Dictionaries | References

कपाळ

   
Script: Devanagari
See also:  कपाल

कपाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The skull or cranium. The foreshead. Fate.
कपाळ उठणें   Get a headache.
कपाळीं कांटी घेऊन जाणें   Take one's self off.
कपाळीं हात मारणें   Express astonishment, sorrow, or concern.
कपाळ ठरणें   To have it in one's destiny preordained.
कपाळ फुठणें   To become unfortunate.
कपाळमोक्ष होणें   To have one's head broken.
कपाळाचें कातडें नेणें   To blast one's fortunes,
कपाळाशी कपाळ घासणें   To hang about.

कपाळ     

ना.  निढळ , भाल , ललाट ;
ना.  अद्दष्ट , दैव , नशीब , प्रारब्ध , ब्रह्मलिखित .

कपाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  डोक्याचा समोरचा भाग   Ex. सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती
HOLO COMPONENT OBJECT:
चेहरा
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मस्तक ललाट भाळ शिर माथा निढळ
Wordnet:
asmকপাল
benমাথা
gujમસ્તક
hinमाथा
kanತಲೆ
kasڈٮ۪کہٕ , بَل
kokकपल
malശിരസ്സു്‌
mniꯂꯥꯏꯕꯛ
nepनिधार
oriକପାଳ
panਮੱਥਾ
sanललाटः
tamநெற்றி
telనుదురు
urdپیشانی , جبیں , ماتھا , سرنامہ

कपाळ     

 न. १ डोक्याची कवटी ; डोक्यांचं हाड ; करटी . २ मडक्याचा अर्धा भाग ; खापर ; खापराचा तुकडा ; श्रौतकमींत ज्यावर पुरोडाश भाजतात असे खापराचें तुकडे . ८ , ११ , १२ , १३ असून त्यांचा एक गट असतो . ३ भिवया आणि डोक्याचे केंस यामधील भाग ; ललाट ; भाल . ४ नशीब ; प्रारब्ध ; ब्रह्मलिखित ( ब्रह्मदेव मनुष्याच्या कपाळावर त्याचें भाविष्य लिहून ठेवितो या समजुतीवरून ). ' किं एकदांचि फुटलें त्वत्पतिपंचककपाळ पापानें .' - मोसभा ६ . ४ . ' गडे , काय कपाळाला करूं । नाहीं घरांत एक लेंकरूं ॥ ' - प्रला . ५ ( कपाल ) चपटें , पातळ हाड ; खांद्याचा किंवा मांडीचा फरा . ६ भिक्षापात्र , ' कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर । ' - तुगा २०५० . ७ ( भुगोलशास्त्र ) कोणत्याहि याम्योत्तर वृत्ताच्यापुर्वेकडील किंवा पश्चिमेकडील अर्धे गोलार्ध . - उद्गा . १ नाहीं . खोटें . अशक्य हा अर्थ पटविण्यासाठीं ' माझें कपाळ ! तुझें कपाळ । ' इ० उद्गार काढतात . ' असें ऐकतां हासले द्वारपाळ । वदों लागले कृष्णजीचें कपाळ ! । ' - कचसु ६ . २ दुःखदर्शक उद्गार , हाय ! हाय ! ' काय सांगु कपाळ !'
०उठणें   चढणें - डोकें दुखणें ; त्रास कटकट होणें ; पीडा होणें . ' भजन करितो सर्व काळ । उठते कपाळ आमचें ॥ ' उगा करिती कोल्हाळ । माझें उथणें कपाळ । ' - रामदास .
०काढणें   वैभवास चढणें ; नशीब काढणें , ' तो चांगला कपाळ काढील असा मला रंग दिसत आहे .'
०खुलणें   ( हिं ) दैव उदयास येणें .
०जाणें   दुर्देवाच्या फेर्‍यांत सांपडणें ; भाग्य नाहींसे होणें .
०टेकणें   एखाद्यावर भरंवसा ठेवून अवलंबून असणें ; कपाळटेंक करणें .
०ठरणें   नशिबांत लिहिल्यासारखी एखादी गोष्ट घडून येणें ; दैवांत असणें . ' पुढें मागें याही गोष्टीत सुधारकांचा वरचष्मा होऊन या हताश , विचार शुन्य , मत्सरी ... लोकांस ... मुळुगुळु रडत बसावे लागेल हें यांचे कपाळ ठरलेलेंच .' - आगर .
०धुवून   नशिबीं काय आहे तें पाहणें ; नशीब पाहणें ;
पाहणें   नशिबीं काय आहे तें पाहणें ; नशीब पाहणें ;
०पिटणें   दुःखातिशयामुळें डोकें जमिनीवर आपटणें . ' एक अवनीं कृपाळ आपटिती । ' - ह १८ . ९६ .
०फुटणें  न. दुदैव ओढवणें ; दैव प्रतिकुल होणें ; सर्वस्वाचा नाश होणें ; आपर्त्ति कोसळणें .' कपाळी कुंकूं लागतें आहे म्हणुन हसायला लागूं कीं कपाळ फुटलें म्हणुन रडत बसूं ' २ वैधव्य येणें . ' मी गरीब कितिही असलें । जरी कपाळ माझें फुटलें । ' -( राजहंस ) गोविंदाग्रज
०फोडणें   फार शोक , दुःख करणें . ' कुंतल तोडी , कपाळ फोडी , करी थोर आकांत । ' - विक ५३ .
०बडविण   दुःखतिशयामुळें किंवा क्रोधाच्या आवेगानें कपाळ पिटणें ; कपाळावर हातानें मारुन घेणें . ' कळतां वृत्त क्रोधें घे बहु बडवूनि तो कपाळाला .' - मोवन ४ . ८३ .
०मोक्ष    १ एखाद्याचा सर्वस्वी नाश करणें . २ खूप झोडपणें ; ठार मारणें . कपाळमोक्ष पहा . - ळाची रेघ - रेषा उमटणें , उघडणें - आकस्मिक रीतीनें सुदैव प्राप्त होणें ; एकदम मोठेपणा , श्रीमंती मिलणें = ळाचें कातड नेणें - विपत्तींत लोटणें ; भाग्यहीन करणें ; नुकसान करणें . - ळ्यांत तिडाक उठणें - १ डोंकें दुखणें . २ ( ल .) त्रासणें ; रागावणें ; ' आडमुठ्यांच्या घरांचें नांव काढलें कीं यशवंतरावांच्या कपाळास तिडीख उठे .' - यशवंतराव खरे . - ळांतले तीन फातर -( गो .) दुदैवाचे फेरे . ( ढोमले , थोड्यारें - थोड्यारे म्हणुन एक प्रकारची मासंळी आहे तिच्या डोक्यांत तीन पांढरे दगड असतात यावरुन .) - ळाला आठ्या घालणें , चढणें - त्रासणें ; अति त्रास होणें ; मनाविरुद्ध गोष्ट घडणें ( त्रास झाला असतां कपाळास आठ्या पडतात यावरून ). ' उलट कपाळाला आठ्या घालुन म्हटलें - तुला काय त्याची चौकशी ?' - उषःकाल . - ळ्याला किंवा कपालावर केस उगवणें - अशक्य गोष्ट घडणें . ( पुढें घडेल असें वाटणार्‍य़ा एखाद्या गोष्टीची असंभाव्यता दर्शवितांना हा प्रयोग योजितात . तळ हाताला केंस येणें याप्रमाणें ). - ळावर कपाळाला किंवा कपाळी हात मारणें , लावणें - न . नशीबास दोष देणें . २ आश्चर्य , दुःख , काळजी प्रदर्शित करणें . ' अशीच तुम्हीं दोघंही सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां .' - हामुबा ८२ . - ळाशी कपाळ घासणें - १ आपल्याला लाभ होईल या आशेनें एखाद्या भाग्यवानाशीं सहवास करणें ; संगतींत राहणें . २ कच्छपीं लागणें ; मागें मागें असणें ; गुलामवृत्तीनें अनुकरण करणें . - ळास अपकीर्तिअपयश - दारिद्र्य - आपत्ति येणें - अपमान , गरिबी , दुर्लोकिक इत्यादि प्राप्त होणें ; नांव बद्दु होणें . - ळ्यास , कपाळीं येणें - नशीबी येणें . ' जरी आलें पतन या कपाळाला । ' मोआदि १० . ८२ . -: ळीं कांटीं घेऊन जाणें - निघुन जाणें ; चालतें होणें ; काळें करणें . - ळीं डाग लागणें - बेअब्रु होणें ; फजिती होणें ; कलंक लागणें . - ळीं डाग लागणें - बेअब्रु होणें ; फजिती होणें ; कलंक लागणें . - ळीं भद्रा असणें - नेहमीं दुदैवी असणें ; प्रतिकुल प्रह असल्यामुळें दरिद्र्य येणें . - ळीं लिहिलेलें असणें - नशीबी असणें ; प्राक्तनांत असणें ; योग येणें . ' माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती .' - एक १२२ . - म्ह० १ कपाळभर कुंकूं व हातभर बांगड्या - सुवासिनीपणाची स्थित ; सौभाग्य . २ ( ल .) केवळ कुंकवाचा धनि म्हणुनच जीस्त्री नवर्‍याला मानते अशा स्त्रीच्या बाबतींत योजतात .
करणें    १ एखाद्याचा सर्वस्वी नाश करणें . २ खूप झोडपणें ; ठार मारणें . कपाळमोक्ष पहा . - ळाची रेघ - रेषा उमटणें , उघडणें - आकस्मिक रीतीनें सुदैव प्राप्त होणें ; एकदम मोठेपणा , श्रीमंती मिलणें = ळाचें कातड नेणें - विपत्तींत लोटणें ; भाग्यहीन करणें ; नुकसान करणें . - ळ्यांत तिडाक उठणें - १ डोंकें दुखणें . २ ( ल .) त्रासणें ; रागावणें ; ' आडमुठ्यांच्या घरांचें नांव काढलें कीं यशवंतरावांच्या कपाळास तिडीख उठे .' - यशवंतराव खरे . - ळांतले तीन फातर -( गो .) दुदैवाचे फेरे . ( ढोमले , थोड्यारें - थोड्यारे म्हणुन एक प्रकारची मासंळी आहे तिच्या डोक्यांत तीन पांढरे दगड असतात यावरुन .) - ळाला आठ्या घालणें , चढणें - त्रासणें ; अति त्रास होणें ; मनाविरुद्ध गोष्ट घडणें ( त्रास झाला असतां कपाळास आठ्या पडतात यावरून ). ' उलट कपाळाला आठ्या घालुन म्हटलें - तुला काय त्याची चौकशी ?' - उषःकाल . - ळ्याला किंवा कपालावर केस उगवणें - अशक्य गोष्ट घडणें . ( पुढें घडेल असें वाटणार्‍य़ा एखाद्या गोष्टीची असंभाव्यता दर्शवितांना हा प्रयोग योजितात . तळ हाताला केंस येणें याप्रमाणें ). - ळावर कपाळाला किंवा कपाळी हात मारणें , लावणें - न . नशीबास दोष देणें . २ आश्चर्य , दुःख , काळजी प्रदर्शित करणें . ' अशीच तुम्हीं दोघंही सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां .' - हामुबा ८२ . - ळाशी कपाळ घासणें - १ आपल्याला लाभ होईल या आशेनें एखाद्या भाग्यवानाशीं सहवास करणें ; संगतींत राहणें . २ कच्छपीं लागणें ; मागें मागें असणें ; गुलामवृत्तीनें अनुकरण करणें . - ळास अपकीर्तिअपयश - दारिद्र्य - आपत्ति येणें - अपमान , गरिबी , दुर्लोकिक इत्यादि प्राप्त होणें ; नांव बद्दु होणें . - ळ्यास , कपाळीं येणें - नशीबी येणें . ' जरी आलें पतन या कपाळाला । ' मोआदि १० . ८२ . -: ळीं कांटीं घेऊन जाणें - निघुन जाणें ; चालतें होणें ; काळें करणें . - ळीं डाग लागणें - बेअब्रु होणें ; फजिती होणें ; कलंक लागणें . - ळीं डाग लागणें - बेअब्रु होणें ; फजिती होणें ; कलंक लागणें . - ळीं भद्रा असणें - नेहमीं दुदैवी असणें ; प्रतिकुल प्रह असल्यामुळें दरिद्र्य येणें . - ळीं लिहिलेलें असणें - नशीबी असणें ; प्राक्तनांत असणें ; योग येणें . ' माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती .' - एक १२२ . - म्ह० १ कपाळभर कुंकूं व हातभर बांगड्या - सुवासिनीपणाची स्थित ; सौभाग्य . २ ( ल .) केवळ कुंकवाचा धनि म्हणुनच जीस्त्री नवर्‍याला मानते अशा स्त्रीच्या बाबतींत योजतात .
०कटकट  स्त्री. तोच तोच विषय पुन्हा पुन्हा सांगत बसणें ; कर्म कटकट .' आतां मी जातें आणि त्या पोरीजवळ कपाळकटकट करीत बसतें .' - पिंगला नाटक .
०करटा   करंटा - वि . दुदैवी ; अभागी ; दैवहीन ; जुना वरच्या कपाळावर आंगठ्याखाली झांकण्याइतपत पांढरा टिकळा असल्यास तें अशुभ , कपाळकरंटें समजतात . ' काळें तोंड करी कपाळकरटे जा , खेप आणी दुजी । ' - आठल्ये .
०कष्टी  स्त्री. १ अति त्रास ; अतिशय श्रम , ( मूर्ख किंवा हेकेखोर मनुष्याची समजूत घालण्यासाठीं पडणारा ); डोकेफोड ; उरस्फोड . २ एकाच गोष्टीचा नाद , हट्ट ; एकसारखी बडबड - वटवट ; खिसखिस ; धरणें धरून केलेली मागणी . कपाळकूट खटखट पहा . ( कपाळ + कष्ट ) - वि . थकवा आणणारें ; त्रास देणारें ( काम ); असें काम करणारा .
०कांठी  स्त्री. ( विणकाम ) वही ( ओवी ) किंवा चाळा ज्यास पक्कें केलें आहे . किंवा बांधलें आहे असें आडवें लांकूड किंवा दांडा . हें मागच्या वर असतें .
०कूट   स्त्रीन . १ माथेफोड ; शिकविण्याचें फुकट श्रम . कपाळकष्टी पहा . ' कपाळकुट जाहालें लोकीं बोभाट ऐकिला । सांवळे । ' - भज ८ . २ वटवट ; बडबड ; एकसारखी विनवणी , याचना . ' एकदां तिनें दाराची कडी लावली कीं कोणी कितीहि कपाळकुट करो , इला कडी काढील तर शपथ !' - इलासुंदरी १५ .
०क्रिया  स्त्री. यति संन्यासी वगैरे मृत झाल्या वर समाधी देण्यापूर्वी मस्तकावर शंख आपटून मस्तक फोडण्याची क्रिया ; कपाळमोक्ष .
०खटखट  स्त्री. त्रास ; उद्वेग कपाळ . कूट पहा . - ळाचा डाग - पु . ( कपाळवरील काळा डाग ; दुर्लोकिक ; अपकीर्ति ; कलंक ; ( क्रि०लागणें , चुकणें , लागू होणें ).
०टेंक   टेंकणी ढोंकणी - स्त्री . ( कपाळ टेंकणें ). ( ल .) एखाद्या वर भार ; भरंवसा टाकणें ; अवलंबून राहाणें ; स्वतःच्या आकांक्षाइच्छापुर्ति दुसर्‍यावर सोंपविणें .
०दुखी  स्त्री. ज्यांत सतत डोकें दुखत राहतें असा रोग ; डोकेदुखी ; कपाळशुर .
०पट्टा  पु. १ घोड्याची म्होरकी किंवा सरोसरी हिचा एक भाग ; कपाळा वरचा पट्टा . हा मुखपट्याहुन निराळा असतो .
०पट्टी  स्त्री. १ कपाळ ; कपाळाचा भाग ; ललाटपटल . ' विधात्यानं प्राणि मात्रांचं अदृष्ट डोळ्यांला न दिसणार्‍या कपाळपट्टीवर लिहून ठेवलं आहे .' - एक ४१ . २ कुंचडें कानटोपी इ० चा कपाळावरील भाग , पट्टी ; टोपीचा कपाळावरील भाग . ३ दरवाज्याच्या चौकटीचें वरचें आडवें लांकूड ; गणेशपट्टी . ४ मोटेच्या विहिरीच्या धावेवरील खांबावर असलेलें आडवें लांकुड . ५ कोणत्याही यंत्ररचनेंतील आडवें बहाल . ६ ब्रह्मालिखित ; ब्रह्मादेवानें कपाळीं लिहिलेलें ; निशिबी असलेलें . ( कपाळ + पट्टी )
०पांचशेरी   पांसरी - स्त्री . न टळणारी दैवगति ; अटळनशीब . नशिबाचा दाखला कशानेंहि बदलत नाहीं असा . ' कोठेंहि गेलां तरी कपाळ पांचशेरी बरोबर .' ( कपाळ + पांचशेरी = चरितार्थ )
०पाटी   कपाळपट्टी १ पहा . ' तीची असे सज्ज कपाळपट्टी । ' - सारुह ५ . ११० .
०फुटका वि.  कपाळाकरंटा ; दैवहीन ; कमनशिबी ; अभागी . ( कपाळ + फुटणें )
०फोड  स्त्री. कपाळकुट ; कपाळकष्टी पहा . ( हा शब्द फार त्रासदायक कामाला लावितात ).
०फोडा  स्त्री. कपाळ फोडीचें फळ .
०फोडी  पु. एक वनस्पति ; चिरबोटी ; फोपेटी . याचें फळ ( कपाळाफोडा ) वार्‍यानें फुगविता येतें . लहान मुलें हें फळ कपाळावर आपटून वाजवितात ( कपाळावर फोडणें - म्हणून कपाळ फोडी हें नांव ).
०फोडी  पु. डोईफोड्या ; मनजोगें झालें नाहीं म्हणजे कपाळ फोडून घेणारा ; इष्टवस्तु मिळेपर्यंत हट्ट धरून बसणारा ( भिकारी ); आततायी . - वि . कपाळकूट करणारा ; हट्टी ; दुराग्रही अक्रस्ताळ्या ; अंकाडतांडव करणारा .
०माळा   उद्गा . कल्पनातीत वाईट अवस्था पाहून आश्चर्य किंवा दूःखदर्शक उद्गार . - स्त्री . रुंडमाळा ; शंकराच्या गळ्यांतील नरमुंडाची माळा . ' जटा विभूती उटि चंदनाची । कपाळमाळा प्रित गौतमीची । ... तुजवीण शंभो मज कोण तारी । ' - शिवस्तुति .
०मोक्ष  पु. १ प्रेत जळत असतां कपाळाची कवटी फुटण्याची क्रिया . २ मृत संन्याशाच्या डोक्यावर शंख आपटुन मस्तक फोडण्याची क्रिया . ३ डोक्यास आकस्मिक होणारा एखाद्या वस्तुचा आघात ; डोकें फुटणें . - करणें - ठार मारणें . ' मनोहराला स्वर्गी पाठवावें म्हणुन त्याचा कपाळमोक्ष करण्याचा मी प्रयत्‍न केला .' - मतिविकार . ४ काशीक्षेत्रांतील पांच मुख्यं तीर्थांपैंकी एक तीर्थ . - होणें -( ल .) मरणें ; अंत होणें .' खरी वेळ आली म्हणजे या भीमाच्याच लत्ताप्रहारानें त्या धर्मभ्रष्टाचा कपाळमोक्ष होणार हें मला पक्कें दिसत आहे .' - कीच .
०रेखा   रेषा लेख - स्त्रीपु . नशीब . दैव ; विधिलिखित ( विधीनें कपाळावर लिहून ठेवलेलें
०शुल   सुळ - पु . कपाळदुखी पहा

कपाळ     

-कपाळ उठणें-चढणें
डोके दुखणें
त्रास, कटकट, पीडा वगैरे होणें. ‘उगा करिती कोल्‍हाळ। माझे उठलें कपाळ।’ -रामदास.

Related Words

कपाळ   कपाळ ठरणें   कपाळ फोडणें   कपाळ अढी   कपाळ फुटणें   कपाळ छिनत चालल   कपाळ धुवून घेंणें   गोरा गोमटा, कपाळ करटा   माथा   कपाळ न पासरी (बरोबर)   डोळे काढिले आणि कपाळ हलकें झालें   आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे   निनांदतीला (निदांदीला) हजार बुद्धि, फोडलें कपाळ बांधली चिंधी   कपाळ काढणें   कपाळ खुलणें   कपाळ जाणें   कपाळ पिटणें   कपाळ बडविणें   फुटकें कपाळ   पारोसें कपाळ   forehead   ललाटः   निधार   நெற்றி   నుదురు   ਮੱਥਾ   મસ્તક   ശിരസ്സു്   कपाळ धुवून पाहणें   कपाळ पलौन कट्टी   कपाळ फुटकें, करी लटकें   कपाळाशीं कपाळ घांसणें   (एखाद्यावर) कपाळ टेकणें   डोळे गेले कपाळ राहिलें   मन पाच्छाई, कपाळ गांडू   धोंडयाशीं कपाळ घासणें   देखलो गुंडो, घेतलें कपाळ   कपल   उन व कपाळ बडवून घेणें   brow   आशा कपाळ करंटी, लोक लागले पाठीं   कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे?   कपाळाला कपाळ घासल्‍यानें दैव येत नाहीं   विनाशकाळे विपरीत बुद्धि, कपाळ फोडून बांधली चिंधी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   ठणठणपाळ फुटकें कपाळ, भिक्षा मागे आळोआळ   डोक्‍याचें नांव कपाळ आणि कपाळाचें नांव डोकें   फरवुं कपाळ, तो शूं करे भूपाळ   फरे कपाळ, तो शूं करे भूपाळ   কপাল   शिंदळ रांडेला बार्‍या बुध्या, कपाळ फोडून बांधिल्या चिंध्या   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   बाईनें पैसे खरचिले पण शेवटीं तिचें कपाळ फुटलें   खाफाल   କପାଳ   মাথা   ತಲೆ   कपाळाचें टेकाड   बॉड   माभळभटी गंध   कपेळफोडणी   कंपळ   खोपरी   उरस्फोड करणें   चांभारीपाटी   माथें उठतें   माथें ठणाणतें   माथें दुखतें   निटिल   खोपडें   गंडस्फाटण   कानटोपी   घुल्ल   झेटि   डोई उठविणें   भाळ पिटणें   या आणि माझ्या कपाळच्या गंधाक्षता पहा   पिशेअ हस्तेक शेंदूर वत्तिलेगादि   होरणें   टणु   टणूं   पंधरा विभूतिस्थानें   कपाळाच्या मानानें टिळा   कंपोल   कंपोळ   सवदागर   सवदागिरी   सवदासूत   अद्रुष्ट   माकडटोपी   माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे   नवचंदरी म्हैस   गोरा गोमटा, नरहरदेव करंटा   उग्रट   एकडकाठी   घुलें   सवदा   सवदागरी   सवदागीर   अलिक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP