पुन . ( कों .) भंडार्याचा माडाची पोय कापण्याचा कोयता . ५ साधन ; हत्यार ( सोनार , कांसार , कुंभार इ० धंद्याला लागणारें ); आयुध ; शस्त्र . ६ ( राजा .) सूप , टोपली , रोवळी , पंखा , इ० ; वंशपात्र . प्रभु जातींत वरातीच्यावेळी बांबूच्या हातरीवर वरीलपैकी जें साहित्य ठेवतात त्यास औत् म्हणतात . ७ मासे पकडण्याचें जाळें ; आवत . ( वाक्प्र .) औताचा नांगर , औताचा बैल . ( सं . आयुध , आ + युत = जोडला जाणारा ; गो . आवत ) ०चालणें नांगर चालू असणें . ०धरणें शेतकाम चालु करणे . ०भरणें शेतकीचीं हत्यारें साफसूफ , तयार करून ठेवणें . ०सुटणें पडणे ) - काम बंद करणें . ( पडणे ) - काम बंद करणें . ०करी पु. नांगर धरणारा ; शेतकरी ; औत्या . ०काठी - स्त्री . ( सामा .) औत ; शेतकीचीं हत्यारें . ०पट्टी स्त्री. १ प्रत्येक नांगरावरील सरकारी कर . ( नांगर्यावरहि असा जादा कर बसवीत .) २ ताडाच्या तोडणीच्या प्रत्येक कोयत्यावरील कर . ०बेदी स्त्री. प्रत्येक नांगरावर कर बसविण्याची पद्धति ; नांगरबंदी , खानदेशांत यास ओटबंदी म्हणतात . ०भरणा पु. ( समुच्चयानें ) १ शेतकरी वर्ग . २ शेतकीचीं हत्यारें . ३ नांगरावरील सरकारीकर . औतपट्टी पहा . ( आऊत असाहि प्रयोग आढळतो ).
|