Dictionaries | References

कडू

   
Script: Devanagari
See also:  कडु

कडू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v ये with डोळ्यांला.
in contrad. from the exterior portion. 5 Unkindly; ungenial to the taste of wood-worms--certain trees or plants. 9 Rough, austere, not sweet--certain oils. 7 Hard, saline, unloamy, unsuitable for cultivation--a soil. 8 Strong, sharp, biting, bitter--varieties of certain vegetables. 9 Stern, severe, unrelenting--a person or disposition.

कडू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bitter. Unkindly, stern, unrelenting.

कडू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  उग्र, तीव्र असा, कारल्यासारख्या चवीचा   Ex. हे औषधाची चव फार कडू आहे
MODIFIES NOUN:
बोल चव
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
कडवा
Wordnet:
asmতিতা
bdगोखा
benকড়া
gujકડવું
hinकड़ुवा
kanಒಗರು
kasٹیوٚٹھ
malകയ്പു്‌ രസം
mniꯑꯈꯥꯕ
nepतितो
oriପିତା
panਕੌੜਾ
sanतिक्त
telచేదైన
urdکڑوا , تیکھا

कडू     

वि.  १ . कडवा ( गोडाचे उलट , कडुनिंबाच्या चवीप्रमाणें ). २ बेचव ; पित्तविकारामुळें बदलणारी ( जिभेची रुचि ). ३ न रुचणारें ; अप्रिय ; कठोर ( वाक्य , भाषण इ० ). ' आधीं कडु मग गोड .' ४ ज्यास कीड लागत नाही , जें कीड खात नाहीं असें ( विशिष्ट झाड , वनस्पति ). ५ जारज संतति ( गोडच्या उलट ). ६ गोड नसणारें ; अशुदेध ( विशिष्ट तेल ). ७ कठिण , गांठ्यांळ ( बाभळीच्या लांकडाचा आंतील भाग ; नार ; वरचा भाग ठिसूळ , नरम किंवा गोड असतो ). ८ निर्दय ; कडक ; ताठर ( माणुस , स्वभाव ). ९ नापीक ; लागवदीला प्रतिकूल ( जमीन ). १० झोंबणारी ; कडक तिखट ( विशिष्ट भाजी ). - न . १ ( ल .) अफू . २ कात ( रात्रीच्या वेळेस काताचें नांव घ्यावयाचें नाहीं म्हणुन त्याबद्दल म्हणतात ) ३ मृताशोंच . कडु विटाळ या शब्दाचा संक्षेप . - स्त्री . डोळ्यांचें दुखणें ( डोळ्यांत माती गेल्यानें , जाग्रण केल्यानें येणारें ). ( क्रि येणे , उ० डोळ्यांला कडु येणें ). - पु . १ दासीपासून झालेली संतति ; अनौरस जारस सतति ; लेकवळा ( याच्या उलट गोड .) ' त्याच्या राज्यांत मल्हारराव नामक त्याच्या एका कडु सापत्‍न भावानें जें बंड माजविलें होतें ...' - हिंक ८४ . २ पाटाची संतति ( सं . कटु ; प्रा . कडु ; गु . कुडवु ; हिं कडुवा ; सिं कडो )
०इंद्रायण  न. कुंपणावारील एक वेल ; ह्याची फळें तांबडीं , विषारी व रुचीस कडू असतात ; कवंडळ ; इंद्रावण ; इंद्रवारुण ; कडूवृदांवन २ ( ल .) तुसडा . माणुघाण्या ; एकलकोंडा माणुस .
०करांदा   - पु . एक कडवट तपकिरी रंगाचा कंद .
०कारले  न. १ कारलें . २ ( ल .) वाईट स्वभावाचा व न सुधारणारा माणुस . ' तो एक कडुं कारलें आहे , त्याची संगत धरूं नको म्हणजे झाले ,' म्ह० कडू कारले तुपांत तळलें . ' साखरेंत घोळलें तरी तें कडु तें कडुच .'
०कारळी   कारळें - स्त्रीन . कारळें तीळासारखें औषधी बीं ; कडु जिरें ; काळें जिरें . याचें झाड दोन तीन हात उंच असून ह्यास थोडे येतात . व त्यांत बी असते . हें कृमिनाशक आणि वातनाशक आहे . - शे . ९ . २३४ .
०काळ  पु. वाईट दिवस ; अडचणीची स्थिति ; साथ ; दुष्कळ ; दुर्गति . ( क्रि० येणें ; असणें ; चालणें ; वाहणें ; जाणें ; टळणें ; चुकणें ; चुकविणें )
०घोसाळें  न. घोसाळ्याची एक जात . - शे . ९ . २३५ .
०जहर वि.  अतिशय कडु ; विषासरखें कडू
०जिरें   कडू कारळी पहा .
०झोंप  स्त्री. अपुरी झोंप ; झोंपमोड ; झोंपेचें खोबरें . ( क्रि०करणें ).
०तेल  न. १ करंजले , करंजाच्या बियांचें तेल . २ उंडिणीचे तेल ; ( हेट .) पुन्नागफळांचें तेल . ४ ( सामा .) न खाण्यापैकी तेल ( चोखटेल किंवा गोडे तेल याच्या उलट ).
०दोडका  पु. १ कडवट दोडका . २ दासीपुत्र ; लेकवळा . ३ ( ल .) पंक्तिबाह्म ; जातिबहिष्कृत माणुस ; कडु भोपळा पहा .
०दोडकी  स्त्री. भाद्रपद महिन्यांत फुलणारी एक वेल ; दिवाळी ; हिचीं पानें औषधीं असून , फळांस दिवाळें म्हणतात . - शे ९ . २३५ .
०निंब  पु. बाळनिंब ; बाळंतनिंब ; हा वृक्ष फार मोठा असून सर्वत्र होतो . याची पानें गुडीपाडव्याला खातत . हा अनेक व्याधींवर उपयोगी आहे . याचे लाकुंड इमारतीच्या उपयोगी आहे . आर्यवैद्यकांत याला रसायन म्हटले आहे . म्ह० १ गूळ चारणारापेक्षां निबचारणारा बरा होतो . २ ( कर्‍हेपठारी ) कडु निंबाच्या झाडाखालून उठून आला = ज्याच्या जवळ कांहीं पैसा नाहीं असा ; भणंग ; ( उपहासार्थी योजितात ).
०पडसळ  न. कडू असलेलें पडवळ . - शे . ९ . २३५ .
०पाणी  न. पाण्यांत कडुनिंबाचें किंवा निरगुडीचें टहाळे बालून उकळलेलें पाणी ( यानें आजार्‍यास , बाळंतिणीस वगैरे स्नान घालतात ). २ विटाळ सपल्यानंतर बायका ज्या पाण्यानें डोक्यावरुन स्नान करतात तें पाणी . अशा स्नानालाहि म्हणतात . ( क्रि० घेणे ). ३ मृताशौच किंवा कडूविटाळ संपल्यानंतर माणसानें स्नानार्थ घ्यावयाचें पाणी . ( येथें कडु म्हणजे दुःखदायक प्रसंगाशीं आलेला संबंध ). ( क्रि . घेणें ) ४ भाजीपाला शिजविलेलें पाणी .
०पाणी   ( बायको वाप्र .) वरील विटाळ फिट - साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें .
काढणें   ( बायको वाप्र .) वरील विटाळ फिट - साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें .
०पाला  पु. कडु पाण्यांत घालावयाचीं करंज , लिंब , निर्गुडी , जांभळी इ० ची पानें . भोपळा - पु . १ कडवट रुबीचा भोपळा ; दुध्या भोपळ्याची एक जात ( याचा उपयोग सतार , वीणा , वगैरे वाद्यांच्या कामीं व सांगड , तुंबडी इ० च्या कामीं करतात ). २ ( ल .) दासीपुत्र . ३ ( ल .) पंक्तिबाह्म ; हलक्या जातीचा ; बहिष्कृत माणुस .
०भोपळी  स्त्री. कडू भोपळ्याची वेल ; कडू भोपळा अर्थ १ पहा . - शे . ९ . २३६ .
०वट   टु - वि . ( काव्य ) कडवट पहा . ' कैलासवन कडुवट । उमावन तुरट । ' - शिशु ६१५ . ' जैसा निंब जिभे कडुवटु । ' - ज्ञा १८ . १८६ . ' कडुवट हरिनामें वाटती पापियाला । ' - वामन नामसुधा १ . ४ . ३४ .
०वाघांटी  स्त्री. कडवट फळें येणारी एक वनस्पती ; आषाढी द्वादशीस हिच्या फळांची भाजी करतात .
०विख वि.  कडजहर ; विषाप्रमाणें कडु
०विटाळ  पु. १ मृताशौच ; सुतक . २ बाळंतपणाचा विटाळ ; बाळंतिणीला येणारा दहा दिवसांचा विटाळ ; जननाशौच . ( क्रि० येणें ; जाणें ; सरणें ; फिटणें ;).
०वृदांवन  न. कडू इंद्रायण पहा . ' कडु वृदांवन । साखरेचें आळें । ' - तुगा .

कडू     

कडू कारलें
(ल.) वाईट, कधीहि न बदलणारा असा स्‍वभाव
या स्‍वभावाचा माणूस. ‘बाळू, तूं विठूची एवढी मनधरणी करूं नकोस. तो अगदी कडू कारले आहे.’

Related Words

कडू   कडू भोपळा   आधीं कडू, मग गोड   कडू निंबाच्या झाडाखालून उठून आलेला   तिक्त   कडू कारल्‍याची उपाधी गोडीनेंहि जात नाहीं   गोडमें गोड गरज, और कडूमें कडू करज   आडांत कडू तर पोहर्‍यांत कुठलं गोड   कडू कडू जहर   ज्‍वरें विटाळलें मुख। तें दुधातें म्‍हणे कडू विख।।   कडू कारलें   कडू काळ   कडू तेल   कडू दोडका   कडू पडवळ   कडू पाणी   कडू विटाळ   काळाची करणी कडू असते   कडू पाणी काढणें   भरले पोटा, अंजिर कडू   पांच कडू पदार्थः   കയ്പു്‌ രസം   bitter   ಕಹಿ ಕುಂಬಳಕಾಯಿ   पातक आगमीं गोड, निर्गमीं कडू   पोट भरलें म्हणजे उंबर कडू   कोडूदुदी   तितलौकी   तुम्बकः   చేదైన   তেঁতো লাউ   ਕੌੜਾ ਕੱਦੂ   ପିତା ଲାଉ   ഉരുണ്ട ചുരയ്ക്ക   कडू झाडाला पाने फार, दुर्भाग्‍याला बोलणें फार   गोड बोलणें सौजन्याचें, कडू बोलणें हट्टाचें   पेरी कडू मिरें, मागे अमृत फळें   કડવું   कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच   कडू बोलून दान दिल्‍यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा   कड़ुवा   गोखा   کَریلہٕ   তিতা   ਕੌੜਾ   ପିତା   ಒಗರು   कोडू   तितो   ٹیوٚٹھ   கசப்பான   சுரைக்காய்   તુંબડી   సొరకాయ   কড়া   vernonia anthelmintica willd.   hydnocarpus laurifolia (denn.) sleumer   swertia decussata nimmo.ex. grah.   trichosanthes cucumaria l.   bitter almond   bitter lake   margosa   corchorus trilocularis l.   ratafia   bitter principle   citrullus colosynthis (l.) schrad.   कडु खावुनु गोड खांवका   चोखटेल   melia azadirachta   विखख   कडवणी   कडवीजात   कर्‍हाट   शेकडू   तिल्लोरी   रायेण   काळेरें   ऊदिल प्रायोज्जित   शिंदापोरगा   tigline   जहर   काडेचिराईत   कारातें   इंद्रवरुण   इंद्रवरूण   इंद्रवारुण   इंद्रवारूण   कट्व   कडुपणा   कडुलिंब   कडूजहर   गोड बोलतां वाचें, तुझें काय वेंचे   विहिरींत खारें तर पोहर्‍यांत कोठून येईल गोडें   समष्ठिल   असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी   santonin   colocynth   आडांतच पाणी नसेल तर पोहर्‍यांत कोठून येणार   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP