|
जीभ पहा . स्त्री. - तोंडांतील एक अवयव ; रसनेंद्रिय .
- ( ल . ) नंदीबैलाच्या पाठीवर जिभेच्या आकाराचें चिकटविलेलें कातडें वाढतें तें .
- जिभेच्या आकाराची वस्तु , भाग . नखाची - डोळयाची - सापाची जीभ पहा .
- फोगी ; एक प्रकारचें शीड .
- ( व . ) रणगाडा किंवा पाळणा याची खालची बाजू .
- ( नाशिक ) जिभेसारखा लांबट पसरलेला फाटा . नदीची जीभ लांबवर पसरली आहे . [ सं . जिह्वा ; प्रा . जिभ्भा फ्रें ; जि . चीव , जीवा ] ( वाप्र . )
०काढणें पदार्थ खाण्यासाठीं आशाळभूतपणा करणें . ०चावणें चावलीशी करून बोलणें - भिऊन , संकोच धरून , दबत दबत बोलणें . ०चुरचुर बोलणें - अयोग्य , अप्रासंगिक , वेडेवाकडें बोलणें . ०जड असणें लवकर पाठ करावयाला असमर्थ असणें . जीभ जड होणें पहा . ०जड होणें - ( अस्पष्टोच्चारानें ) बोलतां न येणें चांगलें शुध्द बोलतां न येणें . लहान मुलांनीं सुपारी खाल्यानें जीभ जड होते .
- मंदबुध्दि होणें .
०झडणें ( खोटें वगैरे बोलण्यानें ) जीभ कुजून पडणें ; वाचा नाहींशी होणें . ०नरकांत घालणें पोकळ वचनांनीं , रिकाम्या बढाईनीं वगैरे जीभ बाटविणें ; खोटें बोलणें . ०पाघळणें गुप्त वार्ता फोडणें ; न बोलण्याची गोष्ट , गुप्त गोष्ट बोलणें . ०बधिर होणें जीभ जड होणें . ०मोकळी सोडणें हवें तसें बोलणें , खाणें ; बंधन , नियम न पाळणें . ०आडणें बोबडी वळणें ; मुकें बनणें ; शब्द न फुटणें . ०लवलव करणें चुरचुर चालणें ; बोलणें . ०लांव करून बोलणें वरिष्ठांशीं अवळपवळ बोलणें . ०लालचावणें खाण्याला उत्सुक असणें ; पाणी सुटणें . ०वळवळणें - ( लहान मुलानें ) बोलण्याचा प्रयत्न करणें ; बोलावयास लागणें .
- शिव्या देणें ; अद्वातद्वा बोलणें .
०विटाळणें जीभ नरकांत घालणें पहा . ०शिंदळ, निसरडी स्त्री . वि . - वाह्यात , बिन ताब्यांतील जीभ . - फटकळ ; शिवीगाळ करणारी . ०सोकणें - चटक लागणें .
- चव येणें ( अन्नाची - सरावानें ).
०सोकावणें तोंड चटावणें . जीभ सोकणें पहा . ०हातीं धरणें मन मानेल तसें बोलणें , खाणें . ०भेचा पडा अद्वातद्वा बोलणें , वाचाळता . ०भेचा पालट खाण्यांत बदल ; रोजचा खाण्याचा पदार्थ न खातां दुसरा खाणें . ०भेचा लोळ , भेचा लोळा अतिशय कढत पदार्थ खाल्ल्यानें जीभ भाजून जाणें . जिभेचे फुटाणे फुटणें फाडफाड बोलणें . एकाच जिभेनें साखर किंवा गू खाणें एकाच वेळीं सम्मति आणि असम्मति देणें , बरेवाईट म्हणणें ; दोन्ही प्रकारें बोलणें . ० भेला काटा लावणें एखादी गोष्ट गुप्त ठेवणें . ० भेला चिमटा घेणें बोलणें किंवा खाणें यापासून तोंड आवरणें . ०भेला डाग देणें जीभ ताब्यांत ठेवणें ; जीभेला नियंत्रण घालणें . जीभेवर असणें - तोंडपाठ असणें .
- अगदीं ताज्या आठवणींत असणें .
- बोलून टाकण्याच्या तयारींत असणें .
- भेस , ला , आडवा , वेढा नसणें वह्यात बडबड करणें ; निरर्थक प्रलाप काढणें . भेस आवरून , ला आवरून निर्बंध घालणें ; जीभ आटोक्यांत ठेवणें . - भेस , ला , टाचा देऊन ठेवणें , टाचा कांहींएक ठेवणें आपण न खातां दुसर्यासाठीं गोड पदार्थ राखून ठेवणें . भेस हाड नसणें जीभ ताब्यांत नसणें ( खोटें बोलणें , शिवीगाळ करणें यांत ); खोटें , अपशब्द बोलण्याचें भय नसणें . म्ह० उचलली जीभ आणि लाविली टाळयाला = विचार न करतां बोलणें .
|