|
पु. १ ( संकेतिक ) ब्रिब्बा ; भिलावा . २ ( काव्य ) श्रीकृष्ण ; विठोबा . ' अपयशाचें खापर .... त्या काळयाच्या टाळक्यावर फुटलें ' - नामना १३ . ३ काळसर्प . ' जागविळा . पृच्छी त्वां देवुनि पद बहु सपूर्वफट काळा । ' - मोउद्योग १२ . २१ . - वि . १ कूष्णवर्ण ; श्याम ; काजळाच्या रंगासारखा ; तशा रंगानें युक्त असलेला . २ कपटी . ' कृष्ण बाहेर काळा तसाच आंतहि काळा आहे .' - परिभौ २५ . ( सं . काल ; फ्रें जि . काळों , काळादीं - जिप्से माणुस ; पो . जि . काळी ; फा . कारा ; सिं काला ; का . करि ) काळपुर्वपद असलेले रंग , वर्ण या अर्थाचें सामासिकशब्द - काळजिभ्या - वि . १ शिवराळ तोंडाचा ; अनिष्ट बोलणारा ; निमदळ शिव्याशाप देणारा ; अचकट विचकट बोलणारा . २ ज्याचें वाईट भाषण खरें होतें असा . ०टिक्या वि. १ काळे ठिपकें असलेला ( घोडा इ० ) घोड्याच्या ७२ . अशुभ चिन्हापैकीं हें एक आहे . - मसाप २ . ५६ . ०तोंड्या वि. १ दुदैवी ; अपशकुनी ; दुषाट . २ लज्जित झालेला ; गांगरलेला ; खजिना . ' स्नेह कैसा सांडिला ध्रुवा आजी । काळतोंडा जाहलों जगामाजीं । ' चिंतामणिकवि ध्रुवाख्यान . ३ ( व .) ओठावर काळें केंस असलेलें ( जनावर ). ०ळंदरा ळंद्रा -( शिवी ) कळ्या उंदरासारखा काळा कुळकुळींत . ०दांत्या वि. १ कोळ दांत असलेला ( कर्मविपाकावरुन असला माणुस पूर्वजन्मीं मांग होता अशी समजूत आहे .) २ ( ल .) अशुभकारक ; अनिष्टदर्शक ; अपशकुनी ( माणुस ). ३ ( ल .) शिव्यशाप देणारा ; शिवराळ ; निंदक ०ळंबन ळमन - स्त्रीन . अंधारलेली , सर्द हवा ; पाऊस , थंडी यांनी युक्त वांबाळी हवा . ( कांदिबीनी ) ०बुडीं बोंडीजोंधळी - पु . जोंधळ्याची एक जात ; यांचे बोंड काळें असतें . ०मांजर पुन कांडेचोर ; ऊद . ०मुखीं वि. १ काळ्यां तोंडाचा ; तोंडावर काळे केंस असलेला ( घोडा ), हा अशुभकारक समजतात . २ सामान्यत ; काळ्या तोंडाचा . ३ ( काव्य ) दृष्ठ ; भयंकर ; राक्षसी . ' नागविलेलतापी थोर थोर । दशवक्त्र काळमुख । ' ०मुखीगुंज स्त्री. काळा ठिपका असलेली गुंज . ०मुख्या वि. दुदैवी ; अभागी ; अधम ; नीच . ०लोह न. पोलाद ; कालायस . ' काळलोहें डंवचिलें । वज्रवाटीं बांधिलें । ' - शिशु ५०९ . ०वख खा खें - पुन . १ काळोखं ; अंधार ( कांही ठिकाणी चुकीनें काळवसें असा शब्द वापरलेला आहे ). ' महामोहाचा काळवखा । ' - भाए १०२ . ' कां काळ राहें काळवखा । तो आपणा ना आणिकां । - अमृ ४ . ३६ . ' निद्रेचे शोधिले । काळवखें । ' - ज्ञा . १२ . ४९ . ' अविद्येचें काळवसे । समूळ गेलें तेधवां । ' भवि ९ . १९६ . २ काळेपणा ; डाग . ०वट वि. १ काळसर . २ काळा ; काळी ( जमीन ) ( काळ + वत् ) ०वटणें वंडणें - अक्रि . १ काळेंक पडणें ; मलिन होणें ; ( ऊन वगैरे लागल्यामुळें शरीरल . इ० ) अपराध , भयय यांनीं चेहरा काळा ठिकर पडणें ; काळानिळा पडणें ; हिरवा निळां होणें . २ शेत पीक यांचा फिकटपणा जाऊन टवटवीत होणे . निसवण्याच्या स्थितीस येणें . ३ ( काव्य ) काळा पडणें . ' ग्रहणी काळवंडे वासरमणि । ' ' चंद्रबिंब विटाळलें । गुरुद्रोहें काळ - वडलें । ' - कथा १ . २ . १५० . ०वटी वण - स्त्री . काळिमा ; डाग ; कलंक ; दोशः ०वडी स्त्री. ( कों .) काळवंटणें , काळवंडणें पहा . ०वत्री वथरी - स्त्री . सह्याद्रीतील दख्खनमधील अग्निगर्भ काळा खडक ; हा ज्वालामुखीच्या रसाच्या थरांतील उष्णता विसर्जन पावून झाला आहे . - सृष्टि ३८ . ०वदन वि. काळमुखी ( घोडा ) पहा . ०अश्वप ९४ . ०विद्रें काळूंद्रा पहा . काळवें -( राजा . कुण ) संध्याकाळची काळोखी . ०सर = वि . काळवट ; किंचित् काळ्या रंगाचा . ०सरणें अक्रि . काळवटणें ; काळवंडणें पहा . ०साबळा वि. काळासावळा ; साधारण काळा . ( रंग ). काळानें आरंभ होणारे शब्द ( वाप्र .) काळ्याचें पांढरें होणें - एखाद्याचे काळे केस पांढरें होणें ; म्हातारापण येणें ; पांढर्याचें काळे होणें - म्हातारापणांत तरूणपणाचे चाळे करणें ; सचोटी सोडुन देणें . काळ्या डॊईचें मनुष्य - न . ( जेव्हां इतर जीवांपेक्षां ( प्राण्यापेक्षां ) माणसांची अद्भुत शक्ति वर्णाव याची असते अशावेळी हा शब्द माणसास लावतात ). काळ्या दगडावरची रेघ -( वाप्र .) टिकाऊ ; वक्षप्य ; अबाधित अशी गोष्ट ; उक्ति ; न बदलणारी गोष्ट . ' ही आपली माझी काळ्या दगडावरची रेघ .' - तोंब . १७९ . सामाशब्द - अबलख - वि . पांढर्या अंगावर काळे ठिपखें असणारा ( घोडा ). ०अभ्रक पु. काळ्या रंगाचा अभ्रक . ०आजार पु. हा भयंकर रोग असाम व मद्रास इलाख्याच्य्सा एक भागांत होतो . यानें यकृत व प्लीहा फाआर वाढतात आणि रोज ताप येतो . ०उन्हाळ्या पु. १ अत्यंत कडकडीत उन्हाळा ; यामुळें सर्व सृष्टी पदार्थ रखरखींत भासतात . २ कठिण , आणीबाणीची , टंचाईची वेळ ; आयुष्यांच्या भरभरटीच्या साधनांचा अभाव . ' तूं काळ्या उन्हाळ्यांत मजजवळ पैका मागतोस काय ?' ३ चैत्र व वैशाख हे दोन महिनें . ०उंबर पु. उंबर झाडाची एक जात . ०कभिन्न कभीन - वि . अत्यंत काळा ; लोखंडासारखा काळा . ( सं . काल + का . कब्बिण्ण = लोखंड ) ०किट्ट कीट कुट्ट कुळकुळीत मिचकूट - वि . अतिशय काळा . ( किट्ट , कुट्ट वगैरे शब्द जोर दाखवितात ). लोखंडासारखा किंवा शाईसारखा काळा . काळा जहर पहा . ' हा अमावास्येचा काळाकुट्ठ अंधार ' - चंद्रग्र २ . ०कटवा पु. काळा तीळ . ०करजत करंद - वि . काळाकभिन्न . ०करंद फत्तर - पु . काळा दगड ; ' कृष्णवेणीचें पाणी काळाकरंद फतरांतून उसळ्या मारीत .' - खेया २९ . ०कुडा पु. कुड्याच्या झाडांतील एक जात . दुसरा तांबडा कुडा . ( सं . कुटज ; बं . कुटराज ; हिं . कुडा , कौरिया ; गु . कडी ) ०कुमाइत वि. काळ्या रंगांत तेल्या रंगाची झांक असलेला ( घोडा .) क्रूम - पु . ( चांभारी ) विशिष्ट पद्धतीनें कमावलेलें काळें कातडें . ०खोपर वि. खाप्रासारखा काळा . ०गुरु पु. काळ्या रंगाचा अगरु . ०धूप ' तत्काळ काळागरु धूप दावी । ' - सारुह ८ . ७९ . ०गवर पु. एक शक्तिबंर्धक वनस्पति९ . ०गहिरा - वि . काळा कुट्ट . ०गुगळी पु. गुगळासारखा काळा मासा . ०गुरा पु. एक लहान झाड . ०गोरा वि. १ काळा व गोरा . २ खराखोटा ; शुद्धाशुद्ध . ०चांफा पु. चाफ्यांतील एक भेद . ०चित्रक पु. चित्रक ( एक औषधी ) झाडाची एक जात काळची - पु . ( गो .) नीचमनुष्य . - ळ्यांजनी - वि . एकरंगी असुन ड्याव्या खाकेच्या जवळ किंवा छातीवर काळा टिपका असलेला ( घोडा ) यामुळें धन्याला मृत्यु येतो अशी समजुत आहे . अश्वप ९६ . ०जहर ठिक्कर ढोण - वि . काळाकभिन्न . ०डागलेवाला पु. पोलीसचा शिपाई . ०तित्तर तीतर - पु . रंगीबेरंगी तितर पक्षी . ०तीळ पु. कारळा तीळ पहा . ०दगड पु. काळवत्री वथरी पहा . ०दाणा पु. एक वेल ; हिचें कांडें व शाखा यांवर बारीक कुसें असुन पानें कपाशीसारखीं असतात . फुलें फिकट निळ्या रंगाचीं घंटेच्या आकाराचीं , व मोठी असतात . फळ नरम असुन आंत तीन पुडें व त्यांत काळेम बीं असतें . याचा औषधाकडे उपयोग करतात . - वगु ७ . १ . ( सं . कृष्णबीज , नीलपुष्पी ) ०धोतरा पु. काळसर - जांभळकट धोतर्याचें झाड . ०निळा वि. काळासावळा ( रंग , चेहरा ). ०फत्तर पु. १ काळावथरी दगड . २ ( ल .) अत्यंत मूर्ख ; अडाणी माणुस . ०बगळा पु. काळ्या पाठीचा बगळा . ०बाळा बाहाळा - वि . फिकट काळे किंवा काळे व पांढरें पट्टे अंगावर असलेला ( पशु .) ०बेंदरा बेंद्रा - वि . काळा व हेंगाडा ; विदूप ; मी चांगट फांकडी रुपानें तूं काळां बेदरा ' - पला ५ . ( काल + हेंदर ) ? ०बेरा वि. काळाबेंदरा ( अंगाचा वर्ण , स्वरुप , कपडालत्ता वगैरे ). ०बोळ पु. बाळंतबोळ ; एका झाडाचा वाळलेला चीक . हा मुलांच्या पोटदुखीवर उपयोगी आहे . भिल्ल - भील - मांग - वीखं - वि . काळ्याकभिन्न . ०भोपळा पु. भोपळ्याची एक जात ; तांबडा भोपळा ; गंगाफळ . ०माजा पु. मायफळ ; माजुफळ . ०मासी पु. पित्तपापडा . ०मुरुम पु. काळ्या रंगाचा मुरुम . ०शेंगळ पु. काळ्या रंगाचा एक मासा . ०सांवळा वि. केवळ काळाहि नाहीं व केवळ गोराहि नाहीं असा ( रंग , रंगाचा ); साधारण काळा . ( सं . काल + श्यामल ) ०सावा पु. साव्याची काळी जात . ०सुरमा पु. डॊळ्यांत घालावयाचें एक अंजन ; ( ब्लॅक सल्केट ऑफ अँटिमनी ). काळें - उडीद - पुअव . माप ; एक द्विदल धान्य . ०केस पुअव . ( ल .) तारुण्य व त्यांतील खुमखुमीचा काळ ; याच्या उलट पांढरें करडे केश . ०तीळ पुअव . काळ्या रंगाचें तीळ , श्राद्धपक्ष , श्रावणी वगैरे कार्यांत उपयोगी पडणारें तीळ . काळेला - रा - वि . काळसर वर्णाचा काळ्यां पाठीचें खोबरें - न . ज्या खोबर्याचें पाठ काळी असतें तें , ही खोबर्यांची एक जात आहे काळानें आरंभ होणारें शब्द . काळी - वि . १ रंगानें काळी ( स्त्री . मादी वगैरे ) स्त्री . - स्त्री . म्हैस ( कारण ती रंगानें काळी असतें ) ज्याचें घरी काली त्याची सदा दिवाळी । ' - म्ह० ( व .) काळीकाळीउंदर तिचा सैपाकक सुंदर काळ्य़ा ख्रीस चढविण्यासाठीं म्हणतात . सामाशब्द . ०काठी स्त्री. एक औषधी झुड्प . ०कांब १ काळ्याकुट्ट ढगांची रांग . ( क्रि . येणें ; जमणें ; उठणें ; विरणें ; फाकणें ). २ ( ल .) काळ्या रंगाच्या कुणबारीक ( जेवण वगैरेस बसलेली ) पंगत . ०खजुरी खजूर खारीक - स्त्री . एक औषधपयोगी रानकहरीक . ही कडु अग्निदीपक व ज्वरनाशक आहे . ०गुळी स्त्री. काळा रंग तयार करण्याच्यी कामीं उपयोगांत येणारी नीळ . ०घेटूळ टोळी - स्त्री . घेडूणचीच एक काळी जात . ०चंद्रकळा स्त्री. काळें लुगडें ; यांचें उभार व आडवण सर्व काळें व किनार कोणत्याहि तर्हेंची असते . ०जिरी स्त्री. कडू कारळी . ०तुळस स्त्री. काळ्या पानांची व मंजिर्यांची तुळस ; कृष्णतुळस . ०तेरी स्री . काळ्या . पानांची व मंजिर्याची तुळस ; कृष्णतुळस . ०तेरी - स्त्री . काळ्या रंगाचें अळूं ; हें मुळव्याध नाशक , अग्निदीपक , व शौचास साफ करणारें आहे .- योरा १ . ४७ . ०धार वि. दृश्य क्षितिज ; समुद्रांत पहात असतां ज्यापुढें दृष्टी पोंहचत नाहीं तो मर्यादप्रदेश . - शास्त्रीकों . ' त्याची ह काळेधारेशी लागलेली आहे .' - बाळ २ . ११८ . ०पानवेल स्त्री. काळ्या रंगाच्या विड्यांच्या पानांची वेल ; हिचें पान स्वादिष्ट परंतु तिखट . ०प्रजा स्त्री. १ सामान्यपणें मजुरवर्ग . २ बडोद संस्थांनांतील भिल्लासारखी एक जात ; ( गु .) कालील परज . ०भिंत स्त्री. उत्तरदिशेस जेथपर्यंत मनुष्यांचें गमन होतें तेथील सीमाप्रात . - शास्त्री . ०भोपळी स्त्री. काल्या भोपळ्याचा वेल . ०माशीं वि. १ मोठी ; काळ्या रंगाची व्रण , क्षत , मेलेलें जनावर यांवर बसणारी माशी . २ एका जातीचें गवत . ०मिरचीं स्त्री. १ ( हिं .) काळ्या मिरच्या येणारी मिरचीची एक विशिष्ट जात . २ काळीं मिरें . ०मुष्टि स्त्री. जारणमारणांतील मूठ ( मारग्याची ). ' काळ्यामुष्ठीची बाधा होतां । ' - नव ६ . १५२ . ०मुसळी रात्र शिळीं रात्र - स्त्री . १ भयंकर रात्र ; भयाण रात्र . ' हि कळीरात्र चालली आहे मी खोटें बोललों तर पाहुन घेईल ' ( काळ + रात्र ) २ हा शब्द क्रियाविशेषणासारखा सप्तम्यांत करूनहि योजतात जसें :- काळ्याशिवाय रात्रीं . जास्त माहितीसाठी बंद खालील . भरल्या बंदाखालीं बसणें पहा . ३ अमावास्क्या , मध्यरात्र , अशुभ भाषण भूतपिशाच्च्याचें आगमन ( असत्य भाषण व शपथ यांखेरीज ) वगैरेसंबंधानेंहि सामान्य रात्रीस हा शब्द लावितात ; अरिष्टसुचक रात्र . ०वसु स्त्री. एक औषधी वनस्पति ; हिचा दुसरा प्रकार पाढंरी वसू . ०वेल स्त्री. गुरांच्या रोगावर उपयोगी पडणारी एक वेल . ०साळ स्त्री. काळ्या रंगाची साळ किंव अभात . काळेंनें आरंभ होणारें शब्द - काळें - न . १ डग ; कलंक ; काळिमा ; अपकीर्ति . ( काळा ) वाप्र काळें करणें - तोंड काळें करणें ; तोंड लपवून जाणें ; दृष्टिआड होणे . फरारी होणें ( दोष , अपराध वगैरेमुळें ). ' जा कर काळें । ' - कर्म २ . ०तोंड जाणें - पळुन जाणें ; पोबारा करणें . ' काळ तोंड घेऊनि । गेला नेणो कोणीकडे । ' सामाशब्द - घेऊन जाणें - पळुन जाणें ; पोबारा करणें . ' काळ तोंड घेऊनि । गेला नेणो कोणीकडे । ' सामाशब्द - ०अळू न. काळी तेरी पहा . ०अक्षर न. कागदावर लिहिलेलें मनोगत , अक्षरें लेख , पत्र इ० ; यच्च यावत अक्षरमात्र शास्त्रीकों . ' हा पंडित काळ्या अंक्षरांचा अर्थ करील .' ०कमळ न. हें हिमालय पर्वतावर बर्फोत उप्तन्न होतें याला एक हजार पाकळ्या अज़्सुन त्यांचा घेर एक हातभर असतो - तीप्र ४१ . ०कृत्य न. कृष्ण कारस्थान ; अन्याय . ०खापर न. अतिशय काळा माणुस . अपकीर्ति . बदनाम झालेला , पराभव झालेला , आजारानें कृश , अशक्त झालेला माणुस . ०गवत न एक प्रकारचें गवत . ०जिरूं जिरें - न . १ कडु कारळें . २ शहाजिरें ( हिं , काली जिरी , सं कालजीरक ) ०ढवळें न. १ संशय ; शंका ; अनिष्ट कल्पना ; अदेशा . २ काळें बेरें पहा . ०तेरें न. काळी तेरी , काळें अळुं पहा . ०तोड पु. स्वतः पासुन पुढील पांचवा वंशज ( आपल्या पणतुचा मुलगा ). - विओ . लाजिरवाणी कृत्यें केल्यानें कलंकित झालेलें तोंड . तुझें काळें तोंड दृष्टीआड कर . ' - थर - वि . काल्या रंगाचा थर ; कार दगड किंवा काळवथरी धोंडा . ०द्राक्ष न. एक प्रकारच्या काळा मनुका . ०पाणी न. १ महासागर . २ अकाली किंवा अतिशय पडलेल्या पावसाच्या पाण्याचा दोष घालविण्यासाठी बागेस दिलेलें विहिरीचें पाणी . ३ ( ल .) हद्दपरीची शिक्षा व ती भोगावा . याचें ठिकाण ( ही शिक्षा झालेल्या इसमास हिंदुस्थानाबाहेर अंदमानांत ठेवतात ). ' अखेरीस जाल काळ्या पाण्यावर चांगले ' - भा १०४ . ०पान न. काळ्या पानवेलीचें विड्यांचें पान ०बुबुळ न. डॊळ्यांचा काळ भाग ( बाहुली व कानीनिका ). ०बरें भरें ळें - न . १ अनिष्ट संशय ; वाईट आकांक्षा ; अनिष्ट कल्पना ; कुंषका ; कपट . ( क्रि . येणें .) ' हें काळेंबेरें तुझ्या मनांत कोठून आलें ?' - गीर ६१२ . २ लुच्चेगिरी ; डावपेंच ; कारस्थान ; गिळकृंत करणें ; दडपादडपी . ०भिवरी स्त्री. काळवथरी पहा . ०मांजर न. कांडेचोर ; उद . ०मिरें न. काळ्या रंगाचें मिरें . ' भिरुं पहा . ०मीठ - न . पादेलोण . २ खार्या मातीपासुन उप्तन्न केलेलें मीठ . - रें - न . कडु कारळें .
|