Dictionaries | References च चालत्या गाडीस खीळ घालणें Script: Devanagari Meaning Related Words चालत्या गाडीस खीळ घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा गाडा सुरळीतपणें चालला असतां, त्याच्या आंसांत वगैरे खीळ घालून चाक पुढे न फिरेल असे करणें, म्हणजे त्याची गति कुंठित करणें होय. यावरून नीट सुरळीत चाललेल्या गोष्टीस अडथळा करणेंचालू प्रगतीस प्रतिबंध करणेंकोणत्याहि गोष्टीत अडवणूक करणें. ‘चालत्या गाड्याची खीळ काढणें’ असा कोठे कोठे पाठभेद आढळतो. आंसाच्या टोकास चाकाच्या बाहेर एक खीळ असते. ही काढली असतां गाडा चालूं लागला तर चाक बाहेर येण्याचा संभव असतोयामुळे गाडा थांबतो. गाडा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP