Dictionaries | References

खरवड

   
Script: Devanagari

खरवड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; or, as interpreted by some, To work hard and to save all. Descriptive of true household wisdom--industry and frugality. 2 fig. Abusing or scolding coarsely and violently. v काढ g. of o. Ex. ह्याची म्यां भली ख0 काढली. 3 The remains of a fortune.

खरवड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Scrapings (as of milk, &c.) hardened & adhering to the cooking-pot. Fig. Scolding coarsely and violently.
कामाला मरावें आणि खरवडीला जपावें   One should work hard and save all.

खरवड

 ना.  खरपुडी , जळकट भाग ( शिजवताना भांडयाच्या तळाला चिकटून राहणारा );
 ना.  खपली ;
 ना.  पोपडा .

खरवड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पदार्थ शिजत अगर आटत असता तळाला कठिण झालेला आणि भांड्यास चिकटून राहिलेला जळकट भाग   Ex. बेसनाची खरवड मला आवडते.
SYNONYM:
खरपूडी
   See : खरड

खरवड

  स्त्री. १ पदार्थ शिजत अगर आटत असतां तळाला कठिण झालेला आणी भांड्यास चिकटून राहिलेला खरडा , जळकट भाग ; ( भाताचा , तुपाचा , दुधाचा ); खरपुडी . ' भ्रतारासी करी झगडा । तया घाली खरवडी कोंडा । ' कथा ५ . २४९ . २ अशी रीतीनें चिकटून राहिलेला आणि खिरडुन निघण्याजोगा भात . म्ह० कामाला मरावेंखरवडीला जपावें = १ कामाला चुकार पण खाण्याला अखेरपर्यंत किंवा २ खूप काम करून शक्य तों काटकसर करावी ( उद्योगीपणा आणि काटकसर असावी ). २ ( ल .) खरडपट्टी ; निर्भर्त्सना ; ताशेरा ; बोंडती . ( क्रि० काढणें .) ' ह्याची म्हां भली खरबड काढली . ३ ( ल .) संपत्तीचा शेष ; किडकमिडूक ; गजगंज जाऊन उरलेला अवशेश . ४ निकृष्टता दाखविण्यासाठीं उपहासानें योजतात . उदा० मोठा बेटा शहाण्याची खरबड - गाणाराची खरवड .' ५ ( निंदाव्यंजक ). अर्क ; गाळ ; अतिशय खोड्याळ , त्रासदायक माणुस . ' तो सर्व गांवाची खरवड आहे .' ६ ( कु .) नारळाची खव , खरड . ( सं . खरवृत्त ; म ; खरडणें ; किंवा प्रा . खरड = लेपणें , लपेटणें ) घराची खरवड - खराब पडकें मोडके गैरसोयीचें घर . ( अशा मोडक्या घरास तुच्छतेनें म्हणतात .) ' मेलें घर आहे कां घराची खरवड !' - फाटक नाट्यछटा . ३ .
  पु. ( कु . गो ) अति लहान मासा , मासळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP