|
स्त्री. वस्त्र , कागद , भाकरी इ० चा दुमडलेला कांठ . रस्ता , नदी इ० चें वळण ; वांक . दोरी , शरीर , गात्र इ० स दिलेला वळसा . पदार्थाचा घाट , आकार , ठेवण , घडण , ढब , धाटणी . एखाद्या कामांतील कौशल्य . मिशांना दिलेलें अक्कडबाज वळण . जमीनीची वक्रता . अक्षराचें वळण . भाषणांस दिलेलें निराळें वळण ; भाषण संपविण्याकरितां , त्याचा ओघ बदलण्याकरितां दिलेलें वळण ; भाषणाच्या ओघाला दिलेली निराळी गति . वस्त्राचा कांठ दुमडून घालण्याची एक प्रकारची शिवण . करंजी , कानवला इ० चे कांठ जोडून वळवून घालतात ती घडी , दुमड ; त्यांच्या सांध्यावर करतात ती नक्षी . [ का . मुरि = वाकणें , वळणें ] ०कानवला कान्होला - पु . कांठाला मुरड घातलेला कानवला . ( मुलगा , मुलगी परगांवास निघाली असतां त्यांनीं लवकर परत यावें म्हणून जातांना त्यांच्या जेवणांत मुरडकानवला देण्याची चाल असे त्यावरुन ). ०कानवला - परगांवाहून लवकर परत येणें . मुरडण , न - स्त्री . ( शेती ) पिकाची एक पात काढावयाची पुरी करुन दुसरी काढण्यासाठीं पुन्हां परत फिरणें . बांधाच्या एका टोंकांस जाऊन औत परत फिरणें . सामान्यतः वळण ; परती . मुरडणी - स्त्री . मुरडण्याची , दुमडण्याची क्रिया . मुरडणें - उक्रि . खाणें - परगांवाहून लवकर परत येणें . मुरडण , न - स्त्री . ( शेती ) पिकाची एक पात काढावयाची पुरी करुन दुसरी काढण्यासाठीं पुन्हां परत फिरणें . बांधाच्या एका टोंकांस जाऊन औत परत फिरणें . सामान्यतः वळण ; परती . मुरडणी - स्त्री . मुरडण्याची , दुमडण्याची क्रिया . मुरडणें - उक्रि . मागें वळणें ; फिरणें ; माघारें उलटणें ; परतणें . मग तो मुरडला ऋषेश्र्वर । भ्यालेपणें । - कथा १ . १५ . ६२ . मान मागें वळवून पहाणें . यश रुसलें मुरडुनि तुज पहातें मुला बाहे । - मोउद्योग ९ . ७६ . पिरगाळणें ; वांकडें करणें ; मागें वळविणें . अरिच तैंचि मुरडितों नरडें । - मोविराट १ . १०७ . दुमडणें ; चुरगाळणें ; घड्या घालणें . सुरकुतणें ; खुरटणें ; आकसणें . ( करंजी , कानवला इ० स ) नक्षीदार मुरड घालणें ; कांठ वळविणें . कागदाला घड्या घालून रकाने पाडणें . पराजय करणें . न श्वसनावरि अभ्र सुरडेल । - मोभीष्म ५ . ३० . [ का . मुरि = वळणें ; वळविणें ; फिरविणें ] अंग , नाक , कान , डोळे , हात , तोंड मुरडणें , मुरडणें - अंग इ० वांकडें करुन नापसंति दर्शविणें . मुरडशेंग , मुरुडशेंग - स्त्री . एक औषधी शेंग ( हिला मुरड किंवा पीळ असतो ); असल्या शेंगेचें झाड मुरडा - पु . दुमड ; पीळ ; पिरगळा ; वेठ . आमांशादि विकारानें आंतडीं पिळवटल्यासारखीं होऊन पोटांत होणारी व्यथा ; पोटशूळ . पानें , फुलें इ० खुरटून टाकणारा , झाडास होणारा एक रोग ; मरटी . मुरडाण , न - न . वांकडीतिकडी , वळणाची जमीन . नांगराची खेप ( शेताच्या एका टोकापासून दुसर्या टोकाला जाऊन परत पहिल्या ठिकाणीं येणारी ); अशा एका खेपेनें नांगरला जाणारा जमिनीचा पट्टा , भाग . मुरडिव , मुरडीव - वि . मुरडलेला ; नागमोडी ; पीळदार ; फिरलेला ; दुमडलेला ; वांकडा . मुरडीव शुण्डादंड सरळ । - दा १ . २ . १२ . मुरडी - स्त्री . मुरडा ; मुरटी ; बटाटे वगैरेवर पडणारा एक रोग . मुरडुगा , मुरडुंगा - वि . ( राजा . ) नखरेबाज ; मरडत चालणारा , ऐटबाज चालीचा , नटूनथटून जाणारा .
|