|
पु कड ; बाजू .' दक्षिणे श्रीमुकुटाचा कडु केला .' - ऋ १३५ ; - अमृ २ . ४८ . ( कांहीं प्रतींत ). ( कडे ) वि. १ . कडवा ( गोडाचे उलट , कडुनिंबाच्या चवीप्रमाणें ). २ बेचव ; पित्तविकारामुळें बदलणारी ( जिभेची रुचि ). ३ न रुचणारें ; अप्रिय ; कठोर ( वाक्य , भाषण इ० ). ' आधीं कडु मग गोड .' ४ ज्यास कीड लागत नाही , जें कीड खात नाहीं असें ( विशिष्ट झाड , वनस्पति ). ५ जारज संतति ( गोडच्या उलट ). ६ गोड नसणारें ; अशुदेध ( विशिष्ट तेल ). ७ कठिण , गांठ्यांळ ( बाभळीच्या लांकडाचा आंतील भाग ; नार ; वरचा भाग ठिसूळ , नरम किंवा गोड असतो ). ८ निर्दय ; कडक ; ताठर ( माणुस , स्वभाव ). ९ नापीक ; लागवदीला प्रतिकूल ( जमीन ). १० झोंबणारी ; कडक तिखट ( विशिष्ट भाजी ). - न . १ ( ल .) अफू . २ कात ( रात्रीच्या वेळेस काताचें नांव घ्यावयाचें नाहीं म्हणुन त्याबद्दल म्हणतात ) ३ मृताशोंच . कडु विटाळ या शब्दाचा संक्षेप . - स्त्री . डोळ्यांचें दुखणें ( डोळ्यांत माती गेल्यानें , जाग्रण केल्यानें येणारें ). ( क्रि येणे , उ० डोळ्यांला कडु येणें ). - पु . १ दासीपासून झालेली संतति ; अनौरस जारस सतति ; लेकवळा ( याच्या उलट गोड .) ' त्याच्या राज्यांत मल्हारराव नामक त्याच्या एका कडु सापत्न भावानें जें बंड माजविलें होतें ...' - हिंक ८४ . २ पाटाची संतति ( सं . कटु ; प्रा . कडु ; गु . कुडवु ; हिं कडुवा ; सिं कडो ) ०इंद्रायण न. कुंपणावारील एक वेल ; ह्याची फळें तांबडीं , विषारी व रुचीस कडू असतात ; कवंडळ ; इंद्रावण ; इंद्रवारुण ; कडूवृदांवन २ ( ल .) तुसडा . माणुघाण्या ; एकलकोंडा माणुस . ०करांदा - पु . एक कडवट तपकिरी रंगाचा कंद . ०कारले न. १ कारलें . २ ( ल .) वाईट स्वभावाचा व न सुधारणारा माणुस . ' तो एक कडुं कारलें आहे , त्याची संगत धरूं नको म्हणजे झाले ,' म्ह० कडू कारले तुपांत तळलें . ' साखरेंत घोळलें तरी तें कडु तें कडुच .' ०कारळी कारळें - स्त्रीन . कारळें तीळासारखें औषधी बीं ; कडु जिरें ; काळें जिरें . याचें झाड दोन तीन हात उंच असून ह्यास थोडे येतात . व त्यांत बी असते . हें कृमिनाशक आणि वातनाशक आहे . - शे . ९ . २३४ . ०काळ पु. वाईट दिवस ; अडचणीची स्थिति ; साथ ; दुष्कळ ; दुर्गति . ( क्रि० येणें ; असणें ; चालणें ; वाहणें ; जाणें ; टळणें ; चुकणें ; चुकविणें ) ०घोसाळें न. घोसाळ्याची एक जात . - शे . ९ . २३५ . ०जहर वि. अतिशय कडु ; विषासरखें कडू ०जिरें कडू कारळी पहा . ०झोंप स्त्री. अपुरी झोंप ; झोंपमोड ; झोंपेचें खोबरें . ( क्रि०करणें ). ०तेल न. १ करंजले , करंजाच्या बियांचें तेल . २ उंडिणीचे तेल ; ( हेट .) पुन्नागफळांचें तेल . ४ ( सामा .) न खाण्यापैकी तेल ( चोखटेल किंवा गोडे तेल याच्या उलट ). ०दोडका पु. १ कडवट दोडका . २ दासीपुत्र ; लेकवळा . ३ ( ल .) पंक्तिबाह्म ; जातिबहिष्कृत माणुस ; कडु भोपळा पहा . ०दोडकी स्त्री. भाद्रपद महिन्यांत फुलणारी एक वेल ; दिवाळी ; हिचीं पानें औषधीं असून , फळांस दिवाळें म्हणतात . - शे ९ . २३५ . ०निंब पु. बाळनिंब ; बाळंतनिंब ; हा वृक्ष फार मोठा असून सर्वत्र होतो . याची पानें गुडीपाडव्याला खातत . हा अनेक व्याधींवर उपयोगी आहे . याचे लाकुंड इमारतीच्या उपयोगी आहे . आर्यवैद्यकांत याला रसायन म्हटले आहे . म्ह० १ गूळ चारणारापेक्षां निबचारणारा बरा होतो . २ ( कर्हेपठारी ) कडु निंबाच्या झाडाखालून उठून आला = ज्याच्या जवळ कांहीं पैसा नाहीं असा ; भणंग ; ( उपहासार्थी योजितात ). ०पडसळ न. कडू असलेलें पडवळ . - शे . ९ . २३५ . ०पाणी न. पाण्यांत कडुनिंबाचें किंवा निरगुडीचें टहाळे बालून उकळलेलें पाणी ( यानें आजार्यास , बाळंतिणीस वगैरे स्नान घालतात ). २ विटाळ सपल्यानंतर बायका ज्या पाण्यानें डोक्यावरुन स्नान करतात तें पाणी . अशा स्नानालाहि म्हणतात . ( क्रि० घेणे ). ३ मृताशौच किंवा कडूविटाळ संपल्यानंतर माणसानें स्नानार्थ घ्यावयाचें पाणी . ( येथें कडु म्हणजे दुःखदायक प्रसंगाशीं आलेला संबंध ). ( क्रि . घेणें ) ४ भाजीपाला शिजविलेलें पाणी . ०पाणी ( बायको वाप्र .) वरील विटाळ फिट - साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें . काढणें ( बायको वाप्र .) वरील विटाळ फिट - साध्या पाण्यानें स्नान करणें किंवा अंगावर पाणी घेणें . ०पाला पु. कडु पाण्यांत घालावयाचीं करंज , लिंब , निर्गुडी , जांभळी इ० ची पानें . भोपळा - पु . १ कडवट रुबीचा भोपळा ; दुध्या भोपळ्याची एक जात ( याचा उपयोग सतार , वीणा , वगैरे वाद्यांच्या कामीं व सांगड , तुंबडी इ० च्या कामीं करतात ). २ ( ल .) दासीपुत्र . ३ ( ल .) पंक्तिबाह्म ; हलक्या जातीचा ; बहिष्कृत माणुस . ०भोपळी स्त्री. कडू भोपळ्याची वेल ; कडू भोपळा अर्थ १ पहा . - शे . ९ . २३६ . ०वट टु - वि . ( काव्य ) कडवट पहा . ' कैलासवन कडुवट । उमावन तुरट । ' - शिशु ६१५ . ' जैसा निंब जिभे कडुवटु । ' - ज्ञा १८ . १८६ . ' कडुवट हरिनामें वाटती पापियाला । ' - वामन नामसुधा १ . ४ . ३४ . ०वाघांटी स्त्री. कडवट फळें येणारी एक वनस्पती ; आषाढी द्वादशीस हिच्या फळांची भाजी करतात . ०विख वि. कडजहर ; विषाप्रमाणें कडु ०विटाळ पु. १ मृताशौच ; सुतक . २ बाळंतपणाचा विटाळ ; बाळंतिणीला येणारा दहा दिवसांचा विटाळ ; जननाशौच . ( क्रि० येणें ; जाणें ; सरणें ; फिटणें ;). ०वृदांवन न. कडू इंद्रायण पहा . ' कडु वृदांवन । साखरेचें आळें । ' - तुगा .
|