|
स्त्री. १ मिसळ ; मिश्रण ; मिश्रितपणा ; मिश्रित , किंवा मिसळीचें द्रव्य . ( मुख्यत्वें धान्य , दाणे ). २ ( शेती ) चिखल . - कृषी २५७ . ३ ( राजा .) फणसाच्या आठीळांची दाणे घातलेली सुकी भाजी . ( खेड ) न. लहान गांव . ( शके ७२८ . च्या वणी ताम्रपटांत हा शब्द आला आहे .) ( सं . खेट - क ) पु. चमत्कारिक , विलक्षण , तर्हेवाईक माणुस . ०कर - वि . मिश्रित ( धान्य ) ०गणती - स्त्री . सरसकट मोजणी . ०कचेरी स्त्री. चावडी . ०वळ वाळ , खेडाऊ , खेडोळ , खेडावळ , खेडाळ , खेडाळु , खेडवल वाल - वि . १ गांवढळ ; अशिक्षित ; खेंड्यांत राहणारा ; शेतकरी . २ गांवरानी ; गांवठी ; धडवती ; गांवासंबंधी . ( भाषण , धान्य , कारागिरीचा पदार्थ ).
|