Dictionaries | References

केळ

   
Script: Devanagari
See also:  केल

केळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाका घडांनी लांब गोड फळां लागतात आनी जाचीं पानां खूब लांब आसतात अशें एक झाड   Ex. ताणें आपल्या घरा फाटल्या पोरसांत केळी लायल्यात
MERO COMPONENT OBJECT:
केळें
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকলগছ
bdथालिर बिफां
gujકેળ
hinकेला
kanಬಾಳೆಹಣ್ಣು
kasکیٛلہٕ کُل
malവാഴപ്പഴം
mniꯂꯐꯨ
sanकदली
tamவாழை
telఅరటిచెట్టు
urdکیلا , کیلے کا درخت

केळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
आपल्या घरचा राजा &c.
kēḷa m A wild variety of Ficus.

केळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The plantain.
  Its fruit. Fig. The base or front of a ब्राम्हण's turban: also the upper and front portion of the gown of a little girl (this being of a similar form).

केळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक झाड ज्याची पाने मोठी व फळ गोड असतात   Ex. गोवा, वसई व कर्नाटकाकडे केळीची लागवड केली जाते
MERO COMPONENT OBJECT:
केळे
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকলগছ
bdथालिर बिफां
gujકેળ
hinकेला
kanಬಾಳೆಹಣ್ಣು
kasکیٛلہٕ کُل
kokकेळ
malവാഴപ്പഴം
mniꯂꯐꯨ
sanकदली
tamவாழை
telఅరటిచెట్టు
urdکیلا , کیلے کا درخت
See : केळे

केळ     

 न. १ काठीचें दुबेळकें , डोकें भाग . २ दुबेळें , दुबेळक्यांचा कांटा . ३ मोडलेल्या फांदीच्या , झाडांच्या खोडावर राहिलेला भाग . ४ काठीला लाविलेली आंकडी .
 पु. ( गो .) पिंपळाच्या जातीचें एक झाड .
 स्त्री. केळीचें झाड . हें पुष्कळ दिवस टिकणारें , कंदरुप आहे . ह्याला मोठीं पानें येतात . ह्याच्या अनेक जाती आहेत . गोवें , कर्नाटक , वसई इकडे यांचें पीक फार , कच्चा केळ्यांची , व केळफुलांची भाजी होते . सोपटांची राख कोष्टी व धनगर लोक सूत रंगविण्याकडे वापरतात . पानांचे दांडोरे वाळवून त्यापासुन उप्तन्न होणारा क्षार कोंकणांत परीट लोक साबणासारखा वापरतात .- वगु २ . ५७ . वैष्णव लोक कपाळास जी अक्षत ( काळा टिकला ) लावतात ती हळकुंड उगाळुन त्यांत सोपटाची राख खलुन करतात केळीच्या मुठेळी , तांबेळी , बसराई वेलची , सोन , राजेळी , म्हशेळी इ० जात आहेत . आगाशीकडे केळी वाळवून तयार करतात त्यांस सुकेळीं म्हणतात . ' फेडुन केळ्यांची साउडी । ' - विउ ४ . ६२ . ' धिवर जिलब्यांनी केळ पोसल्यें । ' प्रला २२९ . २ केळींचें फळ . ३ ब्राह्माणी पागोट्यावरील कपाळपट्टीवरचा भाग , बिनी . ४ स्त्रिया लुगड्याच्या निर्‍य़ा पोटाजवळ खोवून केळ्यांच्या आकाराचा भाग करतात तो . ( सं . कदली ; प्रा . कयल - केल ) ( वाप्र .) केळें खाणें - साखरखाणें -( ल .) खोटें बोलणारा , मुर्खासारखी बडबड करणारा वगैरेना औपरोधिक शब्द शेण , गु खाणें , झक मारणें तूं किंवा तो तर आपल्या घरचा राजा . असे याच अर्थाचें कांही वाक्यप्रचार आहेत . सामाशब्द
०खंड  न. न भरणारें केळें ; वांझ केळें . याणी भाजी करतात .
०फुल   बोंड कमळ - न . केळीच्या कोंक्यापासुन निघालेलें फुल ; हें कडु , तुरट , ग्राहक , अग्निदिपक उष्ण वीर्ण व कपनाशक आहे . याची भाजी करतात केळंबा भा - पु . १ केळीचें पोर ; पासांबा ; नवीन फुटलेला कोंब ; केळीचें रोप . ( क्रि०फुटणें ) २ चवेणीचा पोगा , पोगाडा ; काल .
०वंड   वडी केळीवली - स्त्री . ( कों .) केळ्यांचा घड , लोंगर ; त्यांच्या देठांचा झुबका . ' बारामहिने नेहमीं केळवंडी पिकत .' - पाव्ह ११ .
०वत्तर   निरी - स्त्री . परवट्यांची सर्वांत वरची निरी . केळवत्तर निरी झळकैली । - शिशु ४३ .
०वली  स्त्री. पिकलेलीं केळीं मोदकपत्रांत सालीसकट उकडुन काढून ती सोलुन कुसकरून त्यांत साखर , नारळाचा खव इत्यादि घालुन त्या पुराणाचें मोदकासारखें पक्वान्न तुपांत तळुन करतात . तें . - गृशि १ . ४६४ .
०वा  पु. ( कों .) केळंबा भा - पहा . केळीचा कांदा - पु . केळीचा गड्डा ; हा वातनाशक व स्त्रियांच्या प्रदेर रोगावर औषधीं आहे . - योर १ . ४६ . केळ्याचा हलवा - पु . राजेळी केळीं मोठाली तीन , घेऊन चुरावी व त्यांत साखर , तूप मिसळुन थोडें चुलीवर आठवून तेंताटांत ओतावें व त्यांच्या बड्या पाडुन त्यावर बदामची पसरावें . - गृशि १ . ४२३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP